पिंपरी,(हिंदवी न्यूज)-वुई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने दुर्बल, गरजू, पीडित, वंचित विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सहाय्यता निधी वाटप व दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असा दुहेरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन महापौर रवी लांडगे, तसेच राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त प्राध्यापिका शिल्पागौरी गणपुले उपस्थित होत्या.
फाउंडेशनच्या वतीने प्रत्येक वर्षी पिंपरी चिंचवड शहरातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थसहाय्य मदत केली जाते. व दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही केला जातो. वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी या कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. प्रास्ताविकामध्ये त्यांनी फाउंडेशन वतीने आत्तापर्यंत केलेल्या कामाची व आगामी काळातील कार्याविषयी माहिती दिली.
महापौर रवी लांडगे यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. वुई टुगेदर फाउंडेशन ही संस्था अत्यंत मोलाचे व स्तुत्य कार्य करीत आहे. आजचा कार्यक्रम हा आगळ्यावेगळ्या पद्धतीचा आहे. फाउंडेशनने हे कार्य पुढे करीत राहावे. त्यासाठी रवी लांडगे यांनी संस्थेला शुभेच्छा दिल्या
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राध्यापिका शिल्पा गौरी गणपुले यांनी विद्यार्थी व पालकांना विद्यार्थी व पालकांना उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांची शिक्षणाची पुढची दिशा व अभ्यासाची पद्धत याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित असणाऱ्या काही पालकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या वुई टुगेदर फाउंडेशनचे आभार मानताना अनेक पालक, विद्यार्थी भावनिक झाले होते. कारण त्यांच्या शैक्षणिक खर्चाचा काही प्रमाणात का होईना परंतु आर्थिक बोजा या संस्थेने उचला हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे व हे आम्ही कधी विसरणार नाही अशा भावना अनेक पालकांनी व विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
वुई टुगेदर फाउंडेशन अध्यक्ष मधुकर बच्चे ,उपाध्यक्ष रवींद्र काळे, सचिव जयंत कुलकर्णी, सहसचिव मंगला डोळे- सपकाळे खजिनदार दिलीप चक्रे, सल्लागार रवींद्र सागडे, खुशाल दुसाने, सलीम सय्यद, अजित कुलथे, दारासिंह मन्हास, सौरभ शिंदे, श्रीनिवास जोशी, शंकर कुलकर्णी, उल्हास दाते, झाकीर सय्यद, विलास गटने, के रंगराव, अरविंद पाटील, विलास जगताप, बाळासाहेब जगताप, सदाशिव गुरव, दिलीप पेटकर, अर्जुन पाटोळे, जावेद शेख, अनिल शिंदे, धनंजय मांडके, जितेंद्र निखळ, रोहिणी बच्चे, अभिजीत पवार, सोनाली डावरे, अवधूत कुलकर्णी, वासंती काळे, एम के शेख, अनिल पोरे, श्रावणी बच्चे, असावरी बच्चे, धनराज गवळी,आदींनी हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
संस्थेच्या सहसचिव मंगलाडोळे-सपकाळे यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष रवींद्र काळे यांनी आभार मानले.
![]()
