हिंदवी न्यूज | पिंपरी-चिंचवड | दि. ६ जुलै
पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक ३१ मधील पारस हॉस्पिटलसमोरील विनायक नगर, आदर्श नगर आणि इंद्रप्रस्थ सोसायटीसमोरील रस्त्यावर मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या पार्श्वभूमीवर आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेवक माऊलीशेठ जगताप यांच्या सूचनेनुसार पूरग्रस्त परिसराची पाहणी करण्यात आली.
यावेळी पावसाच्या पाण्याचा तातडीने निचरा करण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले. नागरिकांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी पाण्यात अडकलेली वाहने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात मदत करण्यात आली. तसेच नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आणि आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यासाठी संजय मराठे मित्र परिवाराने सक्रिय सहभाग घेतला.
प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्क राहण्याचे व आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
![]()
