Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना राज्य शासनाप्रमाणे निवृत्ती वेतनाचे (पेन्शन) लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा!

August 28, 2026

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत अग्निशमन विभागाचे युद्धपातळीवर बचावकार्य
पिंपरी चिंचवड

अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत अग्निशमन विभागाचे युद्धपातळीवर बचावकार्य

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJuly 7, 2026Updated:July 7, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

सुमारे १,५०० नागरिकांची बोटीच्या सहाय्याने सुटका; ५ हजार नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर, ७५० जनावरेही वाचविली.

हिंदवी न्यूज | पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग नागरिकांच्या मदत व बचावकार्यासाठी अहोरात्र कार्यरत आहे. शहरातील विविध भागांमध्ये अडकलेल्या नागरिकांसह जनावरांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने हे बचावकार्य अधिक प्रभावीपणे राबविण्यात आले.

अतिवृष्टीमुळे रहाटणी, केशवनगर, ताथवडे, किवळे, रावेत, मोशी, चिखली, रमाबाई नगर, भाट नगर, आंबेडकर नगर, नढे नगर, पिंपळे गुरव, नवी सांगवी, भोसरीतील कुंदननगर तसेच शहरातील अन्य पूरग्रस्त अशा सुमारे २० ते २५ भागांमध्ये नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. या ठिकाणी अग्निशमन विभागाच्या जवानांनी बोटींच्या सहाय्याने सुमारे १,५०० नागरिकांची सुखरूप सुटका करून त्यांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले.

याशिवाय, चिंचवड येथील केशवनगर परिसरातील गुरुकुलमध्ये अडकलेल्या तब्बल ३०० विद्यार्थ्यांचे यशस्वी बचावकार्य करून त्यांना सुरक्षित निवारा केंद्रात हलविण्यात आले. नदीकाठच्या मंदिरांमध्ये वाढत्या पाण्याच्या प्रवाहामुळे अडकलेल्या पुजाऱ्यांचीही सुखरूप सुटका करण्यात आली. ताथवडे परिसरात अडकलेल्या वयोवृद्ध नागरिकांना सुरक्षित बाहेर काढून निवारा केंद्रात हलविण्यात आले. काळेवाडी येथे गर्भवती महिला, लहान मुले तसेच अनेक वयोवृद्ध नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहोचविण्यात आले, तर जुनी सांगवी परिसरात पूराच्या पाण्यात अडकलेल्या आई आणि तिच्या बाळाची धाडसीपणे सुखरूप सुटका करण्यात आली.

पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या एकूण सुमारे ५,००० नागरिकांना महानगरपालिकेच्या शाळांमध्ये उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित करण्यात आले असून, तेथे त्यांच्यासाठी भोजन, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा तसेच इतर आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांप्रमाणेच अतिवृष्टीमुळे पुरात अडकलेल्या गाई, म्हशी आदी सुमारे ७५० जनावरांनाही सुरक्षितपणे बाहेर काढण्यात अग्निशमन विभागाला यश आले आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व १० अग्निशमन केंद्रांवरील अधिकारी, जवान आणि नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांनी परस्पर समन्वय, तत्परता आणि धाडसाच्या बळावर ही आपत्कालीन परिस्थिती प्रभावीपणे हाताळली. या संपूर्ण बचाव मोहिमेत उप अग्निशमन अधिकारी अनिल टिंबळे, दिलीप गायकवाड, सुनील फरांदे, श्रीकांत वैरागर, गौतम इंगवले, चंद्रशेखर घुले यांच्यासह लिडिंग फायरमन अनिल कदम, वरिष्ठ फायरमन चेतन माने तसेच फायरमन सुमित कांबळे, शुभम किरवे, दर्शन सोनवणे, संतोष सरोटे, नामदेव वाघे, ड्रायव्हर-ऑपरेटर अमोल चिपळुनकर आणि इतर अग्निशमन जवानांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.

तसेच नियंत्रण कक्षामध्ये २४ तास कार्यरत राहून आपत्कालीन कॉल स्वीकारणे, माहितीचे समन्वयन करणे आणि बचाव पथकांशी सातत्याने संपर्क ठेवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी पूजा वलगुडे, करूणा थोया, तेजस्वी पाटील आणि स्नेहा जगताप यांनी यशस्वीपणे पार पाडली. सध्या देखील शहरातील पूरग्रस्त भागांमध्ये अग्निशमन विभागाचे बचावकार्य सुरू असून, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविणे, पाण्यात अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढणे तसेच आवश्यक ती मदत पुरविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग नागरिकांच्या सेवेसाठी २४x७ सज्ज असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन विभागाशी तात्काळ संपर्क साधून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

पावसाचा जोर
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसमाजोपयोगी संशोधनाला एसएनडीटी महिला विद्यापीठाची चालना
Next Article जूनमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल ४७ हजार ७६६ टन कचऱ्याचे संकलन
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना राज्य शासनाप्रमाणे निवृत्ती वेतनाचे (पेन्शन) लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा!

August 28, 2026

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना राज्य शासनाप्रमाणे निवृत्ती वेतनाचे (पेन्शन) लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा!

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 28, 20260
Spread the love

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपीएल) हजारो सेवकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. पीएमपीएल कर्मचाऱ्यांना आता राज्य शासनाच्या नियमांप्रमाणे निवृत्ती वेतनाचे (पेन्शन) लाभ मिळण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे.

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?