Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»जूनमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल ४७ हजार ७६६ टन कचऱ्याचे संकलन
पिंपरी चिंचवड

जूनमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल ४७ हजार ७६६ टन कचऱ्याचे संकलन

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJuly 7, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

कचरा विलगीकरणास नागरिकांचा वाढता प्रतिसाद

हिंदवी न्यूज | पिंपरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून जून महिन्यात शहरातून एकूण तब्बल ४७ हजार ७६६.७८५ टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले आहे. स्त्रोत पातळीवर कचऱ्याचे विलगीकरण, स्वतंत्र संकलन आणि वैज्ञानिक प्रक्रियेला दिलेल्या प्राधान्यामुळे शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक परिणामकारक होत असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.

महापालिकेच्या आकडेवारीनुसार, जून महिन्यात ३५ हजार २३.६०० टन सुका कचरा, ६ हजार ७३१.३२० टन ओला कचरा, ४ हजार ९७.८५० टन मिश्र कचरा, १ हजार ११८.२२५ टन ग्रीन वेस्ट, ४७९.२२५ टन चिकन वेस्ट आणि ३१६.५६५ टन मंडई वेस्ट संकलित करण्यात आला. संकलित कचऱ्यावर विविध प्रक्रिया केंद्रांमध्ये वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया करून पुनर्चक्रीकरण तसेच वसुंधरापूरक व्यवस्थापन करण्यात येत आहे. त्यामुळे लँडफिलवरील ताण कमी होण्यासह नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनालाही चालना मिळत आहे.

महापालिकेने घराघरांतून ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करण्यासाठी सातत्याने जनजागृती मोहीम राबविली आहे. त्याला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, कचरा विलगीकरणाचे प्रमाण वाढल्याने कचऱ्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि प्रभावी होत आहे. त्याचबरोबर ग्रीन वेस्ट, मंडई वेस्ट आणि इतर विशेष प्रकारच्या कचऱ्याचे स्वतंत्र संकलन केल्यामुळे पर्यावरणपूरक घनकचरा व्यवस्थापनाला बळ मिळत आहे.

महापौर रवी लांडगे म्हणाले, “स्वच्छ शहराची सुरुवात प्रत्येक घरातून होते. नागरिकांनी घरच्या घरी ओला व सुका कचरा विलग करून महापालिकेला सहकार्य केल्यास कचऱ्याचे पुनर्चक्रण अधिक प्रभावीपणे करता येते. स्वच्छ, हरित आणि पर्यावरणपूरक पिंपरी चिंचवड घडविण्यासाठी नागरिकांचा सहभाग हीच सर्वात मोठी ताकद आहे. प्रत्येक नागरिकाने कचरा विलगीकरणाची सवय अंगीकारून ‘झिरो वेस्ट सिटी’च्या संकल्पनेला बळ द्यावे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले की, “घनकचरा व्यवस्थापन ही केवळ स्वच्छतेची बाब नसून पर्यावरण संवर्धनाशी निगडित महत्त्वाची जबाबदारी आहे. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, पुनर्चक्रण आणि वैज्ञानिक प्रक्रिया यावर सातत्याने भर दिला जात आहे. नागरिकांनी कचरा विलगीकरणाची सवय अधिक प्रभावीपणे अंगीकारल्यास ‘झिरो वेस्ट सिटी’चे उद्दिष्ट निश्चितपणे साध्य होईल आणि भावी पिढ्यांसाठी अधिक स्वच्छ व हरित शहर निर्माण करता येईल.

तर अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यावेळी बोलताना म्हणाले की, “जून महिन्यातील कचरा संकलनाची आकडेवारी ही नागरिकांच्या वाढत्या सहभागाची साक्ष आहे. घरातूनच कचरा विलगीकरण केल्यामुळे संकलन, वाहतूक, प्रक्रिया आणि पुनर्चक्रणाची संपूर्ण यंत्रणा अधिक कार्यक्षम होत आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाने कचरा व्यवस्थापनात भागीदार म्हणून योगदान दिल्यास पिंपरी चिंचवड स्वच्छतेच्या बाबतीत देशात आदर्श ठरेल.

आरोग्य विभागाचे उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले की, “कचऱ्याचे योग्य वर्गीकरण ही प्रभावी घनकचरा व्यवस्थापनाची गुरुकिल्ली आहे. जून महिन्यातील कचरा संकलनातून नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद दिसून येत आहे. ओला, सुका आणि विशेष प्रकारचा कचरा स्वतंत्रपणे दिल्यास त्यावर वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया करणे आणि पुनर्चक्रणाचे प्रमाण वाढविणे अधिक सुलभ होते. प्रत्येक नागरिकाच्या सहभागातूनच स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक पिंपरी चिंचवड घडविण्याचे उद्दिष्ट साध्य होईल.”

महापालिकेने नागरिकांना घरातूनच ओला, सुका तसेच सॅनिटरी कचरा, विशेष काळजी योग्य कचरा अशा चार प्रकारे कचरा विलग करूनच महापालिकेच्या घंटागाडीत देण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि महापालिकेच्या प्रभावी उपाययोजनांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ, हरित आणि शाश्वत शहर घडविण्याच्या दिशेने सातत्याने प्रगती करत असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

कचरा विलग
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleअतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत अग्निशमन विभागाचे युद्धपातळीवर बचावकार्य
Next Article जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात शिक्षण विभागाचा साक्षरता जनजागृती चित्ररथ सहभागी होणार
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 27, 20260
Spread the love

मराठी पत्रकार संघ नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार समारंभात आमदार जगताप यांचे आश्वासन हिंदवी न्यूज | पिंपरी …

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?