हिंदवी न्यूज | आळंदी
अखिल भारत हिंदू महासभा पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी अर्जुन मेदनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दाखल घेत हि नियुक्ती करण्यात आल्याची माहिती अखिल भारत हिंदू महासभा वरिष्ठ उपाध्यक्ष वैभवराज रौंधळ यांनी दिली.
या वेळी आंतरराष्ट्रीय संरक्षक श्री. श्री. १००८ जगतगुरु, स्वामी माधवानंद सरस्वती जी महाराज, कार्यकारी अध्यक्ष योगेद्र वर्मा जी, वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष वैभवराज शिवाजी रौंदळ, राष्ट्रीय महामंत्री डॉ. सिद्धार्थ भट्टाचार्य. राष्ट्रीय कोषाध्यक्ष साक्षी वर्मा जी, महामंत्री आचार्य अजय कृष्ण शास्त्री, राष्ट्रीय धर्म प्रचारक योगी दादानाथजी गुरु सुखनाथजी, योगी महंत शिवनाथजी महाराज, बालयोगी ऋषिकेश नाथजी महाराज, प्रकाशनाथजी महाराज, योगी शीतलनाथजी, योगी सुंदरनाथजी, महंत सचिदानंद सरस्वतीजी महाराज, महंत योगानंद सरस्वतीजी, महंत किशोरनंद सरस्वती जी महाराज, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. त्यागी तसेच महाराष्ट्र राज्य प्रभारी राणीताई पवार, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष भावेश पाटील, महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष आरती राजपूत, कर्नाटक प्रदेश प्रभारी अशोक कुमार नानू राठोडजी. महाराष्ट्र राज्य सरचिटणीस प्रकाश तांबट, महाराष्ट्र राज्य मीडिया विभाग उपाध्यक्ष विष्णू भाऊ बिचकुले, लक्ष्मीकांतभाऊ शिंदे, पालघर जिल्हा अध्यक्ष प्रिया शंकर राव, जिल्हा अध्यक्ष पुणे सागर निंबाळकर जी, महाराष्ट्र राज्य सदस्य दिनेश माळी,शिक शहर अध्यक्ष अंकित वाघ, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पुनम गांगुर्डे, उपाध्यक्ष पुनीत गोयल, विधी विभाग उत्तर प्रदेश अध्यक्ष रवीं. ब्रिजभुषणजी पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी झालेल्या बैठकीत नियुक्तीबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. पुणे जिल्ह्यातून या नियुक्तीचे स्वागत करण्यात आले असून आळंदी जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र घुंडरे पाटील, तुकाराम महाराज ताजने, विश्वकर्मा महाराज पांचाळ यांचेसह विविध क्षेत्रातील सेवाभावी संस्थानांचे पदाधिकारी यांनी देखील स्वागत केले .
![]()
