Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

महापालिकेकडून इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत बसपास योजना

July 15, 2026

विठ्ठलभक्तांच्या सेवेत शायना एनसी व श्रेया कदम यांचा पायी चालत वारकऱ्यांशी संवाद; रिंगण-फुगडीत सहभागी होत दिला एकरुपतेचा संदेश.

July 15, 2026

डेंग्यू, मलेरियाविरुद्ध महापालिकेची व्यापक प्रतिबंध मोहीम

July 15, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – कामगारनेते यशवंत भोसले
पिंपरी चिंचवड

मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – कामगारनेते यशवंत भोसले

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJuly 14, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

कंत्राटी पद्धत बंद करून कामगारांना कायम करा.

हिंदवी न्यूज | पिंपरी

शहरातील मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांना राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत, या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. तसेच मृतांच्या नातेवाईकांना महानगरपालिकेत कायमस्वरूपी नोकरी देण्याची मागणी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंत भोसले यांनी पिंपरी येथे  पत्रकार परिषदेत केली.

यावेळी कामगारनेते यशवंतभाऊ भोसले म्हणाले की, महापालिका नागरिकांकडून कोट्यवधी रुपयांचा कर वसूल करते; मात्र कचरा संकलन, स्वच्छता, पाणीपुरवठा यांसारखी कायमस्वरूपी स्वरूपाची कामे कंत्राटी पद्धतीने करून मोठा भ्रष्टाचार केला जात आहे. काही ठेकेदार, दलाल आणि राजकीय हितसंबंध जपण्यासाठी ही व्यवस्था सुरू ठेवण्यात आली असून ती बेकायदेशीर आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दबून कामगारांचा मृत्यू होण्याची घटना अत्यंत भीषण आणि दुर्दैवी असून, ही आशिया खंडातील श्रीमंत महापालिकेच्या प्रशासनाचे ‘नाक कापणारी’ घटना आहे. दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या कामगारांना जिवंतपणी सुरक्षितता, आवश्यक सुरक्षा साहित्य, गणवेश, वैद्यकीय सुविधा किंवा नियमित आरोग्य तपासणी देण्यात आली नाही. अनेक वर्षे कचऱ्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गंभीर आजार होतात, तरीही त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याची टीका त्यांनी केली.

दुर्घटना घडल्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत राबवण्यात येणारे ‘डिझास्टर मॅनेजमेंट’ (आपत्ती व्यवस्थापन) प्रशासनाकडे असणे गरजेचे आहे, परंतु येथे फक्त ‘सेटिंग मॅनेजमेंट’ सुरू आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेलेली इमारत ही बेकायदेशीर होती आणि एका मजल्याची परवानगी असताना तेथे दोन मजली इमारत उभारून प्रशासनाचेच कर्मचारी व कंत्राटी कामगार काम करत होते, हे प्रशासनाचे मोठे अपयश आहे.कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेला आधुनिक प्रकल्प अनेक महिन्यांपासून बंद आहे. त्या प्रकल्पातील अत्याधुनिक यंत्रसामग्री काही महिन्यांत कचऱ्याचे डोंगर संपविण्याची क्षमता ठेवत असतानाही तांत्रिक कर्मचारी नियुक्त न केल्यामुळे आणि योग्य नियोजनाच्या अभावामुळे प्रकल्प बंद पडला आहे. त्यामुळे या दुर्घटनेला कारखाना बंद ठेवणारे अधिकारीही तितकेच जबाबदार आहेत.दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देणे स्वागतार्ह असले, तरी त्याने जीव परत येणार नाही. त्यामुळे प्रत्येक मृत कामगाराच्या वारसाला तातडीने महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी द्यावी.या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी एस.आय.टी. (SIT) नेमावी.

कंत्राटी पद्धत पूर्णपणे बंद करून सर्व कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे, त्यांना कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन, ईएसआय, आरोग्य सुविधा आणि वार्षिक वैद्यकीय तपासणी देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. प्रशासनाने केवळ पंचनामे आणि पाहणी करण्याऐवजी उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी. कामगारांच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि संबंधित ठेकेदारांना जबाबदार धरल्याशिवाय अशा दुर्घटना थांबणार नाहीत.राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या सुमारे साडेतीन हजार सभासद कर्मचाऱ्यांच्या वतीने “समान काम, समान वेतन” आणि सेवेत कायम करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती देत, येत्या १५ दिवसांत आयुक्तांनी संघटनेशी बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर हजारो कामगारांसह कचरा वाहने घेऊन महापालिकेवर तीव्र आंदोलन करण्यात येईल,असा इशाराही त्यांनी दिला.

Loading

Post Views: 7
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleलोकनेते युवराज दाखले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन;मातंग समाजाच्या ‘अ-ब-क-ड’ उप-वर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी!
Next Article चौकशीचा फार्स नको; संबंधित अधिकाऱ्यांवर, कंपनीवर गुन्हा दाखल करा – सुषमा अंधारे
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

महापालिकेकडून इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत बसपास योजना

July 15, 2026

डेंग्यू, मलेरियाविरुद्ध महापालिकेची व्यापक प्रतिबंध मोहीम

July 15, 2026

मोशी कचरा डेपो नैसर्गिक आपत्ती की दुर्लक्षितपणामुळे दुर्घटना : प्रविण कदम

July 15, 2026

चौकशीचा फार्स नको; संबंधित अधिकाऱ्यांवर, कंपनीवर गुन्हा दाखल करा – सुषमा अंधारे

July 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

महापालिकेकडून इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत बसपास योजना

By Hindavinewsnetwork@gmail.comJuly 15, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज | पिंपरी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील इयत्ता ५ वी ते…

Loading

विठ्ठलभक्तांच्या सेवेत शायना एनसी व श्रेया कदम यांचा पायी चालत वारकऱ्यांशी संवाद; रिंगण-फुगडीत सहभागी होत दिला एकरुपतेचा संदेश.

July 15, 2026

डेंग्यू, मलेरियाविरुद्ध महापालिकेची व्यापक प्रतिबंध मोहीम

July 15, 2026

मोशी कचरा डेपो नैसर्गिक आपत्ती की दुर्लक्षितपणामुळे दुर्घटना : प्रविण कदम

July 15, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Loading

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Loading

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

Loading

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर

Loading

Loading

Loading

Loading

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?