Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»आळंदी»आळंदी माऊली मंदिरात भारतीय सैन्य कारगिल विजय दिवस साजरा
आळंदी

आळंदी माऊली मंदिरात भारतीय सैन्य कारगिल विजय दिवस साजरा

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJuly 27, 2026No Comments5 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

श्रींचे समाधीवर तुळशीपत्र अर्पण करीत पुष्पवृष्टी

दिगंबर महाराज नरवडे यांची सुश्राव्य कीर्तन सेवा

विश्व प्रार्थना पसायदान संसदेत लावण्याची मागणी :- डॉ. नंदकिशोर एकबोटे

हिंदवी न्यूज | आळंदी 

 श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात कारगिल युद्धात ज्यांनी आपले दोन्ही पाय गमावले, असे माजी सैनिक (नायक) संदीप इंदलकर, पुरातत्वाचे अभ्यासक, भारतीय संस्कृती संरक्षण संस्थान, पुणे कार्यवाह डॉ. नंदकिशोर शशिकला रमाकांत एकबोटे यांच्या विशेष उपस्थितीत ‘भारतीय सैन्य कारगिल विजय दिवस’ साजरा करण्यात आला.

भारतीय संस्कृती संरक्षण संस्थान द्वारा कारगिल विजय दिवस भारतीय सैनिकांना मानवंदना देत श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर तुळशीहार व पुष्पवृष्टी करत साजरा करण्यात आला. या निमित्त विविध कार्यक्रम तसेच ह.भ.प दिगंबर महाराज नरवडे यांचे माऊली मंदिरातील विनामंडपात कीर्तन सेवा झाली.

या वेळी डॉक्टर नारायण महाराज जाधव, भारतीय संस्कृती संरक्षण संस्थान संस्था कार्यवाह डॉ. नंदकिशोर एकबोटे, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था सचिव अजित वडगावकर, दिगंबर महाराज नरवडे, आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, निवृत्ती महाराज साठे विठ्ठल आनंद गिरी महाराज नायक सेवानिवृत्त संदीप इंदलकर, रवींद्र महाराज जोशी, सेवानिवृत्त नायक सुभेदार दत्तात्रय पोतदार, श्रींचे पुजारी प्रफुल्ल प्रसादे, दशरथ चवरे नाईक सुभेदार सेवानिवृत्त धनेश्वर बोस कॅप्टन सेवानिवृत्त बाळासाहेब आढाव,  अजित बगाटे ,राजेंद्र महाराज जाधव, ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे विश्वंभर पाटील, गोविंद ठाकूर, हमीद शेख, राजेश नागरे, व्यवस्थापक माऊली वीर, ओंकार ताठे, सागर सर्जेराव,प्रशांत निंबाळकर,खंडू खेडकर, नारायण खोकले, मच्छिंद्र धिरडेकर, यांचेसह भाविक, वारकरी, ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी कैवल्य साम्राज्य ज्ञान चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर महाराज चरणी प्रार्थना करण्यात आली. भारत मातेवरील आर्थिक धार्मिक सामाजिक व मानसिक सर्व संकटे नष्ट व्हावी, भारतीय सैनिकांचे आरोग्य चांगले ठेवा, भारतीय सैनिकांचे दहा दिवसातून रक्षण करा, भारतीय सैनिकांना नेहमीच विजयश्री द्या, भारतीय सैनिकांनी सुखरूप घरी परतावे. या साठी प्रार्थना करण्यात आली.

या प्रसंगी हिमालया पेक्षा उंच साहस ज्यांचे देशासाठी सर्वोच्च बलिदान ज्यांचे अशा भारताच्या वीर जवानांना विनम्र अभिवादन करीत कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच करगीर युद्धात ज्यांनी परिश्रम पूर्वक कामगिरी केली, त्या सर्व उपस्थित जवानाचे दीर्घांयुरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली. या वेळी संयोजक डॉ. नंदकिशोर एकबोटे, विठ्ठलानंद गिरी महाराज, अर्जुन मेदनकर, नायक संदीप इंदलकर, रवींद्र जोशी, राजेंद्र जाधव आदींनी मनोगते व्यक्त करीत मार्गदर्शन केले. यावेळी देशाचे सीमेवर संरक्षण करीत असलेल्या भारतीय सैनिकांचे प्रति रक्षा बंधना साठी राख्या पाठविण्याचे आवाहन करण्यात आले. माऊली मंदिरात श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे वतीने विशेष सहकार्य करीत या वर्षीचे कारगीर विजय दिनाचे कीर्तनसेवा उपक्रम सोशल मीडियावर थेट प्रक्षेपण करीत सेवा उपलब्ध करून देण्यात आली. माऊलींचे मंदिरात विविध उपक्रमांनी कारगिल विजय दिन हरिनाम गजरात कीर्तन सेवेने साजरा करण्यात आला. यावेळी श्रींचे समाधीवर पुष्पवृष्टी, शहीद जवानाचे प्रतिमा पूजन, कीर्तन, श्रींचे दर्शन, प्रार्थना, प्रसाद सेवा रुजू करण्यात आलीं. येथील आवेकर भावे रामचंद्र संस्थान ट्रस्ट श्री राम मंदिर येथे कारगील युद्धात सहभागी सेवानिवृत जवानांनी  श्री राम मंदिरात सद्दीच्छा भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले. या प्रसंगी सर्व मान्यवरांचा श्रीफळ प्रसाद, रामरक्षास्तोत्र देऊन विश्वस्त अर्जुन मेदनकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

कारगिल विजय दिन माऊलींच्या संजीवन समाधीवर परमवीर चक्र सन्मानार्थी प्रतिमा पूजन  करून भाविक, वारकरी, आजी माजी सैनिकांच्या वतीने श्रींचे समाधीवर तुळशीपत्र वाहून पुष्प वृष्टी करीत भारतीय सैन्य विजय दिवस साजरा करण्यात आला. पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणचे मंदिरांत भारतीय सैन्य विजय दिवस साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी कार्यरत आजी , माजी सैनिकांना दिर्घआयुरोग्य लाभावे यासाठी माऊलींची पूजा, दर्शन करीत साकडे घालण्यात आले. भारतीय लष्करात कार्यरत असताना वीरत्व प्राप्त झालेल्या हुतात्मा सैनिकांना यावेळी सर्व उपस्थितांनी विनम्र अभिवादन केले.

या वेळी डॉ. नंदकुमार एकबोटे म्हणाले, भारतीय सैनिकांसाठी व सर्व भारतीयांसाठी हा महत्वपूर्ण विजय दिवस असून याचा सर्व देशप्रेमी भारतीयांना त्याचा अभिमान असल्याचे सांगितले. म्हणून २६ जुलै दिवशी आपण गेली 15 वर्षे आळंदीत माऊलींच्या समाधी वर पुष्प वृष्टी करुन सैनिकांना नेहमी विजयश्री मिळावी, सैनिकांचे आरोग्य  चांगले रहावे, सैनिकांचे दहा दिशातून रक्षण व्हावे, अशी आर्त प्रार्थना करण्यासाठी एकत्र येत असतो असे सांगितले.

मंदिरातील ओवरीत राजेंद्र जाधव, संदीप इंदलकर, अर्जुन मेदनकर आदींनी आपल्या मनोगतातून सैनिकांवरील आपले प्रेम आपल्या प्रत्येक कृतीतून दाखवून दिले पाहिजे तसेच देशप्रेमासाठी प्रत्येकाला वेड असणे आवश्यक असल्याचे सांगितले. समाजाच्या / देशाच्या रक्षणार्थ आपले सर्वस्व समर्पित केले त्या शहीद जवानांचे फक्त १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारी या दिवशीच स्मरण न करता रोजच स्मरण करणे गरजेचे असल्याचेही सांगितले. ईश्वराने दिलेल्या जीवनाचा सदुपयोग करणे हे प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य असून त्यांनी ते प्रामाणिकपणे करावे असे सांगितले. तसेच कारगिल विजय दिवसाची गौरवगाथा सांगून श्रोत्यांच्या अंगावर शहारे उमटवले. नायक संदीप इंदलकर कारगिल युद्धात सहभागी आले होते. त्यानंतर मिलिटरी ड्यूटीत दोन्ही पाय त्यांना गमवावे लागले आहे. कैवल्य सामाज्य  ज्ञानचक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी सैनिकांसाठी आरोग्य, दीर्घायुष्य व त्यांच्या रक्षणासाठी प्रार्थना करून शहिदांना आदरांजली वाहिली. पसायदान गायनाने कारगिल विजय दिनाच्या कार्यक्रमाची सांगता झाली.

विश्व प्रार्थना पसायदान संसदेत लावण्याची मागणी :- डॉ. नंदकिशोर एकबोटे

या उपक्रमाचे माध्यमातून संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे विश्वाचे शांती, समाधान, सुख, कल्याणासाठी मागितलेले पसायदान हे संसदेच्या दोन्ही सभागृहात लावण्याची मागणी भारतीय संस्कृती संरक्षण संस्थान, पुणे कार्यवाह डॉ. नंदकिशोर शशिकला रमाकांत एकबोटे यांनी केली आहे. या साठी गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा आणि मागणी आहे. देशाचे माननीय राष्ट्रपती साहेब, मा. पंतप्रधान साहेब कार्यालय, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि सर्व खासदार आणि आमदार यांना निवेदन करण्यात आले आहे. तसेच संत साहित्य सर्व शालेय अभ्यासक्रमात समाविष्ठ करण्याची मागणी डॉ. नंदकिशोर एकबोटे यांनी केली आहे. या साठी भारतातील सर्व नागरिकांनी पाठपुरावा करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

Bhartiya sainya kargil vijay divas
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसार्वजनिक स्वच्छतागृह अधिक सुलभ करण्यासाठी महापालिकेचा पुढाकार
Next Article आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

स्वराज ग्रुपतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन ; २९१ रक्तदात्यांचा सहभाग

August 19, 2026

धर्मवीर संभाजीराजे माध्यमिक विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा

August 17, 2026

आळंदीत लक्ष्मीनारायण यागदिनी ब्रम्हध्वज पूजा उत्साहात

August 17, 2026

जादा पार्किंग शुल्क वसूल करणाऱ्या वाहनतळ ठेकेदारास पाच हजार रुपये दंड

August 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 27, 20260
Spread the love

मराठी पत्रकार संघ नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार समारंभात आमदार जगताप यांचे आश्वासन हिंदवी न्यूज | पिंपरी …

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?