Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»स्थायी समितीच्या सभेत पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, आरोग्य सेवा आणि कौशल्य प्रशिक्षणासह महत्त्वपूर्ण  निर्णयांना मंजुरी
पिंपरी चिंचवड

स्थायी समितीच्या सभेत पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, आरोग्य सेवा आणि कौशल्य प्रशिक्षणासह महत्त्वपूर्ण  निर्णयांना मंजुरी

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comAugust 19, 2026Updated:August 19, 2026No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

हिंदवी न्यूज | पिंपरी 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा आज स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शहराचा विकास केवळ नवीन प्रकल्पांपुरता मर्यादित नसून नागरिकांना मिळणाऱ्या मूलभूत सेवा दर्जेदार, सुरक्षित आणि अखंडित ठेवणे आवश्यक आहे, या भूमिकेतून या सभेत पाणीपुरवठा व्यवस्थेची गुणवत्ता, रस्ते व बीआरटीएस मार्गांची दुरुस्ती, आरोग्य सुविधा, स्वच्छता सेवा तसेच युवकांसाठी आंतरराष्ट्रीय भाषा प्रशिक्षणासारख्या विविध महत्त्वाच्या विषयांना सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

सभेच्या प्रारंभी शहर अभियंता पदी नियुक्ती झाल्याबद्दल मनोज सेठीया यांचा स्थायी समितीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर शहराच्या सर्वांगीण विकासाशी निगडित विविध विषयांवर सविस्तर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले.

शहरातील नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने निगडी सेक्टर २३ आणि चिखली टप्पा क्रमांक १ येथील जलशुद्धीकरण केंद्रांसाठी आवश्यक पावडर पॉली इलेक्ट्रोलाईट (Cationic) रसायन खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच याच जलशुद्धीकरण केंद्रांतील निर्जंतुकीकरण प्रक्रियेसाठी स्टेबल ब्लिचिंग पावडर (TCL) उपलब्ध करून घेण्यासही मंजुरी देण्यात आली, ज्यामुळे जलशुद्धीकरणाची प्रक्रिया तांत्रिक निकषांनुसार सुरळीत पार पडण्यास मदत होईल. याशिवाय, पाणीपुरवठा वितरण व्यवस्था अधिक सक्षम ठेवण्यासाठी अजमेरा, मोरवाडी व मासुळकर कॉलनी परिसरातील पाणी वितरण व्यवस्थेचे परिचालन करण्याच्या कामास मंजुरी देण्यात आली. दापोडी, जुनी सांगवी आणि नवी सांगवी भागातील पाण्याच्या टाक्यांची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे तसेच कृष्णानगर येथील एम-१ आणि एस-२ पंप हाऊस व पाण्याच्या टाक्यांच्या परिसरातील देखभाल, दुरुस्ती आणि परिचालनाची कामे हाती घेण्यासही मान्यता देण्यात आली.

महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण विभागांतर्गत मोरवाडी व कासारवाडी येथे विद्यार्थ्यांसाठी जपानी आणि जर्मन भाषा अभ्यासक्रम सुरू करण्याचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. एक वर्षाच्या या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ दर्जेदार भाषा प्रशिक्षणच मिळणार नाही, तर आंतरराष्ट्रीय भाषा परीक्षांचे मार्गदर्शन, तांत्रिक सहकार्य, आवश्यक पुस्तके, अभ्यास साहित्य, अधिकृत प्रमाणपत्र आणि भारतात किंवा परदेशात रोजगारासाठी प्लेसमेंट सपोर्ट उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार, स्टार्टअप, शासकीय योजना आणि सार्वजनिक क्षेत्रातील संधींबाबतही मार्गदर्शन केले जाणार असल्याने युवकांच्या जागतिक रोजगाराच्या संधींना मोठी चालना मिळणार आहे.

शहरातील उद्यानांची नियमित देखभाल अखंडित राहावी यासाठी सध्या सुरू असलेल्या उद्यान देखभाल कामांना नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये कार्यालयातील सुविधा अधिक कार्यक्षम व सुस्थितीत ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार नूतनीकरण, देखभाल-दुरुस्ती आणि फर्निचरविषयक कामे करण्यास मान्यता देण्यात आली.

सार्वजनिक वाहतूक आणि दळणवळण अधिक सुरळीत करण्यासाठी रस्ते व बीआरटीएस मार्गांच्या दुरुस्तीचे अनेक प्रस्ताव मंजूर करण्यात आले. नाशिक फाटा ते वाकड बीआरटीएस रस्त्यावरील आवश्यक दुरुस्ती, पुणे-आळंदी बीआरटीएस कॉरिडॉरवरील डेडिकेटेड लेन व बसथांब्यांची दुरुस्ती, भक्ती-शक्ती चौक ते गोडाऊन चौक या रस्त्याचे पॅचवर्क पद्धतीने डांबरीकरण आणि पुणे-आळंदी रस्त्यावरील पॅचवर्क डांबरीकरण करण्यास मंजुरी देण्यात आली. या कामांमुळे वाहनचालकांना अधिक सुरक्षित आणि खडतररहित रस्ते उपलब्ध होणार आहेत. तसेच, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रस्ते आणि गटर्सच्या नियमित साफसफाईचे काम नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अखंडित सुरू ठेवण्यासाठी आवश्यक मुदतवाढ देण्यात आली आहे.

पिंपरी महापालिकेसाठी आकुर्डी येथे कार्यरत असलेल्या न्यायादंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयातील न्यायाधीश, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्त्यांच्या आस्थापना खर्चाची शासन निर्णयानुसार प्रतिपूर्ती करण्यासही सभेत मान्यता देण्यात आली.

आरोग्य क्षेत्राला अधिक बळकटी देण्यासाठी वायसीएम रुग्णालय आणि नवीन थेरगाव रुग्णालयातील पीपीपी तत्त्वावर कार्यरत एमआरआय केंद्रांमार्फत पात्र रुग्णांच्या करण्यात आलेल्या मोफत व सवलतीच्या एमआरआय तपासण्यांच्या बिलांची अदायगी करण्यास मंजुरी देण्यात आली असून, पुढील काळातही अशा तपासण्यांच्या खर्चाची अदायगी नियमितपणे केली जाणार आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील वॉर्डांमधून निर्माण होणाऱ्या जैववैद्यकीय कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट लावण्यासाठी Non-Chlorinated लाल व पिवळ्या पिशव्या उपलब्ध करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, वैद्यकीय विभागांतर्गत विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक वाहने दोन वर्षांच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर घेण्यास मान्यता देण्यात आली. याशिवाय, जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२६ च्या अनुषंगाने आरोग्य विभागासाठी करण्यात आलेल्या टोप्या व बॅच छपाईच्या खर्चाचे सभेत अवलोकन करण्यात आले.

क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देताना, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि महाराष्ट्र हॉकी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे आयोजित १६ व्या ज्युनिअर महिला नॅशनल हॉकी स्पर्धेसाठीच्या पायाभूत सुविधांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. तसेच ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व विचार प्रबोधन पर्व निमित्त आयोजित कार्यक्रमाच्या ध्वनीक्षेपन आदी विद्युतविषयक खर्चास आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शहरात राबविण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या खर्चासही मान्यता प्रदान करण्यात आली.

 

शुद्ध पाणीपुरवठा, सक्षम रस्ते, सार्वजनिक वाहतूक, दर्जेदार आरोग्य सेवा आणि स्वच्छता यांना प्राधान्य देतानाच आपल्या युवकांना जागतिक रोजगाराच्या संधींसाठी तयार करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ‘हर घर तिरंगा’सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक सहभागाला चालना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नागरिकहित, गुणवत्ता आणि कार्यक्षम प्रशासन यांना केंद्रस्थानी ठेवून पिंपरी-चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी स्थायी समिती नेहमीच कटिबद्ध राहील.

– अभिषेक बारणे, सभापती – स्थायी समिती, पिंपरी चिंचवड महापालिका.

 

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleचाकण औद्योगिक पट्ट्यात वाहतूक कोंडीवर ‘ॲक्शन प्लॅन’; ३१ ऑगस्टपर्यंत रस्ते दुरुस्तीचे निर्देश
Next Article कदमवाकवस्तीतील ९,५०० चौरस फुटांच्या अनधिकृत बांधकामावर ‘पीएमआरडीए’चा हातोडा!
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026

महापालिका सभेत मनोज सेठिया यांचा सत्कार

August 23, 2026

हाऊसफुल्ल’ तुकाराम मुंढे… ‘भेसळमुक्त महाराष्ट्राचा निर्धार’

August 23, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 27, 20260
Spread the love

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि सिद्धिविनायक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गायक, संगीतकार यांना दरवर्षी प्रदान करण्यात येतो.

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026

महापालिका सभेत मनोज सेठिया यांचा सत्कार

August 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?