Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»चाकण औद्योगिक पट्ट्यात वाहतूक कोंडीवर ‘ॲक्शन प्लॅन’; ३१ ऑगस्टपर्यंत रस्ते दुरुस्तीचे निर्देश
पिंपरी चिंचवड

चाकण औद्योगिक पट्ट्यात वाहतूक कोंडीवर ‘ॲक्शन प्लॅन’; ३१ ऑगस्टपर्यंत रस्ते दुरुस्तीचे निर्देश

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comAugust 19, 2026No Comments5 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात कार्यान्वित यंत्रणा बैठक

 पार्किंगसाठी मोकळ्या जागांचा वापर; अतिक्रमणांवर महिनाभरात कारवाई, वाहतूक व्यवस्थेसाठी १०० एमएसएफ जवानांची नियुक्ती

हिंदवी न्यूज | पुणे 

चाकण औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, पार्किंग, अतिक्रमणे, वीजपुरवठा तसेच अन्य पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर विविध शासकीय यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय साधून कालबद्ध पद्धतीने उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्पष्ट कालमर्यादा व जबाबदाऱ्या निश्चित करून देण्यात आल्या.

या बैठकीला आमदार बाबाजी काळे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पीएमआरडीए, एम. आय.डी.सी, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर परिषद, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, एमएसआरडीसी, एमएसआयडीसी, जिल्हा परिषद या सर्व यंत्रणाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार चाकण औद्योगिक परिसरातील विविध प्रश्नांच्या समन्वयासाठी जिल्हाधिकारी व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत एमआयडीसी, एमएसआयडीसी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपरिषद, जिल्हा परिषद, महसूल व पोलीस विभागांसह विविध यंत्रणांच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. विविध यंत्रणा स्वतंत्रपणे काम करत असताना निर्माण होणारा समन्वयाचा अभाव दूर करून एकत्रितपणे उपाययोजना करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

 

३१ ऑगस्टपर्यंत रस्ते खड्डेमुक्त करण्याचे निर्देश

चाकण औद्योगिक परिसरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील खड्डे तसेच साइडपट्ट्यांची दुरुस्ती ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. कामात विलंब झाल्यास संबंधित सक्षम प्राधिकारी, अभियंता व कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

 

रस्त्यावरील पार्किंगला शुक्रवारपासून प्रतिबंध

चाकण परिसरातील वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण असलेल्या रस्त्यावरील अवजड वाहनांच्या पार्किंगवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. एमआयडीसी परिसरातील उपलब्ध मोकळ्या जागांचा पार्किंगसाठी वापर करण्यात येणार असून, तळेगावपासून भंडारा डोंगर परिसरापर्यंत उपलब्ध जागांचा नियोजनबद्ध वापर केला जाणार आहे. शुक्रवारपासून रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे वाहन पार्क करण्यास पूर्णतः प्रतिबंध राहणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर जप्तीसह कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी ‘झिरो टॉलरन्स’ धोरण अवलंबण्यात येणार आहे.

 

वाहतूक व्यवस्थेसाठी १०० एमएसएफ जवान

चाकण औद्योगिक परिसराचा मोठा भौगोलिक विस्तार लक्षात घेता पोलीस मनुष्यबळावरील ताण कमी करण्यासाठी १०० महाराष्ट्र सुरक्षा दलाचे (MSF) जवान पोलीस विभागाला उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. हे जवान दोन पाळ्यांमध्ये वाहतूक व्यवस्थापनासाठी कार्यरत राहतील. रस्त्यावर वाहन बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मोठ्या क्षमतेच्या क्रेनची व्यवस्था करण्यात येणार असून, बंद पडलेली वाहने तातडीने रस्त्याच्या बाजूला अथवा निर्धारित ठिकाणी हलविण्यात येतील.

 

अतिक्रमणांविरोधात कठोर कारवाई

चाकण औद्योगिक परिसरातील रस्त्यांवरील अनधिकृत टपऱ्या, चहाच्या स्टॉल्स, गोदामे व अन्य अतिक्रमणांची यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधितांना नियमानुसार नोटीस देऊन २५ ऑगस्टपासून पुढील एक महिन्यात अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

अतिक्रमण हटविल्यानंतर संबंधित जागेवर तातडीने रस्ता अथवा आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. कोणत्याही व्यक्तीचे अतिक्रमण राजकीय अथवा अन्य कोणत्याही कारणामुळे कारवाईतून वगळले जाणार नाही. याबाबतही ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राहणार असल्याचे जिल्हाधिकारी डुडी यांनी स्पष्ट केले.

 

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्थापन

चाकण परिसरातील सुमारे ५०० किलोमीटर रस्त्यांचे सर्वंकष नियोजन करण्यात येत असून, भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता व आधुनिक वाहतूक सिम्युलेशनच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यात येणार आहे. संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणून त्याचे व्यवस्थापन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून करण्याचे नियोजन आहे. यामुळे वाहतूक कोंडी, अपघात, बंद पडलेली वाहने आदी बाबींची माहिती तातडीने उपलब्ध होऊन त्यावर तत्काळ कार्यवाही करता येणार आहे.

 

पादचारी सुरक्षेला प्राधान्य

चाकण औद्योगिक परिसरातील रस्त्यांच्या विकासामध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी स्टॉर्म वॉटर ड्रेनेजसोबतच पादचाऱ्यांसाठी पदपथ, योग्य ठिकाणी पादचारी क्रॉसिंग आदी सुविधा विकसित करण्याचे नियोजन आहे. मागील काही काळात रस्त्यांवरील अपघातांमध्ये जीवितहानी झाल्याने पादचारी सुरक्षेला विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्गावरील अनधिकृत डिव्हायडर कट बंद करून वाहतूक सुरळीत करण्याचे निर्देशही संबंधित यंत्रणेला देण्यात आले. अनधिकृत ठिकाणी वाहनांना यू-टर्न घेण्यामुळे वाहतुकीचा वेग कमी होऊन अपघाताचा धोका वाढत असल्याने नियमानुसार आवश्यक त्या ठिकाणीच प्रवेश व वळणाची व्यवस्था ठेवण्यात येणार आहे.

वीजपुरवठ्याच्या प्रश्नावरही कालबद्ध कार्यवाही

औद्योगिक परिसरातील वीजपुरवठ्यातील वारंवार होणारे ट्रिपिंग व लोडशेडिंगच्या प्रश्नावरही बैठकीत चर्चा झाली. आवश्यक ट्रान्सफॉर्मर व अन्य विद्युत यंत्रणा उभारण्यासाठी एमआयडीसी परिसरातील आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यास शासनाची मंजुरी मिळाली असून, संबंधित कामे ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. दीर्घकालीन उपाययोजनांच्या माध्यमातून ३१ डिसेंबरनंतर औद्योगिक परिसरातील ट्रिपिंग व लोडशेडिंगची समस्या दूर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

विकासकामांपूर्वी वाहतूक आराखडा आवश्यक

राष्ट्रीय महामार्ग, एमएसआयडीसी, रेल्वे आदी विविध यंत्रणांची आगामी कामे सुरू होणार आहेत. ही कामे सुरू करताना वाहतुकीवर अतिरिक्त ताण निर्माण होऊ नये यासाठी पर्यायी मार्ग, वाहतूक वळविण्याची व्यवस्था आणि वाहतूक सिम्युलेशनचा अभ्यास करूनच संबंधित विभागांना काम सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. नाशिक फाटा ते पुढील भागासाठी प्रस्तावित सुमारे २८ किलोमीटर लांबीच्या उन्नत मार्गाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली. या प्रकल्पामुळे भविष्यात चाकण परिसरातील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे म्हणाले की, मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार झालेल्या बैठकीत चाकण औद्योगिक परिसरातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. अल्प, मध्यम व दीर्घकालीन उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले असून सर्व संबंधित यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे.

रस्त्यांवरील खड्डे व साइडपट्ट्यांची दुरुस्ती, उपलब्ध मोकळ्या जागांमध्ये पार्किंगची व्यवस्था, अतिक्रमण हटविण्यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त, डिव्हायडर कट बंद करणे आदी उपाययोजनांमुळे वाहतुकीचा वेग वाढण्यास मदत होईल. संबंधित यंत्रणांनी मागणी केल्यानंतर आवश्यक पोलीस मनुष्यबळ तत्काळ उपलब्ध करून देण्यात येईल. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्थापन व वाहतूक सिम्युलेशन करण्याबाबतही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

*चाकण औद्योगिक परिसरातील प्रश्नांच्या* निराकरणासाठी ठरविण्यात आलेल्या कालमर्यादेनुसार पुढील काही दिवसांत प्रत्यक्ष परिणाम दिसून येतील, असा विश्वास जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी व्यक्त केला. तसेच माध्यमांनीही या उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवून वस्तुनिष्ठ अभिप्राय द्यावा, जेणेकरून आवश्यक त्या सुधारणा तत्काळ करता येतील, असे आवाहन त्यांनी केले.

Chakan industrial area
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article“उद्धव श्री” पुरस्काराचे वितरण शुक्रवारी खासदार संजय राऊत आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते – चेतन पवार
Next Article स्थायी समितीच्या सभेत पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, आरोग्य सेवा आणि कौशल्य प्रशिक्षणासह महत्त्वपूर्ण  निर्णयांना मंजुरी
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026

महापालिका सभेत मनोज सेठिया यांचा सत्कार

August 23, 2026

हाऊसफुल्ल’ तुकाराम मुंढे… ‘भेसळमुक्त महाराष्ट्राचा निर्धार’

August 23, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 27, 20260
Spread the love

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि सिद्धिविनायक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गायक, संगीतकार यांना दरवर्षी प्रदान करण्यात येतो.

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026

महापालिका सभेत मनोज सेठिया यांचा सत्कार

August 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?