Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

सौ उमाताई खापरे (आमदार, विधान परिषद महाराष्ट्र), यांचा महिलांना स्वतःला ओळखा, पुढे जा आणि इतरांना सक्षम करण्याचा संदेश!!

October 12, 2026

आदर्श मानवी मूल्यांची संस्कार गाथा म्हणजे ज्ञानेश्वरी -ह .भ .प प्रकाश काळे महाराज

October 11, 2026

आळंदीतील नरसिंह सरस्वती स्वामी महाराज चौकातील दुकानास लागलेल्या आगीत दुकानाचे प्रचंड नुकसान

October 11, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना राज्य शासनाप्रमाणे निवृत्ती वेतनाचे (पेन्शन) लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा!
पिंपरी चिंचवड

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना राज्य शासनाप्रमाणे निवृत्ती वेतनाचे (पेन्शन) लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा!

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comAugust 28, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

कर्मचाऱ्यांना ६ महिन्यांच्या कालावधीत निवृत्ती वेतनाचे लाभ देण्याचे स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांचे PMPML प्रशासनाला निर्देश

२९ वर्षांच्या प्रदीर्घ कायदेशीर लढ्याला ऐतिहासिक यश; निवृत्त कर्मचाऱ्यांनी मानले सभापती अभिषेक बारणे यांचे आभार

हिंदवी न्यूज | पिंपरी

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपीएल) हजारो सेवकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. पीएमपीएल कर्मचाऱ्यांना आता राज्य शासनाच्या नियमांप्रमाणे निवृत्ती वेतनाचे (पेन्शन) लाभ मिळण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. माननीय उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने दिलेल्या ऐतिहासिक निकालाची तात्काळ अंमलबजावणी करून संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना येत्या ६ महिन्यांच्या कालावधीत निवृत्ती वेतनाचे सर्व लाभ अदा करावेत, असे निर्देश पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती तथा पीएमपीएलचे संचालक अभिषेक बारणे यांनी पीएमपीएमएल प्रशासनाला दिले आहेत.

*PMPML प्रशासनाला पत्राद्वारे कडक सूचना व पाठपुरावा*

या महत्त्वपूर्ण प्रकरणात स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी स्वतः विशेष पुढाकार घेतला आहे. त्यांनी पीएमपीएलच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना (CMD) अधिकृत पत्र पाठवून न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितले आहे. माननीय उच्च न्यायालयाने याचिका क्र. ५६२७/२०१३ वर दिलेल्या निर्णयानुसार, ६ महिन्यांच्या विहित कालावधीत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनाचे लाभ मिळणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहे. त्यामुळे प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता तातडीने आवश्यक ती नियमाधीन कारवाई करावी, अशा कडक सूचना सभापती बारणे यांनी पत्राद्वारे केल्या आहेत.

*२९ वर्षांचा प्रदीर्घ लढा आणि न्यायालयीन पार्श्वभूमी

पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि शिक्षण मंडळातील कर्मचाऱ्यांना नियमितपणे निवृत्ती वेतनाचे (पेन्शन) लाभ मिळतात. मात्र, पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना या लाभांपासून वंचित राहावे लागल्यामुळे निवृत्तीनंतर त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढवत होते. या न्याय्य हक्कासाठी कर्मचाऱ्यांनी तब्बल २९ वर्षे संघर्ष केला.

कर्मचाऱ्यांच्या या लढ्याला सर्वप्रथम २ मे २०१३ रोजी यश आले, जेव्हा औद्योगिक न्यायालय (पुणे) यांनी कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्याचे आदेश दिले. या निकालाविरुद्ध पीएमपीएमएल प्रशासनाने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. परंतु, उच्च न्यायालयाने प्रशासनाची याचिका फेटाळून लावत कर्मचाऱ्यांच्या बाजूने कौल दिला आणि ६ महिन्यांच्या आत निवृत्ती वेतनाचे लाभ वितरित करण्याचे स्पष्ट आदेश दिले.

*निवृत्त कर्मचाऱ्यांकडून अभिषेक बारणे यांचा सत्कार

न्यायालयाचा निर्णय कर्मचाऱ्यांच्या बाजूने लागल्यानंतर आणि सभापती अभिषेक बारणे यांनी प्रशासनाला ६ महिन्यांत कार्यवाही करण्याचे निर्देश देऊन पत्राद्वारे पाठपुरावा सुरू केल्याचे समजताच, निवृत्त कर्मचाऱ्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत एकत्र येत जल्लोष केला. आज निवृत्त कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने सभापती अभिषेक बारणे यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचा भावूक वातावरणात सत्कार केला व खंबीर पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

 

“पीएमपीएलचे कर्मचारी हे पुणे व पिंपरी-चिंचवड शहराच्या सार्वजनिक वाहतुकीचा मुख्य कणा आहेत. महापालिकेच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच पीएमपीएलच्या कर्मचाऱ्यांनाही राज्य शासनाच्या नियमानुसार निवृत्ती वेतनाचे लाभ मिळणे हा त्यांचा हक्क होता. २९ वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर मिळाjलेला हा विजय अत्यंत ऐतिहासिक आहे. माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांना ६ महिन्यांच्या कालावधीत पेन्शनचे लाभ मिळालेच पाहिजेत, यासाठी मी PMPML प्रशासनाला पत्राद्वारे स्पष्ट सूचना दिल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आमचे सरकार आणि प्रशासन सदैव खंबीरपणे उभे आहे.”

– अभिषेक बारणे, सभापती-स्थायी समिती, पिं. चिं. महापालिका.

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपीएल)
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleजोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप
Next Article मुक्ताई तर्फे आळंदी मंदिरात माउलींना रक्षाबंधन दिनी परंपरेने राखी अर्पण
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

सौ उमाताई खापरे (आमदार, विधान परिषद महाराष्ट्र), यांचा महिलांना स्वतःला ओळखा, पुढे जा आणि इतरांना सक्षम करण्याचा संदेश!!

October 12, 2026

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

सौ उमाताई खापरे (आमदार, विधान परिषद महाराष्ट्र), यांचा महिलांना स्वतःला ओळखा, पुढे जा आणि इतरांना सक्षम करण्याचा संदेश!!

By Hindavinewsnetwork@gmail.comOctober 12, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज | पिंपरी  महिलांनी स्वतःमधील दुर्गाशक्ती ओळखून स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा, स्वावलंबी बनावे आणि…

आदर्श मानवी मूल्यांची संस्कार गाथा म्हणजे ज्ञानेश्वरी -ह .भ .प प्रकाश काळे महाराज

October 11, 2026

आळंदीतील नरसिंह सरस्वती स्वामी महाराज चौकातील दुकानास लागलेल्या आगीत दुकानाचे प्रचंड नुकसान

October 11, 2026

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

October 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?