Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास

November 9, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!

November 8, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»पाणी बचतीसाठी महापालिकेच्या सर्व विभागांनी दक्षता घ्यावी, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे विभागांना निर्देश
पिंपरी चिंचवड

पाणी बचतीसाठी महापालिकेच्या सर्व विभागांनी दक्षता घ्यावी, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे विभागांना निर्देश

पाणी बचतीसाठी महापालिकेच्या विशेष उपाययोजना; निष्काळजीपणा करणाऱ्यांवर केली जाणार शिस्तभंगाची कारवाई
Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comOctober 26, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

हिंदवी न्यूज  | 

पिंपरी,दि.२३ ऑक्टोबर २०२६ : पाणी बचत करण्यासोबतच पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व संबंधित विभागांना तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. याबाबतचे परिपत्रक आयुक्तांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहे.

पाणी बचत व पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी देण्यात आलेल्या निर्देशांची अंमलबजावणी संबंधित विभागप्रमुखांनी त्यांच्या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत करून घ्यावी. तसेच, या कामात दुर्लक्ष किंवा निष्काळजीपणा केल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड शहरासाठी पवना धरणातून ६.५५ टीएमसी, भामा आसखेड धरणातून २.१५ टीएमसी व आंद्रा धरणातून १.२९ टीएमसी असे एकूण ९.९९ टीएमसी पाणी आरक्षण मंजूर आहे. शहराची अंदाजित लोकसंख्या ३८ लाख असून, शहरात दररोज सुमारे ६५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा उपलब्ध होत असून, सध्या वितरण व्यवस्थेनुसार शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

पवना धरणामध्ये १४ ऑक्टोबर २०२६ अखेर ९७.१७ टक्के, तर आंद्रा धरणामध्ये ९५.८० टक्के पाणीसाठा होता. सप्टेंबर २०२६ मध्ये परतीचा पाऊस न झाल्याने उपलब्ध पाणीसाठा व मागील वर्षाचा अनुभव विचारात घेऊन पाणी बचतीच्या अनुषंगाने विविध उपाय योजना राबवण्याचे निर्देश आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी दिले आहेत. यामध्ये महापालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत, क्षेत्रीय कार्यालये, रुग्णालये, शाळा, भाजी मंडई तसेच महापालिकेच्या इतर इमारतींमधील नळ व पाणीपुरवठा उपकरणांची तपासणी करावी. पाणीगळती आढळल्यास तातडीने दुरुस्ती करून पाण्याचा अपव्यय टाळावा, असे निर्देश स्थापत्य व पाणीपुरवठा विभागांना देण्यात आले आहेत.

 

तर शिक्षण विभागाने शाळांमधून विद्यार्थ्यांमध्ये पाणी बचतीविषयी जनजागृती करावी. आरोग्य विभागाने सार्वजनिक स्वच्छतागृहांसह विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या इतर ठिकाणी गरजेपेक्षा अधिक पाणी वापरले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. क्रीडा विभागाने मैदानांवर पाणी फवारण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर टाळून आवश्यकतेनुसार प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर संबंधित विभागाशी समन्वय साधून करावा आणि उद्यान विभागाने देखील झाडांना पाणी देण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर टाळून प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर करण्याचे नियोजन करावे, अशा सूचनाही परिपत्रकात देण्यात आल्या आहेत.

पाणी गळतीच्या तक्रारींचे तातडीने निराकरण महापालिकेच्या सर्व इमारतींमधील पाणीगळतीची नियमित तपासणी करणे, आढळलेली गळती संबंधित विभागास तात्काळ कळवून दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करणे आणि दुरुस्तीनंतरही गळती होणार नाही, यासाठी सातत्याने देखरेख ठेवणे, अशा सूचनाही सर्व संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. याशिवाय, पाणीपुरवठा विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या समन्वयाने भौगोलिक स्थानाच्या आधारे (जीपीएस) पाणीगळतीच्या तक्रारी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. प्राप्त तक्रारींचे वेळेत निराकरण करून दुरुस्तीनंतर पुन्हा गळती होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय, पाण्याचा अपव्यय रोखण्यामध्ये प्रभावी कामगिरी करणाऱ्या प्लंबरचा सत्कार करण्यात यावा, अशा सूचनाही संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.

‐‐———

🗣💬पाणी बचतीसाठी प्रत्येक विभागाने आपल्या कार्यक्षेत्रात नियमित तपासणी करून आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. शाळा, उद्याने, सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि अन्य महापालिका आस्थापनांमध्ये पिण्याच्या पाण्याचा अनावश्यक वापर होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. गळतीच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करून पाणी बचतीच्या उपाययोजनांचा नियमित आढावा घेण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत.

– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Pani bachat dr vijay suryawanshi
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleकालिदासाचे शिल्प अधिकृत व्हावे – शरद पवार
Next Article भीमाशंकरचे ६०० एकर जंगल तोडून विद्युत प्रकल्प उभारण्यास तीव्र विरोध
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास

November 9, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!!!

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

November 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास

By Hindavinewsnetwork@gmail.comNovember 9, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज | पुणे  माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या महत्त्वाकांक्षी मेट्रो मार्गाला प्रवासी सेवा सुरू झाल्याच्या…

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

November 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?