Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

‘संविधान सन्मान दौड’मधून समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाचा संदेश- आमदार शंकर जगताप

November 28, 2026

संविधानाचा सन्मान, लोकशाहीचा अभिमान! ‘संविधान सन्मान दौड २०२६’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

November 28, 2026

फिनिक्स अग्निशिखा फाऊंडेशनतर्फे ५० गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

November 28, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»‘संविधान सन्मान दौड’मधून समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाचा संदेश- आमदार शंकर जगताप
पिंपरी चिंचवड

‘संविधान सन्मान दौड’मधून समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाचा संदेश- आमदार शंकर जगताप

संविधानाच्या सन्मानासाठी धावले पिंपरी-चिंचवडकर!
Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comNovember 28, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

– आमदार शंकरभाऊ जगताप स्पोर्ट्स फाऊंडेशन व पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे आयोजन

– चिंचवड ते भीमसृष्टी ‘संविधान सन्मान दौड’

हिंदवी न्यूज | पिंपरी 

संविधान दिनानिमित्त पिंपरी-चिंचवडकरांनी गुरुवारी सकाळी चिंचवड ते पिंपरी अशी ‘संविधान सन्मान दौड’ पूर्ण केली. आमदार शंकरभाऊ जगताप स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या दौडमधून संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूल्ये दैनंदिन जीवनात जपण्याचा संदेश देण्यात आल्याचे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले.

चिंचवडमधील क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके स्मारक चौकातून गुरुवारी सकाळी सात वाजता दौडला सुरुवात झाली. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील भीमसृष्टी येथे दौडचा साडे दहा वाजण्याच्या सुमारास समारोप झाला. आज दौडच्या निमित्ताने हजारो जणांनी सहभाग घेतला. यावेळी महापौर रवी लांडगे, उपमहापौर शैलजा बाबर, आमदार अमित गोरखे, उमा खापरे, स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी उपमहापौर तुषार हिंगे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी तसेच नगरसेवक, पदाधिकारी व महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

या निमित्ताने बोलताना आमदार शंकर जगताप म्हणाले, २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने भारतीय संविधान स्वीकारले. त्या दिवसाचे स्मरण करतानाच संविधानाने दिलेले अधिकार आणि नागरिक म्हणून आपली कर्तव्ये यांची जाणीव वाढवणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता. मतभेद असले तरी एकमेकांच्या मताचा आदर करणे आणि प्रत्येकाला समानतेने वागवणे, यातून संविधानाची मूल्ये रोजच्या व्यवहारात उतरतात, हा विचार दौडच्या निमित्ताने अधोरेखित करण्यात आला.

संविधान दिन साजरा करण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे ८५ वर्षीय अशोक बेलापूरकर यांनी सहभाग घेतला. चिंचवड ते पिंपरी या ‘संविधान सन्मान दौड’मध्ये ते इतर सहभागींच्या बरोबरीने उत्साहाने धावले. वयाच्या ८५व्या वर्षीही त्यांनी या उपक्रमात घेतलेला सहभाग लक्षवेधी ठरला. आपल्या कृतीतून त्यांनी संविधानाचा जागर केला.

—————————-

 “संविधानाचा सन्मान केवळ एका दिवसापुरता मर्यादित राहू नये. लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येक नागरिकाचे म्हणणे ऐकणे आणि कोणताही भेदभाव न करता त्याचे प्रश्न सोडवणे, ही माझी जबाबदारी आहे. आज आपण संविधानासाठी एकत्र धावलो; आता समता आणि बंधुता आपल्या रोजच्या वागण्यात जपूया. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तेच खरे अभिवादन ठरेल.”

-*शंकर जगताप* आमदार, चिंचवड विधानसभा.

‘संविधान सन्मान दौड’
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसंविधानाचा सन्मान, लोकशाहीचा अभिमान! ‘संविधान सन्मान दौड २०२६’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

संविधानाचा सन्मान, लोकशाहीचा अभिमान! ‘संविधान सन्मान दौड २०२६’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

November 28, 2026

फिनिक्स अग्निशिखा फाऊंडेशनतर्फे ५० गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

November 28, 2026

ज्येष्ठ नागरिकांचे बहारदार कविसंमेलन, ज्येष्ठांनी सादर केली आयुष्यातील पहिली कविता

November 28, 2026

झाडे तोडू नका! पर्यावरण अभ्यासक तानाजी एकोंडे यांचे आवाहन

November 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

‘संविधान सन्मान दौड’मधून समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाचा संदेश- आमदार शंकर जगताप

By Hindavinewsnetwork@gmail.comNovember 28, 20260
Spread the love

– आमदार शंकरभाऊ जगताप स्पोर्ट्स फाऊंडेशन व पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे आयोजन – चिंचवड ते भीमसृष्टी ‘संविधान…

संविधानाचा सन्मान, लोकशाहीचा अभिमान! ‘संविधान सन्मान दौड २०२६’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

November 28, 2026

फिनिक्स अग्निशिखा फाऊंडेशनतर्फे ५० गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

November 28, 2026

ज्येष्ठ नागरिकांचे बहारदार कविसंमेलन, ज्येष्ठांनी सादर केली आयुष्यातील पहिली कविता

November 28, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?