Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

संत तुकाराम नगर पिंपरी येथील म्हाडाच्या ४० वर्षांच्या जीर्ण वसाहतीचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; ९४१ कुटुंबांना ९२५ ते १२२५ चौ.फुटांची घरे मिळणार !

November 29, 2026

संत निरंकारी मिशनतर्फे भोसरी येथे रक्तदान शिबीर

November 28, 2026

आळंदी कार्तिकी यात्रेसाठी १ ते ८ डिसेंबर कालावधीत वाहतुकीत बदल

November 28, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»संत तुकाराम नगर पिंपरी येथील म्हाडाच्या ४० वर्षांच्या जीर्ण वसाहतीचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; ९४१ कुटुंबांना ९२५ ते १२२५ चौ.फुटांची घरे मिळणार !
पिंपरी चिंचवड

संत तुकाराम नगर पिंपरी येथील म्हाडाच्या ४० वर्षांच्या जीर्ण वसाहतीचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; ९४१ कुटुंबांना ९२५ ते १२२५ चौ.फुटांची घरे मिळणार !

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comNovember 29, 2026Updated:November 29, 2026No Comments5 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love
कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या अथक प्रयत्नास यश 
रहिवाशांचे करोडो रुपयांचे आर्थिक नुकसानही टळले!

हिंदवी न्यूज | पिंपरी 

संत तुकाराम नगर सहकारी गृहचना संस्था मर्यादित व संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान, संत तुकाराम नगर, पिंपरी यांच्या वतीने आयोजित द्वितीय दीपावली उत्सव व दीप महोत्सवाच्या निमित्ताने संस्थेच्या अभिमानास्पद वाटचालीचा आणि सर्व सदनिकांच्या पुनर्विकास प्रकल्पाचा आढावा नुकताच घेण्यात आला.

संस्थेचे अध्यक्ष तथा कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांनी ९४१ सदनिकाधारक व २३ दुकानदारांसमोर प्रकल्पाची माहिती मांडताना, ४० वर्षांपासून जीर्ण अवस्थेत असलेल्या वसाहतीच्या पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झाला असून रहिवाशांना मोठ्या आणि आधुनिक घरांचे स्वप्न साकार होणार असल्याचे सांगितले. संत तुकाराम महाराज सभामंडप संत तुकाराम नगर, या ठिकाणी संपन्न झालेल्या दीपोत्सव सोहळ्यात ते बोलत होते.

प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार अमर साबळे, नगरसेवक सचिन साठे,माजी नगरसेवक बबनराव गाढवे,शिक्षण मंडळाचे माजी सभापती दत्तात्रय गणपतराव धाडगे, नंदू आप्पा कदम आदी उपस्थित होते. याप्रसंगी गाळेधारकांनी गायनाच्या कार्यक्रमाचा ही आनंद लुटला.यावेळी नवनिर्वाचित स्वीकृत नगरसेवक सचिन साठे यांचा सत्कार करण्यात आला.

कामगारनेते यशवंतभाऊ भोसले म्हणाले की,पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ अर्थात म्हाडाच्या जागेवर ९४१ सदनिका आणि २३ दुकाने असून, या वसाहतीत बजाज, टेल्को, महिंद्रा तसेच विविध लहान-मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणारा श्रमिक वर्ग १९८५ पासून वास्तव्यास आहे. मात्र, गेल्या चार दशकांत इमारतींची अवस्था अत्यंत जीर्ण झाली. वॉशरूममधून गळती, पावसाळ्यात छत गळणे, छताचे भाग कोसळणे आणि घरांच्या सुरक्षिततेबाबत भीती निर्माण होऊ लागल्याने रहिवाशांनी पुनर्विकासाची मागणी केली होती.म्हाडाकडून पुनर्विकासाची प्रतीक्षा करण्याऐवजी नव्या कायद्यातील तरतुदींचा लाभ घेऊन सोसायटी स्थापन करत पुनर्विकासासाठी स्वतः पुढाकार घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ९४१ सदनिकाधारकांना एकत्र आणून दीड वर्षांच्या अथक प्रयत्नांत कन्व्हेन्स डीड प्रक्रियेसाठी अर्ज, आवश्यक कागदपत्रे आणि विविध शासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या, त्यावर पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ मुख्य अधिकारी व सोसायटी अध्यक्ष यांच्यामध्ये अभी हस्तांतरण कागदपत्रांवर स्वाक्षरी झाल्याचे त्यांनी जाहीर केले, लोकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले, त्यांनी टाळ्या वाजवून व फटाकडे फोडून आनंद साजरा केला.

या प्रक्रियेत 70% सदनिकाधारकांचे भुईभाडे, मुद्रांक शुल्क, अकृषक कर, हस्तांतरण फी इत्यादी सुमारे 30 ते 32 कोटी रुपयांपर्यंत ची रक्कम म्हाडास देणे असल्याने या हस्तांतरण प्रक्रिया मध्ये अडथळा येत होता, शासनाच्या विविध सवलती आणि योजनांचा लाभ मिळवून हा आर्थिक भार सर्वसामान्य सदनिकाधारकांवर पडू दिला नाही.अकृषक (एन.ए.) कर, मुद्रांक शुल्क आणि भुईभाडे याबाबत जुन्या दरांचा लाभ मिळाल्यामुळे रहिवाशांचे अंदाजे ३0ते ३2 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान टळले. यासाठी महाराष्ट्र शासन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या वेळी यशवंतभाऊ भोसले यांनी आभार मानले.

पुनर्विकासानंतर १९८ चौ.फुटांच्या सदनिकाधारकांना सुमारे ९०० ते ९२५ चौ.फुटांचे २ बीएचके घर, तर २८० चौ.फुटांच्या सदनिकाधारकांना सुमारे १२०० ते १२२५ चौ.फुटांचे घर मिळणार आहे. सर्वसामान्य श्रमिक कुटुंबांना मोठ्या घरात राहण्याची संधी मिळणे हा त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असून, हा प्रकल्प म्हणजे सामान्य माणसाच्या स्वप्नपूर्तीचा चमत्कार असेल.

पुनर्विकास प्रक्रियेनुसार ९२५ व १२२५ चौ.फुटांच्या घरांचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. प्रकल्पाशी संबंधित प्रलंबित आर्थिक बाबींचाही बिल्डरच्या सहभागातून मार्ग काढण्यात आला असून, कन्व्हेन्स डीडवर नुकत्याच स्वाक्षऱ्या झाल्या असून प्रॉपर्टी कार्डवर सोसायटीचे नाव नोंद झाल्यानंतर रहिवाशांच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण प्रकल्पाची अधिकृत माहिती दिली जाणार आहे असेही यशवंतभाऊ भोसले यांनी सांगितले ते पुढे म्हणाले या प्रकल्पात शासनाने नियमित देखरेख आणि तपासणी करावी, तसेच निविदेनुसार मंजूर करण्यात आलेल्या सुविधा आणि जागा प्रत्यक्षात रहिवाशांना मिळतात का,याची खात्री करावी. पुनर्विकासाच्या या प्रवासात पत्रकार बांधव, शासन, सर्व रहिवासी आणि सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करत, जमीनीचा ताबा मिळताच येत्या पुढील साडेतीन वर्षांत रहिवाशांचे नव्या घरात स्थलांतर होण्याची अपेक्षा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी व्यक्त केली.

संत तुकाराम नगर सहकारी गृह रचना संस्थेच्या पुनर्विकासासाठी यशवंतभाऊ भोसले यांनी केलेला संघर्ष प्रेरणादायी असून, त्यांच्या नेतृत्वामुळे ९४१ कुटुंबांच्या घरांचे स्वप्न साकार होत आहे.संस्थेतील सर्वधर्मीय एकता, सामूहिक ताकद आणि रहिवाशांची एकजूट ही राष्ट्रीय एकात्मतेचे आदर्श उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक बिल्डरांनी पुनर्विकासाच्या प्रस्तावाला नकार दिला असताना, १८० ते १९८ चौ.फुटांच्या घरांसाठी सुमारे ९०० ते ९२५ चौ.फुटांचे, तर २८० चौ.फुटांच्या घरांसाठी १२०० ते १२२५ चौ.फुटांचे घर देण्याची भूमिका यशवंतभाऊंनी यशस्वी करून दाखवली. सर्व ९४१ घरे महिलांच्या नावावर करण्याचा ठराव करावा. तसेच भविष्यात या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणण्याची जबाबदारी स्वीकारत माजी खासदार अमर साबळे यांनी रहिवाशांचे अभिनंदन केले.

संत तुकाराम नगरच्या ९४१ सदनिका व २३ दुकानांच्या पुनर्विकासासाठी यशवंतभाऊ भोसले व रहिवाशांनी केलेल्या प्रयत्नांचे नवनिर्वाचित स्वीकृत नगरसेवक सचिन साठे यांनी कौतुक केले.यशवंतभाऊ भोसले हे संकटांवर मात करणारे, कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आणि समाजकारणात आदर्श नेतृत्व असल्याचे त्यांनी गौरवोद्गार काढले. ४० वर्षांच्या वास्तव्याला नवी दिशा देणाऱ्या पुनर्विकास प्रकल्पामुळे रहिवाशांना सुरक्षित घरे मिळणार असून, नव्या इमारती पुढील ४०० वर्षे टिकाव्यात,अशी संत तुकाराम महाराजांच्या चरणी प्रार्थना केली. तसेच सामान्य नागरिक व कार्यकर्त्यांच्या प्रश्नांसाठी सदैव मदतीला उभे राहण्याची ग्वाही त्यांनी दिली व केलेल्या सरकारबद्दल त्यांनी संत तुकाराम नगर येथील नागरिकांचे व सोसायटीचे आभार मानले.

उपाध्यक्ष ओंकारजी झोकारे, कार्याध्यक्ष अंकुशजी वाघमारे, सरचिटणीस अप्पुकुट्टन नारायण नायर, खजिनदार मानसीताई देशपांडे, इस्मत सुलताना सैयद, फौजदार शंकरराव गायकवाड, विनायकराव निकम, सुदामराव गायकवाड, मल्लेजी कोरवी, अंकुशराव गायकवाड, आप्पासाहेब माने, राजारामजी भोंडवे, शालिनताई महापुरे, रावसाहेबजी पावळे, गणेशजी गुलदगड, अरुणाताई भंडारी, आरतीताई पराळे, झेवियर अँथनी, शंकरराव शितोळे, सतीशराव सासवड, मनोजजी नांदे, सुधाकरजी कान्होजी शिंदे, संतोषीताई चौधरी, राजेंद्रजी पाटील, शहनाजजी नासीर मौलवी, शिरीषजी सासवडे, योगेंद्रजी आरवडे, किसनजी भाग्यवंत, हेमंतजी जाधव, दत्तात्रय झरकर, लताताई पाटील, कैलासराव गव्हाणे, महेशजी भुते, दगडू लोंढे, नंदकिशोर जोशी, दत्तात्रय शिंदे, उषाताई टाकळकर, चंद्रकांत भालेराव, सनाताई शेख, श्रेयसजी करे व सर्व संस्थेचे सल्लागार संचालक तसेच सर्व 941 गाळेधारक कार्यक्रमाला उपस्थित होते. संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदू आप्पा कदम यांनी सूत्रसंचालन केले, मनोज नांदे यांनी प्रस्तावना मांडली, राहुल शितोळे यांनी आभार मानले, युवा नेते दिपक शेठ पाटील, अमोलजी घोरपडे, राष्ट्रीय श्रमिक विद्यार्थी युवा आघाडीचे दिनेशभाऊ पाटील,राहुल शितोळे आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

mhada-redevelopment-sant-tukaram-nagar-pimpri-941-families
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसंत निरंकारी मिशनतर्फे भोसरी येथे रक्तदान शिबीर
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

संत निरंकारी मिशनतर्फे भोसरी येथे रक्तदान शिबीर

November 28, 2026

चिंचवड मतदारसंघातील वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार- आमदार शंकर जगताप

November 28, 2026

‘संविधान सन्मान दौड’मधून समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाचा संदेश- आमदार शंकर जगताप

November 28, 2026

संविधानाचा सन्मान, लोकशाहीचा अभिमान! ‘संविधान सन्मान दौड २०२६’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

November 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

संत तुकाराम नगर पिंपरी येथील म्हाडाच्या ४० वर्षांच्या जीर्ण वसाहतीचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; ९४१ कुटुंबांना ९२५ ते १२२५ चौ.फुटांची घरे मिळणार !

By Hindavinewsnetwork@gmail.comNovember 29, 20260
Spread the love

कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या अथक प्रयत्नास यश  रहिवाशांचे करोडो रुपयांचे आर्थिक नुकसानही टळले! हिंदवी…

संत निरंकारी मिशनतर्फे भोसरी येथे रक्तदान शिबीर

November 28, 2026

आळंदी कार्तिकी यात्रेसाठी १ ते ८ डिसेंबर कालावधीत वाहतुकीत बदल

November 28, 2026

चिंचवड मतदारसंघातील वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार- आमदार शंकर जगताप

November 28, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?