Author: Hindavinewsnetwork@gmail.com

पिंपरी (हिंदवी न्यूज) :  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत  शहरातील विविध विकासकामे व विभागनिहाय प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे होते.          यावेळी स्थायी समिती सदस्य शालिनी गुजर, मनीषा चिंचवडे, संदीप कस्पटे, सारिका गायकवाड, योगिता नागरगोजे, कृष्णा सुरकुले, अर्चना करांडे, मधुरा शिंदे, बाबासाहेब त्रिभुवन, सविता आसवानी, शीतल वर्णेकर, संतोष कोकणे, संदीप वाघेरे, विकास साने, सुलभा उबाळे यांच्यासह नगरसचिव मुकेश कोळप, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, विक्रांत बगाडे तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.          बैठकीत शहरातील विविध विकासकामांशी संबंधित प्रस्तावांवर चर्चा…

Read More

पिंपरी (हिंदवी न्यूज) : प्रणाली प्रकाशन आणि न्यू इंग्लिश स्कूल, माण यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी ( दि. २७ मार्च) रोजी न्यू इंग्लिश स्कूल, माण विद्यालयात लेखिका कल्पना चांदमल बंब यांच्या ‘शब्दांशी जोडले नाते’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  कु. मिसबाह शफिक खान ( इयत्ता ११ वी) होत्या. प्रमुख अतिथी कु. रेश्मा राकेश प्रजापती ( इयत्ता ११ वी), कु. अर्पिता भाऊराव पवार ( इयत्ता ९ वी )  या विद्यार्थ्यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी प्रणाली प्रकाशनच्या शामला पंडित – दीक्षित, न्यू इंग्लिश स्कूल, माण  विद्यालयाचे मुख्याध्यापक  अंबादास रोडे, ज्येष्ठ साहित्यिक नारायण कुंभार, लेखिका कल्पना बंब तसेच…

Read More

पिंपरी (हिंदवी न्यूज) : दिव्यांग बांधवांसाठी उभारण्यात आलेले दिव्यांग भवन हे केवळ सुविधा केंद्र नसून त्यांना सन्मानाने आणि आत्मविश्वासाने जगण्यासाठीचा भक्कम आधार ठरत आहे. येथे उपलब्ध  असलेल्या सोयी-सुविधा व फाऊंडेशनच्या वतीने राबविण्यात येणारे उपक्रम प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. मोरवाडी येथील दिव्यांग भवन येथे महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या संचालक मंडळाची बैठक  पार पडली. यावेळी ते बोलत होते.  बैठकीला विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, दिव्यांग भवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, उपायुक्त ममता शिंदे, सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे, मुख्य कार्यकारी…

Read More

पिंपरी (हिंदवी न्यूज)  :  पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत ज्या विकसकांनी फ्लॅटधारकांना ताबा देण्यापूर्वी पाणीपुरवठ्याची जबाबदारी स्वीकारत लेखी हमीपत्र दिले आहे, त्यांनी ती जबाबदारी काटेकोरपणे पार पाडणे बंधनकारक आहे. संबंधित जबाबदारीकडे दुर्लक्ष केल्यास किंवा पाणीपुरवठ्याचा अन्यायकारक आर्थिक भार सोसायट्यांवर टाकल्यास महापालिका संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करेल, असा  इशारा पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला. मुंबई उच्च न्यायालयातील १० एप्रिल २०२३ रोजीच्या जनहित याचिकेच्या अनुषंगाने पाणीपुरवठ्याबाबत स्थापन करण्यात आलेल्या समितीची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी ते बोलत होते. पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, सह शहर…

Read More

पथनाट्यातून  जनजागृती. पिंपळे गुरव (हिंदवी न्यूज) : पिंपळे गुरव येथील दिलासा संस्था, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या सेवाभावी संस्थांच्या वतीने  येथील राजमाता  जिजाऊ उद्यानात  जागतिक जलदिन साजरा करण्यात आला. यावेळी पथनाटया द्वारे  पाणी वाचवा, पाणी म्हणजे श्वास ,जगण्याचा विश्वास , पाणी जपून वापरा असा संदेश देउन जनजागृती करण्यात आली. पथनाट्यात भारतरत्न सरदार वल्लभ भाई पटेल प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज पाटील, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थेचे अध्यक्ष आण्णा जोगदंड, पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समितीचे अध्यक्ष प्रकाश घोरपडे, सौ,वैशाली चौधरी,दिलासा संस्थेचे नंदकुमार कांबळे सहभागी झाले होते. या प्रसंगी  दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी ” पाणी हे सर्व जीवसृष्टीसाठी पृथ्वीवरील अमृत…

Read More

पिंपरी (हिंदवी न्यूज)  पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठांचा अनुभव, त्यांची जिद्द व समाजाशी असलेली नाळ ही आपल्या शहराची मौल्यवान ताकद आहे, तर लहान मुलांचा उत्साह, गुणवत्ता आणि नवे विक्रम घडविण्याची क्षमता हे शहराच्या उज्ज्वल भविष्याचे आश्वासन आहे. एका बाजूला आयुष्यभर शिस्त, सातत्य आणि चिकाटी जपणारे ज्येष्ठ, तर दुसऱ्या बाजूला क्रीडा, बुद्धिमत्ता आणि कौशल्याच्या जोरावर मोठी स्वप्ने साकार करणारी आपली मुले, हा पिंपरी चिंचवडचा सर्वात प्रेरणादायी चेहरा आहे. अशा व्यक्तींचा सन्मान म्हणजे केवळ त्यांच्या यशाचा गौरव नसून, संपूर्ण समाजाला प्रेरणा देणारा व नव्या पिढीला दिशा देणारा संदेश आहे. आपल्या शहरातील प्रत्येक गुणवंताला प्रोत्साहन देण्यासाठी महानगरपालिका नेहमीच कटिबद्ध राहील, असे प्रतिपादन महापौर रवि…

Read More

पिंपरी (हिंदवी न्यूज) पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कला, क्रीडा व साहित्य समितीची आढावा बैठक कला, क्रीडा व साहित्य समितीचे सभापती कैलास कुटे यांच्या अध्यक्षतेखाली दिवंगत माजी महापौर मधुकर पवळे सभागृहात पार पडली. या बैठकीत शहरातील कला, क्रीडा व साहित्य क्षेत्रातील धोरणांवर सकारात्मक व सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीत शहरातील कलाकार, खेळाडू व साहित्यिक यांना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन उपक्रम राबविणे, त्यांना योग्य सन्मान देणे तसेच त्यांच्या कर्तृत्वाची दखल शहर, राज्य व राष्ट्रीय स्तरावर कशी घेतली जाईल याबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. या बैठकीस कला, क्रीडा व साहित्य समितीचे सदस्य भाऊसाहेब भोईर ,शाम जगताप, धर्मपाल तंतरपाळे, उदय गायकवाड, योगेश लांडगे, प्रमोद कुटे तसेच…

Read More

चिंचवड (हिंदवी न्यूज)  पिंपरी – चिंचवड येथील ज्येष्ठ कवयित्री आणि गझलकारा मीना शिंदे यांना गुरुवारी, (दि. २६)  ‘काव्यदीप पुरस्कार २०२६’ने सन्मानित करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र, कर्वे रोड, डेक्कन कॉर्नर, पुणे येथे साहित्यदीप प्रतिष्ठान, पुणे आयोजित या पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे कार्यवाह आणि सुप्रसिद्ध कवयित्री अंजली कुलकर्णी होत्या. साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ज्योत्स्ना चांदगुडे आणि कार्याध्यक्ष धनंजय तडवळकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. ज्योत्स्ना चांदगुडे यांनी प्रास्ताविक केले.  ‘मीना शिंदे सुमारे पस्तीस वर्षांपासून आशयघन कविता आणि गझल लिहीत आहेत. त्या कवितांच्या सन्मानार्थ ‘काव्यदीप पुरस्कार २०२६’ प्रदान करून त्यांना सन्मानित करताना आम्हाला खूप आनंद होत आहे’ अशा भावना …

Read More

चिंचवड (हिंदवी न्यूज) :  श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळ, चिंचवडगाव यांच्यावतीने बुकॉऊ वुल्फ कॉलनी पटांगण, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग ( लिंक रोड), चिंचवडगाव येथे  पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी किराणा घराण्यातील गायक भक्तिगंधर्व मुकुंद बादरायणी आणि सहकारी यांनी ‘स्वरसमर्थ अभंगवाणी’ या सांगीतिक भक्तिसंगीताच्या मैफलीच्या माध्यमातून मंगळवारी( १७ मार्च ) द्वितीय पुष्पाची गुंफण केली. याप्रसंगी माजी नगरसेवक मधू जोशी, मंडळाचे अध्यक्ष दिनकर चिंचवडे – पाटील, उपाध्यक्ष दीपक टाव्हरे, सचिव संजय आधवडे, सहसचिव मीनल देशपांडे, खजिनदार गणपती फुलारी, सदस्य शंकर बुचडे, नितीन चिंचवडे – पाटील, हेमा दिवाकर, माधव कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. ‘ओम नम: शिवाय’चा…

Read More

(हिंदवी न्यूज | पिंपरी-चिंचवड) पिंपरी-चिंचवड शहरात श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. शहरातील विविध मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. यावेळी शहरातील विविध भागातील राम मंदिरांमध्ये विशेष पूजाअर्चा, अभिषेक आणि भजन-कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. काही ठिकाणी राम जन्मोत्सवानिमित्त दुपारी १२ वाजता ‘राम जन्म’ सोहळा साजरा करण्यात आला. शहरातील विविध संस्था व संघटनांच्या वतीने शोभायात्रा तसेच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, सायंकाळी विविध भागात ढोल-ताशांच्या गजरात, भगवे झेंडे आणि जय श्रीरामच्या घोषणा, देत मिरवणुक काढण्यात आली. यात महिला, युवक आणि लहान मुलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेत उत्सवाचा आनंद व्दिगुणीत केला. घरोघरी पारंपरिक पद्धतीने पूजाअर्चा करून श्रीराम…

Read More