Author: Hindavinewsnetwork@gmail.com
शब्दधन काव्यमंच तर्फे ‘चला जाऊ या ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी उपक्रम* पिंपरी (हिंदवीन्यूज)- ‘समाजाशी समन्वय साधणारा खरा साहित्यिक असतो!’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील यांनी व्यक्त केले. शब्दधन काव्यमंच आयोजित ‘चला जाऊ या ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी…’ या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुरडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महात्मा जोतिबा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. तानाजी एकोंडे यांनी गायलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या ‘आवडे हे रूप | गोजिरे सगुण | पाहता लोचन ,सुखावले ||’ या अभंगाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. अशोकमहाराज गोरे यांनी प्रास्ताविकातून शब्दधन काव्यमंच या संस्थेच्या विविध साहित्यिक उपक्रमांची माहिती दिली. सन्मानचिन्ह,…
पिंपरी(हिंदवी न्यूज ) कष्टकरी कामगार हा राष्ट्रीय प्रवाहातील मूळ आधारस्तंभ आहे. विकासाच्या प्रत्येक टप्प्यावरील त्याचे योगदान अनमोल आहे. यासाठी कामगारांच्या श्रमाचे मोल जपणे आवश्यक आहे. सध्याच्या युद्धज्वराच्या परिस्थितीत आणि अशांततेच्या काळात औद्योगिक केंद्रे आणि श्रमिक जगत स्थिर राहिले तर सामाजिक स्वास्थ टिकून राहील. यासाठी सर्वसमावेशक प्रयत्न होणे गरजेचे आहेत. असे मत गुणवंत कामगार तानाजी एकोंडे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या संत तुकाराम नगर येथील कामगार कल्याण केंद्राच्या वतीने आंतरराष्ट्रीय कामगार दिनी ” कामगारांचे सामाजिक जीवन” या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी ते बोलत होते. प्रकाश घोरपडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक…
जिजाऊ व्याख्यानमाला – अंतिम पुष्प पिंपरी (हिंदवीन्यूज) ‘भक्तीसोबतच माणसाला कर्मप्रवण करणारी ज्ञानेश्वरी ही एक जीवनप्रणाली आहे!’ असे प्रतिपादन डॉ. भावार्थ देखणे यांनी चापेकर स्मारक उद्यान, चापेकर चौक, चिंचवडगाव येथे केले. गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आणि अनंत नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेत ‘एक तरी ओवी अनुभवावी!’ या विषयावरील अंतिम पुष्प गुंफताना डॉ. भावार्थ देखणे बोलत होते. चिंचवडगाव पोलीस स्थानकातील पोलीस निरीक्षक दत्ता चासकर, नगरसेविका अपर्णा डोके, सामाजिक कार्यकर्त्या गीतल गोलांडे, गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, कार्याध्यक्ष ॲड. विपुल नेवाळे, सुहास पोफळे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. राजाभाऊ गोलांडे यांनी प्रास्ताविकातून, ‘आम्ही मित्रमंडळींनी विद्यार्थिदशेत असताना…
जिजाऊ व्याख्यानमाला – पुष्प चौथे पिंपरी (हिंदवीन्यूज) ‘भाषा, संस्कृती, अर्थकारण, समाजकारण अशा विविध क्षेत्रांतील आदर्शांचा शोध घेऊन त्यांचे अनुकरण भारताला विश्वगुरू पदाला नेणारे आहे!’ असे प्रतिपादन डॉ. सागर देशपांडे यांनी चापेकर स्मारक उद्यान, चापेकर चौक, चिंचवडगाव येथे केले. गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आणि अनंत नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेत ‘आदर्शांच्या शोधात’ या विषयावरील चौथे पुष्प गुंफताना डॉ. सागर देशपांडे बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे अध्यक्षस्थानी होते; तसेच सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. मारुती भापकर यांनी, ‘जिजाऊ व्याख्यानमाला ही पिंपरी – चिंचवडमधील…
पिंपरी (हिंदवीन्यूज) ‘धार्मिक आणि पवित्र कार्य करताना आपण गोत्र सांगतो; पण सामाजिक कार्यात मी ‘कर्मवीर’ या गोत्राने कार्यरत आहे!’ असे भावपूर्ण उद्गार ज्येष्ठ विधिज्ञ, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष सदस्य आणि रयत शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी ॲड. सतिश गोरडे यांनी रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी येथे काढले. रयत माजी विद्यार्थी मेळाव्यामध्ये प्रमुख वक्ता म्हणून मार्गदर्शन करताना ॲड. सतिश गोरडे बोलत होते. प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष बाळासाहेब वाघिरे, माजी विद्यार्थी नगरसेवक संजोग वाघिरे, माजी विद्यार्थिनी पत्रकार अश्विनी सातव, विशाल मासुळकर, प्रशांत म्हेत्रे, ॲड देविदास कुदळे, उपप्राचार्या डाॅ. कामायनी सुर्वे, उपप्राचार्या डाॅ. संगीता…
पिंपरी (हिंदवी न्यूज) पिंपरी-चिंचवड: देशातील महिला शक्तीचा अपमान आणि काँग्रेस आघाडी सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने भव्य ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. दीपस्तंभ चौक ते गाय वासरू चौक दरम्यान निघालेल्या या मोर्चाचा समारोप मोहन नगर येथील दत्त मंदिर चौक येथे जाहीर सभेने झाला. यावेळी आंदोलक महिलांनी राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारून आपला तीव्र संताप व्यक्त केला. या आंदोलनाचे नेतृत्व भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे आणि महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे यांनी केले. यावेळी आमदार उमा खापरे आणि आमदार अमित गोरखे यांची प्रमुख उपस्थिती होती. केंद्र सरकारने आणलेल्या ‘नारी शक्ती वंदन विधेयका’चे स्वागत करत…
पिंपरी ( हिंदवी न्यूज ) गेल्या काही दिवसांपासून काळेवाडीतील एका अनधिकृत चर्चमध्ये भोंदू पास्टरकडून गरीब नागरीकांना पैशाचे आमिष दाखवून अंधश्रध्दा पसरवण्याचे काम सर्रास सुरु आहे. शहरातील गरीब आणि अशिक्षित बांधवांना धर्मांतराच्या जाळ्यात ओढले जात आहे. त्याविरोधात समस्त काळेवाडी ग्रामस्थांच्या वतीने रविवार दि. ३ मे रोजी सायंकाळी चार वाजता पंचनाथ चौक काळेवाडी ते आबाजी नाणेकर चौक काळेवाडी परीसरात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकांना गंभीर स्वरुपाचे आजार चमत्काराने व प्रार्थना केल्याने बरे होत असल्याचे सांगून त्यांचे धर्मांतर केले जात आहे. असे परीसरातील नागरीकांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे अनधिकृत चर्च कायमस्वरुपी बंद व्हावे , तसेच अंधश्रध्दा व धर्मांतरासारखे प्रकार रोखण्यासाठी हा…
पिंपरी ( हिंदवीन्यूज) ‘अनिर्बंध वैयक्तिक स्वातंत्र्यासाठी घटस्फोट घेणे चुकीचे असून त्यामुळे विवाहसंस्था धोक्यात आलेली आहे!’ असे विचार अखिल भारतीय अधिवक्ता परिषद पुणे जिल्हा अध्यक्षा ॲड. नीलिमा गोखले यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, निगडी प्राधिकरण येथे व्यक्त केले. अखिल भारतीय अधिवक्ता परिषद, पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवड जिल्हा आयोजित अधिवक्ता महिला संमेलनात ‘सद्य:स्थितीतील वाढत्या घटस्फोटांची मीमांसा’ या विषयावर मार्गदर्शन करताना ॲड. नीलिमा गोखले बोलत होत्या. याप्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर, ज्येष्ठ समुपदेशिका शिवलीला पाटील, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. सतिश गोरडे, ॲड. अंतरा देशपांडे, अधिवक्ता परिषद महामंत्री ॲड. संतोष गुरव, ॲड. अमेय पिंगळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी – चिंचवड जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे आदी मान्यवरांची…
जिजाऊ व्याख्यानमाला – पुष्प तिसरे पिंपरी (हिंदवीन्यूज)- ‘अवघ्या पन्नास वर्षांची गतिमान कारकीर्द लाभलेले छत्रपती शिवाजीमहाराज हे दूरदृष्टी असलेले कालातीत व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळेच स्वराज्याचे पुढे साम्राज्यात रूपांतर झाले!’ असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक संदीप तापकीर यांनी चापेकर स्मारक उद्यान, चापेकर चौक, चिंचवडगाव येथे केले. गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आणि अनंत नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेत ‘मराठ्यांचा देदीप्यमान पराक्रम : गाथा स्वराज्य ते साम्राज्याची!’ या विषयावरील तिसरे पुष्प गुंफताना संदीप तापकीर बोलत होते. इतिहास अभ्यासक ब. हि. चिंचवडे अध्यक्षस्थानी होते. नगरसेविका मनीषा चिंचवडे, प्रभाकर महाजन आणि गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होत…
जिजाऊ व्याख्यानमाला – पुष्प दुसरे पिंपरी (हिंदवीन्यूज)-‘संतांच्या संगतीत सद्विचारांचा लाभ होतो!’ असे प्रतिपादन प्रा. डॉ. संजय चौधरी यांनी चापेकर स्मारक उद्यान, चापेकर चौक, चिंचवडगाव येथे केले. गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आणि अनंत नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेत ‘संतांच्या संगती’ या विषयावरील दुसरे पुष्प गुंफताना प्रा. डॉ. संजय चौधरी बोलत होते. वारकरी महासंघाचे अध्यक्ष विजय जगताप अध्यक्षस्थानी होते; तसेच नगरसेवक सुरेश भोईर, ह. भ. प. किसनमहाराज चौधरी, गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. राजाभाऊ गोलांडे यांनी प्रास्ताविकातून जिजाऊ व्याख्यानमालेच्या पस्तीस वर्षांच्या कालावधीत विविध क्षेत्रांतील अनेक विचारवंतांनी समाजप्रबोधन केले आहे, अशी…