Author: Hindavinewsnetwork@gmail.com
कष्टकऱ्यांसह मान्यवरांचा सन्मान पिंपरी (हिंदवी न्यूज)-कामगार साहित्यिक श्रमश्री बाजीराव सातपुते यांच्या सहचारिणी नीता सातपुते यांना ऑटोक्लस्टर सभागृह, सायन्स पार्कसमोर, चिंचवड येथे ‘मास्तरांची सावली कृष्णाबाई नारायण सुर्वे’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले; तर उद्योजक भगवान पठारे यांना पद्मश्री नारायण सुर्वे कृषी – उद्योग जीवनगौरव सन्मान प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर प्राचार्य शंकर देवरे (पद्मश्री नारायण सुर्वे भला माणूस सन्मान), अरुण गराडे (पद्मश्री नारायण सुर्वे जन्मशताब्दी सन्मान), संगीता झिंजुरके (पद्मश्री नारायण सुर्वे काव्यप्रतिभा पुरस्कार) तसेच डॉ. स्वाती पाटील आणि नीलेश शेंबेकर यांना (पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार) प्रदान करून सन्मानित करण्यात आले. मराठी विश्वकोश मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित कार्यक्रमाच्या अध्यक्ष…
*’भावांजली आशाताईंना…’ मैफलीत श्रोते मंत्रमुग्ध* पिंपरी (हिंदवीन्यूज) – ‘उत्स्फूर्तता आणि जगण्यातला सहजभाव म्हणजे आशाताई भोसले होत्या. त्यांच्या जाण्याने मी कमालीचा अस्वस्थ झालो आहे!’ असे भावपूर्ण उद्गार सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी चिंचवडगाव येथे काढले. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजलीनिमित्त कलारंजन प्रतिष्ठान, सांगवी आयोजित ‘भावांजली आशाताईंना…’ या शब्दसुरांच्या मैफलीत कलारंजनचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले यांनी सुधीर गाडगीळ, मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका डाॅ. वंदना घांगुर्डे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, ज्येष्ठ संगीतकार मधू जोशी यांच्याशी मुक्त संवाद साधला. सुधीर गाडगीळ म्हणाले की, ‘आशाताई विविध गुणसंपन्न होत्या. रमणबागेतील एका प्रकट मुलाखतीदरम्यान अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली; परंतु…
पिंपरी (हिंदवीन्यूज)- स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, निगडी प्राधिकरण येथे शुक्रवार, दिनांक ०१ मे २०२६ पासून तीन दिवसीय छत्रपती शिवाजीमहाराज व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. रोज सायंकाळी सात वाजता व्याख्यानाचा प्रारंभ होईल. यामध्ये शुक्रवार, दिनांक ०१ मे रोजी माजी खासदार प्रदीप रावत ‘भारतीय राज्यघटनेतील धर्मस्वातंत्र्य आणि इस्लाम’ या विषयावर प्रथम पुष्प गुंफतील. शनिवार, दिनांक ०२ मे रोजी इतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत ‘अजिंक्य योद्धा बाजीराव आणि पालखेडची लढाई’ या विषयावर द्वितीय पुष्पाची गुंफण करतील. रविवार, दिनांक ०३ मे रोजी मार्क्सवादाचे अभ्यासक प्रा. डॉ. प्रसन्न देशपांडे ‘सांस्कृतिक क्रांती की भ्रांती?’ या विषयावर अंतिम पुष्प गुंफतील. यंदा बेचाळिसाव्या वर्षात पदार्पण करीत असलेल्या या विनाशुल्क व्याख्यानमालेचा लाभ…
जिजाऊ व्याख्यानमाला – पुष्प पहिले पिंपरी (हिंदवी न्यूज) -‘आपल्या विचारांवर ठाम राहिल्यास अपेक्षित फलप्राप्ती निश्चित होते!’ असे प्रतिपादन समुपदेशिका अमृता चांदोरकर यांनी चापेकर स्मारक उद्यान, चापेकर चौक, चिंचवडगाव येथे केले. गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आणि अनंत नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेत ‘जे मागाल ते मिळेल : अर्थात मनातील लहरी कशा काम करतात…’ या विषयावरील पहिले पुष्प गुंफताना अमृता चांदोरकर बोलत होत्या. उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते छत्तिसाव्या वर्षात पदार्पण करीत असलेल्या पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रभावती इंदलकर, राजाभाऊ गोलांडे, विपुल नेवाळे, सुहास पोफळे, महेश गावडे, नवनाथ सरडे, धीरज गुत्ते आदी…
हिंदवी न्यूज, (पिंपरी) – दिलासा संस्था व पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समितीच्या वतीने १ मे आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला कष्टकरी कामगारांना ‘मानवी दिलासा पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. धोंडीबा लक्ष्मण वाघमारे आणि कस्तुरा धोंडीबा वाघमारे हे (चर्मकार) दांपत्य,राजू काळूराम पवार आणिशालन राजू पवार हे (लोहार) दांपत्य तसेच रवींद्र नारायण डोळस (सांगवी स्मशानभूमी सेवक) यांचा यावेळी त्यांच्या कार्यस्थळावर सत्कार करण्यातआला. पुरस्कारार्थींना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि अर्थसाहाय्य देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक, पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समितीचे अध्यक्ष प्रकाश घोरपडे, जयश्री गुमास्ते, अरुण परदेशी, मुरलीधर दळवी, शामराव सरकाळे, शाम बारसे आदी सदस्य उपस्थित होते.…
पिंपरी, (हिंदवीन्यूज)-नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीतील “कॉर्पोरेट जिहाद” प्रकरणाच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद-बजरंग दल, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात १३७ हून अधिक बजरंगी व दुर्गा सहभागी झाले होते. यावेळी ॲड. ललित झुनझुनवाला (पिं.चिं जिल्हा अध्यक्ष), नरेंद्र पेंडसे (पिं. – चिं. जिल्हा कार्यवाह, आरएसएस) श्री.नितीन वाटकर (प्रांत सहमंत्री), अशोक येलमार, डॉ. शर्वरी येरगट्टीकर, श्री.धनंजय गावडे (पुणे ग्रामीण सहमंत्री),श्री. संभाजी बालघरे (पिं.चिं जिल्हा मंत्री), श्री. नवनाथ साकोरे (पिं.चिं जिल्हा सहमंत्री) ,श्री.किरण शिंदे (पिं.चिं जिल्हा सहमंत्री),श्री. अरविंद लंघे (पिं.चिं जिल्हा बजरंग दल संयोजक), श्री. कौशल रावल (पिं.चिं जिल्हा बजरंग दल सहसंयोजक) ,श्री.पन्नालाल जाधव (पिं.चिं जिल्हा बजरंग दल सहसंयोजक), तसेच सर्व…
पिंपरी, (हिंदवी न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने दापोडी येथील आनंदवन झिरो वेस्ट प्रकल्पात आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिन नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात आला. पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली शून्य कचरा व्यवस्थापन, कचऱ्याचे चार प्रकारे विलगीकरण, सिंगल यूज प्लास्टिकवरील बंदी, कापडी पिशव्यांचा वापर, ‘आर.आर.आर. सेंटर’ची संकल्पना तसेच घरगुती कंपोस्टिंग यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सादरीकरण करण्यात आले. उपस्थितांना दापोडी येथील शून्य कचरा प्रकल्पाची सविस्तर माहिती देत कचरा…
पिंपरी, (हिंदवी न्यूज) – छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक, जाधववाडी येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीरात एकूण ६३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांचा प्रमाणपत्र, महाराजांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. जनसेवा बल्ड बँकेच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरास शिवभक्तांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी पिंपरी चिंचवड महापालिका विधी समिती सभापती सुजाता बोराटे, सामाजिक कार्यकर्ते राजू भुजबळ, छावा वाहन चालक-मालक कामगार संघाचे उपाध्यक्ष लक्ष्मण शेलार, कार्याध्यक्ष हिरामण गवारी, सहसचिव रवींद्र लंके आदी उपस्थित होते. मंडळाचे कार्यकर्ते विनायक ढोबळे, निलेश गायकवाड, रमेश निकम, ऋषिकेश…
पिंपरी, (हिंदवी न्यूज ) – छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळाच्या वतीने जाधववाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. किल्ले शिवनेरी ते जाधववाडी येथे शिवज्योत आणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत लहान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ व मावळे यांची वेशभूषा परिधान करुन उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सकाळी जाधववाडी सीएनजी पंप, मातोश्री कमान, आहेरवाडी चौक, मधला पेठा रोड ते साई पॅलेसमार्गे ही मिरवणूक काढण्यात आली. परिसरातील महीलांसह नागरिकांनी शिवज्योत व पालखीचे स्वागत केले. फटाक्यांची आतिषबाजी व ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.…
पिंपरी (हिंदवी न्यूज) : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कार्यात सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान आहे. कोणत्याही पदावर कार्य केले असले तरी प्रत्येक कर्मचाऱ्याचा अनुभव, त्यांची कार्यनिष्ठा आणि जबाबदारीची जाणीव यामुळेच महापालिकेला आज नावलौकिक प्राप्त झाला आहे. सेवानिवृत्ती हा शेवट नसून आयुष्याचा एक नवा टप्पा आहे. या काळात आपण आपल्या कुटुंबियांसोबत अधिक वेळ घालवावा, आरोग्याची काळजी घ्यावी आणि आपल्या आवडी-निवडी, छंद जोपासत आनंदी व समाधानकारक आयुष्य जगावे, असे प्रतिपादन सह आयुक्त मनोज लोणकर यांनी केले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने मुख्यालयातील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात सत्कार सोहळा पार पडला. यावेळी मार्च २०२६ अखेर सेवानिवृत्त होणाऱ्या २३ तर स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या ३ अशा…