Author: Hindavinewsnetwork@gmail.com
पिंपरी, (हिंदवी न्यूज)- छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य, पराक्रम आणि स्वराज्यासाठीचे योगदान सर्वश्रुत असले तरी युवा पिढी आणि शालेय विद्यार्थ्यांना त्यांचा इतिहास जिवंत स्वरूपात अनुभवता यावा, या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महानाट्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी प्रत्येकाने आपल्या परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांना अशा कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी प्रोत्साहित करावे, जेणेकरून प्रत्येकाला हा इतिहास जीवंतपणे अनुभवण्याची संधी मिळेल, असे आवाहन आमदार अमित गोरखे यांनी केले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या अद्वितीय पराक्रम, राष्ट्रनिष्ठा आणि स्वराज्य रक्षणासाठी…
पिंपरी,( हिंदवी न्यूज) – पिंपरी चिंचवड हे केवळ औद्योगिक शहर नसून क्रीडा क्षेत्रातही देशाला दिशा देणारे शहर बनत आहे. आपल्या शहरातील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवत आहेत, ही प्रत्येक नागरिकासाठी प्रेरणादायी बाब आहे. जयदेव म्हमाणे यांच्यासारख्या खेळाडूंमुळे शहरातील युवा पिढीला नवी ऊर्जा मिळत आहे. अशा खेळाडूंच्या पाठीशी महापालिका कायम ठामपणे उभी राहील, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. पिंपरी चिंचवड शहरातील क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरलेल्या किंग मार्शल आर्ट्स संस्थेच्या विद्यार्थ्यांचा महापौर कार्यालयात महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे,सामाजिक कार्यकर्ते नामदेवराव जाधव उपस्थित होते.…
पिंपरी, (हिंदवी न्यूज) जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्थांनी एकत्र येऊन उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी योग्य समन्वय साधून मजबूत जागतिक परिवर्तनकारी शैक्षणिक भागीदारी निर्माण केली पाहिजे. यासाठी ॲबरिस्टविथ विद्यापीठ आणि भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट सोबत एक दृढ नाते निर्माण करत आहे. याचा पुढील काळात दोन्ही संस्थांच्या विस्तारासाठी उपयोग होईल असे मत यूके मधील ॲबरिस्टविथ विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय विभाग, सहयोगी प्र-कुलपती प्रा. नायजेल होल्ट यांनी व्यक्त केले. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या…
पिंपरी,(हिंदवी न्यूज) आपल्या उपजत सौंदर्याबरोबरच परीक्षकांनी विचारलेल्या मार्मिक, तिरकस प्रश्नांना प्रचंड आत्मविश्वासाने उत्तर देऊन आपले व्यक्तिमत्व आणि बौद्धिकता सिद्ध करत जळगाव येथील वैष्णवी शिंपी हिने “कॅलिस्टा इंडिया २०२६” या बहुचर्चित सौंदर्य स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा आकर्षक मानाचा मुकुट आणि रोख २० हजार रुपयांचे बक्षीस पटकावले. कॅलिस्टा पेजंट्स आयोजित “कॅलिस्टा इंडिया २०२६” आणि “कॅलिस्टा मिस, मिसेस महाराष्ट्र २०२६” या सौंदर्यस्पर्धेत अंतिम फेरीत विजेत्या ठरलेल्या सौंदर्यवतींना मुकुट, रोख बक्षीस, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. चिंचवड येथील एल्प्रो सिटी मॉल येथे आयोजित केलेल्या या अंतिम फेरीस कॅलिस्टा पेजंट्सचे कार्यकारी संचालक संजीव जोग, आधार पशुपक्षी मित्र फाउंडेशन व हमारा विश्व फाउंडेशनच्या संचालिका अनिता अग्रवाल, मायफिल्म…
पिंपरी-चिंचवडसह देशभरात श्रद्धा, सेवा आणि समर्पणाचा जागर पिंपरी ,(हिंदवी न्यूज) मानवता, प्रेम व आध्यात्मिक जागृतीचे प्रतीक असलेल्या युगद्रष्टा बाबा हरदेव सिंह यांच्या पावन स्मृती प्रीत्यर्थ बुधवार, दि. १३ मे २०२६ रोजी हरियाणा येथील संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ समालखा येथे समर्पण दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार असून सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज तथा श्रद्धेय निरंकारी राजपिताजी यांच्या पावन सान्निध्यात कार्यक्रम संपन्न होणार आहे, श्रद्धाळूंनी आशीर्वचनांचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पुणे पिंपरी चिंचवड शहरात जवळपास १७ ठिकाणी समर्पण दिवस सायंकाळी साडेसहा ते नऊ या वेळात पार पडणार आहे.…
पिंपरी, (हिंदवी न्यूज) पिंपरी-चिंचवड शहराच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या “यशवंतराव चव्हाण स्मारक समिती”ला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने १ कोटी रुपयांच्या अनुदानाचा धनादेश प्रदान करण्यात आला. हा धनादेश महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार शंकर जगताप, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विधी समिती सदस्य कुशाग्र कदम तसेच स्मारक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी राज्याच्या औद्योगिक, सहकारी आणि विकासात्मक धोरणांद्वारे आधुनिक महाराष्ट्राची भक्कम पायाभरणी केली. त्यांच्या दूरदृष्टीमुळे पिंपरी-चिंचवडसारखी छोटी गावे देशातील अग्रगण्य औद्योगिक शहरांमध्ये विकसित झाली. लाखो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीला…
पिंपरी ,(हिंदवी न्यूज) पिंपरी चिंचवड शहर स्वच्छतेत देशात अव्वल स्थानावर नेण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले. स्वच्छ सर्वेक्षण २०२५–२६ अंतर्गत नागरिकांचा अभिप्राय हा शहराच्या विकासाचा महत्त्वाचा आधार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापौर रवि लांडगे म्हणाले की, शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक प्रभावी, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी नागरिकांचे मत अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रशासनाच्या प्रयत्नांना साथ देत प्रत्येकाने आपला अभिप्राय नोंदवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनीही नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. “मी माझा अभिप्राय दिला आहे, आपणही जरूर नोंदवा,” असे सांगत महापौर रवि लांडगे…
पिंपरी (हिंदवी न्यूज) पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित छत्रपती संभाजी महाराज विचार प्रबोधन पर्वाला उत्साहात सुरुवात झाली. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय…’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय…’, ‘जय भवानी, जय शिवाजी.’ च्या जयघोषात आणि स्वराज्याच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या नेत्रदीपक दृश्यांनी चिंचवड येथील छत्रपती संभाजीनगर परिसरातील बर्ड व्हॅली उद्यानाच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या मैदानाचा परिसर दुमदुमून गेला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज विचार प्रबोधन पर्वा’अंतर्गत सादर करण्यात आलेल्या ‘शिवरूद्र शंभुराजे’ या भव्य महानाट्याच्या पहिल्या प्रयोगाला शिवप्रेमींनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. या प्रबोधन पर्वाचे उदघाटन उपमहापौर शर्मिला बाबर,आयुक्त डाॅ.विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला माजी महापौर मंगला कदम, स्थायी समिती…
या पदवी प्रदान समारंभातून विकसित भारताचे भावी शिल्पकार घडत आहेत” : ज्योतिरादित्य एम. सिंधिया. पिंपरी, (हिंदवी न्यूज) डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे (अभिमत विद्यापीठ) येथे 17 वा पदवीप्रदान समारंभ उत्साहात पार पडला. या समारंभासाठी केंद्रीय दळणवळण मंत्री आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री (भारत सरकार ) ज्योतीरादित्य सिंधिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पी. डी. पाटील ,(कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे) होते. या कार्यक्रमात मा. डॉ. (ब्रिगे.) अमरजित सिंग (निवृत्त) माजी प्रभारी कुलगुरू, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे आणि माजी अधिष्ठाता, डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन…