पिंपरी-चिंचवडसह देशभरात श्रद्धा, सेवा आणि समर्पणाचा जागर
पिंपरी ,(हिंदवी न्यूज)
मानवता, प्रेम व आध्यात्मिक जागृतीचे प्रतीक असलेल्या युगद्रष्टा बाबा हरदेव सिंह यांच्या पावन स्मृती प्रीत्यर्थ बुधवार, दि. १३ मे २०२६ रोजी हरियाणा येथील संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ समालखा येथे समर्पण दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार असून सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज तथा श्रद्धेय निरंकारी राजपिताजी यांच्या पावन सान्निध्यात कार्यक्रम संपन्न होणार आहे, श्रद्धाळूंनी आशीर्वचनांचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
पुणे पिंपरी चिंचवड शहरात जवळपास १७ ठिकाणी समर्पण दिवस सायंकाळी साडेसहा ते नऊ या वेळात पार पडणार आहे. अशी माहिती संत निरंकार मंडळातर्फे देण्यात आली आहे. देश-विदेशातील मोठ्या संख्येने श्रद्धाळू, भक्तगण आणि मानवताप्रेमी या कार्यक्रमात सहभागी होत श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाची भावांजली अर्पण करणार आहेत. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण संत निरंकारी मिशनच्या अधिकृत संकेतस्थळावर करण्यात येणार असून, जगभरातील अनुयायांना त्याचा लाभ घेता येणार आहे.


