हिंदवी न्यूज |
चिंचवड (प्रतिनिधी) महाराजा अग्रसेन ट्रस्ट चिंचवड प्राधिकरणच्या वतीने अग्रभूषण पुरस्कार, विद्यार्थी सत्कार सोहळा अग्रसेन भवन चिंचवड येथे संपन्न झाला .
प्रमुख पाहुणे डॉ बालकिशन आग्रवाल , डॉ रमेश बन्सल, अग्रसेन ट्रस्टचे माजी अध्यक्ष प्रेमचंद मित्तल,विनोद बन्सल,मोहन गर्ग, वेदप्रकाश आगरवाल, रामअवतार आगरवाल, आगरवाल, ट्रस्टचे अध्यक्ष धर्मेंद्र आग्रवाल, सचिव सुनील जयकुमार आग्रवाल,खजिनदार विनोद मित्तल, कार्याध्यक्ष विकास गर्ग, अनिता जैन आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी डॉ. आग्रवाल म्हणाले कि, आपल्या मुलांना सुसंस्कारीत करावे. पैसे तर सर्वजण कामावतात. संपत्तीपेक्षा उत्तम संतान घडविण्याकडे अधिक लक्ष दया. समाजातील वडीलधाऱ्या व्यक्तींनी सल्लागार म्हणून भूमिका घ्यावी. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्ना दहिवलेकर यांनी केले. प्रास्ताविक सुनील ज.आग्रवाल यांनी तर आभार विनोद बन्सल यांनी मानले.
पुरस्कार विजेते
कोहिनुर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांना जाहिर झालेला अग्रसेन रत्न पुरस्कार स्वीकारण्यास ते अनुपस्थित होते. वसंत ग्रुपचे अध्यक्ष प्रेमचंद मित्तल यांना अग्रविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुभाष बन्सल,वेदप्रकाश गुप्ता यांना अग्रभूषण पुरस्कार तर कै. शारदादेवी अग्रवाल यांना मारणोत्तर विशेष जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. रामप्यारी गर्ग, कमलादेवी अग्रवाल यांना जीवन गौरव पुरस्कारतसेच पन्नालाल गुप्ता, डॉ.संतोष अग्रवाल यांना अग्रसेन श्री पुरस्काराने गौरविण्यात आले.









