Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास

November 9, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!

November 8, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»संभाव्य पाणीटंचाई रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात!
पिंपरी चिंचवड

संभाव्य पाणीटंचाई रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात!

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comOctober 30, 2026Updated:October 30, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

हिंदवी न्यूज | पिंपरी 

पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारे शहरीकरण आणि भविष्यात उद्भवू शकणारी पाणीटंचाई लक्षात घेता महापालिका प्रशासनाने आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, तसेच प्रभावी पाणी व्यवस्थापनासाठी ठोस नियोजन करावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब सोपानराव भोईर यांनी केली आहे.

यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्यात संभाव्य पाणीटंचाईचे संकट टाळण्यासाठी पाणीगळती रोखणे, पिण्याच्या पाण्याचा अपव्यय थांबवणे, विहिरी व बोअरवेलचे योग्य व्यवस्थापन आणि स्वतंत्र पाणी व्यवस्थापन समिती स्थापन करण्यासह विविध उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी केली आहे.

शहराची लोकसंख्या सुमारे ३० लाखांवर गेली असून वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ऑक्टोबर आणि दिवाळीनंतरच्या काळात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊन पाण्याची कमतरता जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य संकटाची पूर्वकल्पना घेऊन प्रशासनाने आतापासूनच कठोर आणि नियोजनबद्ध पावले उचलणे आवश्यक असल्याचे भाऊसाहेब भोईर म्हणाले.

पाणीगळती रोखण्यासाठी फिरते दुरुस्ती पथक

शहरातील घरे, व्यावसायिक इमारती आणि कार्यालयांमध्ये नळ तसेच पाइपलाइनमधून होणारी पाणीगळती रोखण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र फिरते दुरुस्ती पथक (मोबाइल टास्क फोर्स) स्थापन करावे. नागरिकांच्या मागणीनुसार नाममात्र शुल्कात किंवा मोफत गळती दुरुस्त करून देण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. यामुळे मोठ्या प्रमाणात होणारा पाण्याचा अपव्यय टाळता येईल, अशी सूचना त्यांनी केली आहे.

वाहन धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या वापरावर बंदीची मागणी

पिण्याच्या पाण्याचा अनावश्यक वापर रोखण्यासाठी कार, दुचाकी यांसारखी वाहने पिण्याच्या पाण्याने धुण्यास बंदी घालावी. वाहनांची स्वच्छता ओल्या फडक्याने करावी, तसेच घरासमोरील अंगण, फरशी आणि पटांगण पाण्याने धुण्याऐवजी पुसून स्वच्छ करण्याचे नियम लागू करावेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर जागेवरच किमान एक हजार रुपयांचा दंड आकारावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

मोठ्या बांधकामांवर मर्यादा; विहिरी-बोअरवेलच्या व्यवस्थापनाची सूचना

पाण्याची उपलब्धता आणि संभाव्य तुटवडा लक्षात घेऊन शहरातील नवीन मोठ्या बांधकामांच्या पाणी वापरावर तात्पुरती मर्यादा किंवा स्थगिती आणण्याचा विचार करावा. तसेच शहरातील सार्वजनिक आणि खासगी विहिरी व बोअरवेल यांचे व्यवस्थापन महापालिकेने आपल्या नियंत्रणाखाली घेऊन उपलब्ध पाण्याचे योग्य वितरण करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारावी, असे त्यांनी सुचवले आहे.

गरजूंसाठी झुणका-भाकर केंद्र सुरू करण्याची मागणी

पाणीटंचाईच्या काळात आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि कष्टकरी नागरिकांना अन्नधान्य व भोजनाची समस्या भेडसावू नये, यासाठी सेवाभावी संस्थांना आर्थिक तसेच पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्यांच्या माध्यमातून शहरात माफक दरात भोजन उपलब्ध करून देणारी झुणका-भाकर किंवा तत्सम अन्नछत्र केंद्र सुरू करावीत, अशी सूचना भोईर यांनी केली आहे.

पाणी व्यवस्थापन समिती स्थापन करून दर पंधरा दिवसांनी आढावा

शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन, उपलब्ध पाण्याचा साठा, वितरण आणि संभाव्य अडचणी यावर देखरेख ठेवण्यासाठी विशेष पाणी व्यवस्थापन समिती गठित करावी. या समितीची दर पंधरा दिवसांनी बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि आवश्यक निर्णय तातडीने घ्यावेत.

नागरिकांमध्ये पाणी बचतीबाबत जनजागृती करण्याचे आवाहन

पाणी बचतीसाठी नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती मोहीम राबवावी. घरातील फ्लश टँकचा अनावश्यक वापर टाळणे, शॉवरऐवजी बादलीतील मोजक्या पाण्याने स्नान करणे, तसेच भांडी धुतल्यानंतर उरलेल्या वापरलेल्या पाण्याचा (ग्रे वॉटर) झाडे आणि बागांसाठी पुनर्वापर करणे याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करावे. याशिवाय पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी नागरिकांकडूनही व्यावहारिक आणि उपयुक्त सूचना मागवाव्यात.

विरोधी पक्षनेता म्हणून नव्हे, तर एक सजग नागरिक म्हणून भविष्यातील संभाव्य पाणीटंचाईची जाणीव आणि नागरिकांच्या हिताची तळमळ यातून या सूचना मांडत असल्याचे भाऊसाहेब सोपान भोईर यांनी स्पष्ट केले. महापालिका प्रशासनाने या विषयाला सर्वोच्च प्राधान्य देऊन सूचनांची अंमलबजावणी करावी आणि संभाव्य पाणीटंचाईच्या संकटात नागरिकांना दिलासा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

pcmc-possible-water-shortage-preventive-measures
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleफुलगाव येथे हजरत चांद खान फकिर बाबा यांचा संदल व उरुस उत्साहात साजरा
Next Article कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांची “विनम्र अभियान पदयात्रा” यशस्वी;
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास

November 9, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!!!

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

November 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास

By Hindavinewsnetwork@gmail.comNovember 9, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज | पुणे  माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या महत्त्वाकांक्षी मेट्रो मार्गाला प्रवासी सेवा सुरू झाल्याच्या…

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!

November 8, 2026

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

November 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?