आबू रोड येथे राष्ट्रीय मीडिया सम्मेलन-२०२६ देश-विदेशातील पत्रकारांची उपस्थिती
हिंदवी न्यूज | राजस्थान
श्रेष्ठ विश्वाच्या निर्मितीसाठी सशक्त मीडिया’ या संकल्पनेवर आधारित ब्रह्माकुमारी संस्थेच्या मीडिया व जनसंपर्क प्रभागातर्फे आयोजित राष्ट्रीय मीडिया सम्मेलनचे स्वागत सत्र नुकतेच आबू रोड येथील मानसरोवरच्या दिव्य शक्ती अनुभूती हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. दि. ९ ते १३ सप्टेंबरदरम्यान आयोजित या सम्मेलनात भारतातील विविध राज्यांसह फ्रान्स,ऑस्ट्रेलिया आणि नेपाळ येथील पत्रकार व मीडिया प्रतिनिधी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्र सहभागी झाले होते.
- या कार्यक्रमा दरम्यान महाराष्ट्राच्या पत्रकारांनी दिला जय महाराष्ट्रचा नारा
सम्मेलनात विविध राज्यांतून सहभागी झालेल्या पत्रकारांचा परिचय करून देण्यात आला आणि भारतातील आणि भारताबाहेरच्या दीड ते दोन हजार पत्रकार बांधवांमधून महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड येथील महास्त्र पत्रकार महासंघाचे अध्यक्ष संजय मराठे, पिंपरी चिंचवड पत्रकार महासंघाचे अध्यक्ष रोहित खर्गे, कार्याध्यक्ष दादाराव आढाव, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रविण शिर्के, शबनम सय्यद आणि उमेश पाटील आदींना बीके शांतनुबाई नॅशनल कॉर्डिनेटर, बीके सरला दीदी मीडिया विंग उपाध्यक्ष, बीके निकुंज भाई नॅशनल कॉर्डिनेटर मान्यवरांचे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा व शाल देऊन त्यांचा सन्मान करण्याची संधी पहिल्यादाच पत्रकारांना मिळाली. सन्मान स्वीकारल्यानंतर मान्यवरांनी संबंधित पत्रकारांचे कौतुक करून आभार व्यक्त केले. यंदा महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने पत्रकार सहभागी झाले होते. यावेळी महाराष्ट्राच्या पत्रकारांनी उत्स्फूर्तपणे ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत वातावरणात जल्लोष निर्माण केला. अशी माहिती डॉ. सोमनाथ वडनेरे,महाराष्ट्र राज्य समन्वयक मीडिया प्रभाग यांनी दिली.
‘ओम शांती मीडिया’ चे संपादक डॉ.बी. के. गंगाधर यांनी स्वागतपर भाषण केले. ते म्हणाले की आज मीडिया केवळ बातम्या देण्याचे माध्यम राहिलेले नाही तर समाजाची विचारसरणी दृष्टिकोन आणि दिशा प्रभावित करणारी प्रभावी व्यवस्था बनली आहे. मीडिया विंगच्या उपाध्यक्षा बी. के. सरला दीदी यांनी सम्मेलनाचा उद्देश आणि विषय स्पष्ट केला. “परमात्म्याला सुवर्णमय,श्रेष्ठ विश्वाची निर्मिती करण्यासाठी पत्रकारांची मदत हवी आहे,” असे त्यांनी सांगितले.
या राष्ट्रीय मीडिया सम्मेलनासाठी हिंदवी न्यूजच्या संपादिका पूनम पाटील, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज च्या संपादिका लीना माने, हिंदवी न्यूजचे सह संपादक अभिजीत पाटील, ज्येष्ठ पत्रकार संतोष सागवेकर, उमेश सणस, तौफिक सय्यद, माऊली भोसले, सारीका भिंगे, गझाला सय्यद, शबनम सय्यद, रफीक सय्यद, सुरेखा काजरोळकर, कलिंदर शेख, पुजा पंडित, किसन भोसले, सुनिता कुमारी, शिवाजी घोडे, संतोष महामुनी, श्रीधर जगताप, संगीता पाचंगे, सिताराम मोरे, आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.



