Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

सौ उमाताई खापरे (आमदार, विधान परिषद महाराष्ट्र), यांचा महिलांना स्वतःला ओळखा, पुढे जा आणि इतरांना सक्षम करण्याचा संदेश!!

October 12, 2026

आदर्श मानवी मूल्यांची संस्कार गाथा म्हणजे ज्ञानेश्वरी -ह .भ .प प्रकाश काळे महाराज

October 11, 2026

आळंदीतील नरसिंह सरस्वती स्वामी महाराज चौकातील दुकानास लागलेल्या आगीत दुकानाचे प्रचंड नुकसान

October 11, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»मुळशी»चापेकर बंधूंच्या बलिदानाचे स्मरण करून मानवतावादी भारत घडविण्याचा संकल्प करूया! – पांडुरंग बलकवडे
मुळशी

चापेकर बंधूंच्या बलिदानाचे स्मरण करून मानवतावादी भारत घडविण्याचा संकल्प करूया! – पांडुरंग बलकवडे

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJune 24, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी,(हिंदवीन्यूज)- ‘जुलमी ब्रिटिश अधिकारी रॅण्डचा वध करून देशस्वातंत्र्याचा संकल्प करणाऱ्या क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या बलिदानाचे स्मरण करून मानवतावादी महान भारत घडविण्याचा आपण संकल्प करूया!’ असे आवाहन ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी चापेकर पुतळा, गणेशखिंड, पुणे येथे केले. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती आयोजित पुण्यातील गणेशखिंड ते चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालय दरम्यानच्या मशाल दौड आणि बाईक रॅलीचे उद्घाटन करताना बलकवडे बोलत होते.

क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, कार्यवाह ॲड. सतिश गोरडे, उपाध्यक्ष डॉ. अशोक नगरकर, डाॅ. शकुंतला बन्सल, डाॅ. नीता मोहिते, व्यवस्थापक अतुल आडे, ॲड. अक्षय कदम या मान्यवरांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना गिरीश प्रभुणे म्हणाले की, ‘चापेकर बंधू लोकमान्य टिळकांच्या सहवासात आले आणि त्यांनी देशस्वातंत्र्यासाठी क्रांतीचा मार्ग स्वीकारला. त्याचवेळी महात्मा गांधी यांनी शांतीचा मार्ग स्वीकारला होता. चापेकर बंधूंनी रॅण्डचा वध करून हौतात्म्य स्वीकारले; पण या इतिहासाच्या खुणा जपून ठेवण्यात हेळसांड करण्यात आली. पांडुरंग बलकवडे यांनी पुण्याचा प्रेरणादायी इतिहास जोपासण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे!’ पांडुरंग बलकवडे पुढे म्हणाले की, ‘छत्रपती शिवाजीमहाराज यांनी स्वराज्य निर्माण केले. त्यापासून आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांनी प्रेरणा घेतली. त्यांच्याकडून वासुदेव बळवंत फडके यांनी प्रेरणा घेतली; आणि त्यातून १८५७च्या स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा असंख्य क्रांतिकारकांनी घेतली. वास्तविक असंख्य क्रांतिकारकांच्या बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळाले असूनही त्याचे श्रेय एखाद्या व्यक्तीला देणे म्हणजे त्या सर्व क्रांतिकारकांच्या बलिदानाची कुचेष्टा करण्यासारखे आहे. त्यामुळेच २२ जून या दिनाचे स्मरण करणे म्हणजे क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या हौतात्म्याला अभिवादन करणे होय! स्वातंत्र्याचे सुराज्यात रूपांतर झाले पाहिजे. उद्याचा भारत हा भय, भ्रष्टाचार, दहशतवादमुक्त आणि मानवतेची चौकट असलेला विज्ञाननिष्ठ भारत घडविण्याचा संकल्प आपण करूया!’ ॲड. सतिश गोरडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अशोक नगरकर यांनी आभार मानले.

गणेशखिंड येथील चापेकर बंधू पुतळा, विद्यापीठ रस्ता, औंध गाव, काळेवाडी चौक, तापकीर चौक, डाॅ. हेडगेवार पथ, केशवनगर शाळा, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक, क्रांतिवीर चापेकर चौक, गांधीपेठ, चापेकर उर्दू शाळा ते क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय या मार्गावर मशाल दौड आणि बाईक रॅली काढण्यात आली होती. यामध्ये पारंपरिक वेषभूषेतील महिलांसह विविध वयोगटातील पुरुषांनी मोठ्या सहभाग घेतला. यावेळी देशभक्तिपर घोषणांनी वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते.

कार्यक्रमाच्या संयोजनात सागर शेवाळे, हर्षदा धुमाळ,पण 7)प्राजक्ता कदम, विशाल पाटील, किरण गायकवाड, विक्रम कुसाळकर, रोहित मोहिते, भीमराव जाधव, हृषीकेश हंकारे, रोहित बडे, विशाल कांबळे, अनिकेत कांबळे, महेश नरवडे यांनी परिश्रम घेतले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleभावी काळात बहुभाषिक कौशल्य महत्त्वाचे! – डॉ. सविता केळकर
Next Article सुर्वे यांनी आपल्या कवितेने मराठीला शुद्ध आणि समृद्ध केले! – डाॅ. श्रीपाल सबनीस
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

न्यायालयातील वकील कक्षात चोऱ्यांचे सत्र ; बॅगेतील आयपॅड लंपास

October 6, 2026

पुणे-लोणावळा तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गिकेची कालमर्यादा स्पष्ट करा

August 23, 2026

क्रांतितीर्थ चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालयात स्वातंत्र्यदिन संपन्न

August 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

सौ उमाताई खापरे (आमदार, विधान परिषद महाराष्ट्र), यांचा महिलांना स्वतःला ओळखा, पुढे जा आणि इतरांना सक्षम करण्याचा संदेश!!

By Hindavinewsnetwork@gmail.comOctober 12, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज | पिंपरी  महिलांनी स्वतःमधील दुर्गाशक्ती ओळखून स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा, स्वावलंबी बनावे आणि…

आदर्श मानवी मूल्यांची संस्कार गाथा म्हणजे ज्ञानेश्वरी -ह .भ .प प्रकाश काळे महाराज

October 11, 2026

आळंदीतील नरसिंह सरस्वती स्वामी महाराज चौकातील दुकानास लागलेल्या आगीत दुकानाचे प्रचंड नुकसान

October 11, 2026

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

October 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?