Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»नाल्यांवरील अतिक्रमणे तात्काळ हटवा; शहर विद्रुपीकरण करणाऱ्या जाहिरातदारांवर कारवाई करा – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश
पिंपरी चिंचवड

नाल्यांवरील अतिक्रमणे तात्काळ हटवा; शहर विद्रुपीकरण करणाऱ्या जाहिरातदारांवर कारवाई करा – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJune 12, 2026No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी, (हिंदवी न्यूज)– पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाईचे काम युद्धपातळीवर पुर्ण करून नाल्यांवरील अतिक्रमणे तात्काळ हटवा. तसेच नाल्यांचा प्रवाह सुरळीत ठेवण्याबाबत दक्षता घ्या, असे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले. याशिवाय अनधिकृतपणे जाहिरात फलक किंवा विविध ठिकाणी पत्रके चिकटवून शहर विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश डॉ.: सूर्यवंशी यांनी यावेळी दिले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विविध विभागांच्या कामकाजाबाबत आढावा बैठक घेतली, त्यावेळी सूचना देताना ते बोलत होते. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, प्रेरणा सिनकर, मनोज सेठिया, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, उप आयुक्त सचिन पवार, डॉ. प्रदीप ठेंगल, राजेश आगळे, व्यंकटेश दुर्वास, कार्यकारी अभियंता महेश बरीदे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य उद्यान अधिक्षक महेश गारगोटे यांच्यासह क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, राजाराम सरगर, अश्विनी गायकवाड, परशुराम वाघमोडे, अतुल पाटील, पुजा दुधनाळे, मुकेश कोळप आदी उपस्थित होते. बैठकीत नालेसफाई, शहर स्वच्छता, अनधिकृत जाहिरात, जलतरण तलाव कार्यान्वयन अशा प्रमुख विषयांसंदर्भात आढावा घेण्यात आला.

रस्ते दुभाजक, स्वच्छता तसेच सुशोभित चौक यावरून शहराची सुंदरता जाणवत असते. त्यामुळे या बाबी आकर्षक, स्वच्छ आणि सुंदर असायला हव्यात, शहरातील प्रमुख रस्ते दुभाजकांमध्ये सुशोभित झाडे लावावीत तसेच या झाडांची वेळोवेळी छाटणी करावी. महत्वाचे चौक देखील आकर्षक पद्धतीने सजवून त्या ठिकाणी स्वच्छता राखावी. सुशोभीकरणासाठी अनेक संस्थ, कंपन्या पुढे येत असतील तर त्यांचे सहकार्य घ्यावे. आपले शहर अधिक सुंदर असावे यासाठी पालिका कटिबद्ध असून बसथांबे, भिंती, कार्यालये, उद्याने, शाळा अशा सार्वजनिक ठिकाणी पोस्टर, स्टिकर्स किंवा जाहिरात फलकाच्या माध्यमातून शहराचे विद्रुपीकरण केले जात आहे. अशा व्यक्ती अथवा संस्थांवर दंडात्मक कारवाईसह फौजदारी कारवाई करण्याचा इशारा यावेळी आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी दिला. याबाबत त्यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना स्पष्ट निर्देश दिले असून यामध्ये हलगर्जीपणा केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

काही दिवसात पावसाळा सुरू होणार असून मुख्य रस्त्यांसह पुलावर पाणी तुंबणार नाही, यासाठी स्वच्छता मोहीम हाती घेऊन पाणी निचरा होणाऱ्या ठिकाणचा कचरा तातडीने हटवावा. नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी नालेसफाईचे काम युद्धपातळीवर पुर्ण करा. नाला बुजविणे अथवा नाल्यांवरील अतिक्रमणांच्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन कारवाई करा. नाल्यांवरील अतिक्रमण प्राधान्याने हटविले पाहिजे. पाणी तुंबल्यामुळे मोठी हानी होण्याची शक्यता असते, अशावेळी नाल्याचा नैसर्गिक मार्ग खुला असणे गरजेचे आहे. या प्रवाहाला कोणताही अडथळा होणार नाही याची दक्षता नालेसफाई करताना घ्यावी. शहरातील सर्व प्रमुख नाल्यांच्या सफाईबरोबरच औद्योगिक क्षेत्रातील नालेसफाई देखील करावी. यासाठी उद्योजक, औद्योगिक विभागाचे अधिकारी आणि महापालिका यांची समन्वय बैठक घेऊन त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले.

शहरातील महत्वाची ठिकाणे, उद्याने आणि सार्वजनिक जागांवरील स्वच्छतागृहांची नियमित साफसफाई ठेवा, तसेच मोडकळीस आलेल्या स्वच्छतागृहांची प्राधान्याने दुरूस्ती करा. महापालिकेच्या जलतरण तलावांबाबत केल्या जाणाऱ्या कार्यान्वयन पद्धतींवर सातत्याने पाहणी करून याबाबत कोणाचीही तक्रार येणार नाही असे नियोजन करावे. जलतरण तलावाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार अथवा जिवित हानी होणार नाही याची दक्षता याठिकाणी नियुक्त असलेल्या जीवरक्षक आणि कर्मचाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी दिले. विशेषत: पोहण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्यांकडे बारकाईने लक्ष ठेवावे तसेच नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही ते यावेळी म्हणाले.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नालेसफाईची कामे वेगाने सुरू आहे. पिंपरी चिंचवड शहरातील अनेक ठिकाणी सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या कामांमुळे तसेच रस्ते विकासाच्या कामांमुळे काही नाल्यांपर्यंत पोहोचण्यात अडथळे निर्माण होत आहेत. याशिवाय, खोल आणि अवघड भागातील नालेसफाईसाठी उपयुक्त ठरणाऱ्या स्पायडर मशीनची अनुपलब्धता हीदेखील मोठी अडचण ठरत आहे. मात्र, या सर्व अडचणी असूनही पालिकेने पर्यायी नियोजन करत नालेसफाईची मोहीम अखंड सुरू ठेवली आहे. शहरातील १४१ नाल्यांपैकी ९४ हजार ९१३ मीटर लांबीच्या नाल्यांच्या सफाईचे ८५.८४ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामालाही गती देण्यात आली आहे. गाळ, प्लास्टिक कचरा, झुडपे आणि इतर अडथळे हटवून नाल्यांमधील पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू आहे.

आरोग्य विभागाकडून संबंधित यंत्रणांशी सातत्याने समन्वय साधला जात असून, अडथळ्यांच्या ठिकाणी पर्यायी पद्धतीने काम पूर्ण करण्यासाठी विशेष नियोजन केले जात आहे. नागरिकांनीही नाल्यांमध्ये कचरा टाकू नये आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

.
*शहरातील नालेसफाई प्रगती
शहरातील एकूण नाले – १४१
* नाल्यांची एकूण लांबी – ९४ हजार ९१३ मीटर
* एकूण सफाई प्रगती – ८५.८४ टक्के
* मेट्रो, रस्ते, ड्रेनेज लाईन कामांमुळे काही ठिकाणी अडथळे

💬पावसाळ्यात नागरिकांना साचलेल्या पाण्याचा त्रास होऊ नये, यासाठी नालेसफाईच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. मेट्रो आणि रस्ते कामांमुळे काही तांत्रिक अडचणी असल्या तरी सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून काम पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि शहरातील पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.

-डॉ.  विजय सुर्यवंशी. आयुक्त पिंपरी चिंचवड महापालिका. 

💬पहिल्या पावसात नाल्यांमधील पाण्याचा वेग आण प्रवाह लक्षणीय वाढतो त्यात मेट्रोची सुरू असलेली कामे, ड्रेनेज लाईन, स्थापत्य विषयक कामे यामुळे पहिल्या पावसांमध्ये रस्त्यावरती पाणी साठण्याच्या घटना घडतात परंतु या सर्व कामासह नाले सफाईचे काम पावसाळ्या पूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असून पावसात रस्त्यावर पाणी साठणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेण्यात येत आहे.
-डॉ. प्रदीप ठेंगल, उप आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमराठी पत्रकार संघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी संजय मराठे यांची नियुक्ती
Next Article  भारतरत्न पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेतर्फे अभिवादन
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 27, 20260
Spread the love

मराठी पत्रकार संघ नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार समारंभात आमदार जगताप यांचे आश्वासन हिंदवी न्यूज | पिंपरी …

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?