Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»फुगेवाडी विषारी दारू प्रकरणातील दाखल रुग्ण मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर
पिंपरी चिंचवड

फुगेवाडी विषारी दारू प्रकरणातील दाखल रुग्ण मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJune 15, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

वायसीएम रुग्णालयातील तातडीच्या उपचारांमुळे रुग्णांना मिळाले नवजीवन

पिंपरी,(हिंदवी न्यूज)- फुगेवाडी विषारी दारू प्रकरणात बाधित तीनही रुग्णांची प्रकृती आता सुधारली असून त्यांनायशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार या सर्व रुग्णांवर संपूर्णपणे मोफत उपचार करण्यात आले.

विषारी दारू सेवनामुळे गंभीर स्थितीत रुग्णांना वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल होताच तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू करण्यात आले. तसेच आवश्यक वैद्यकीय चाचण्या, औषधोपचार आणि विशेष निगा पुरविण्यात आली. रुग्णांच्या नातेवाईकांनाही वेळोवेळी आवश्यक ते सहकार्य व मार्गदर्शन करण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी आणि आवश्यक औषधोपचार यांच्या मदतीने रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली.

या रुग्णांच्या उपचार प्रक्रियेत वायसीएम रुग्णालयाच्या मेडिसिन विभागाने अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विभागातील अनुभवी डॉक्टरांनी रुग्णांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवत आवश्यक उपचार पद्धतींचा अवलंब केला. ज्यामुळे आता सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर झाली असून ते पूर्णपणे बरे होऊन निरोगी अवस्थेत घरी परतत आहेत. महापालिका प्रशासनाच्या तत्परतेमुळे आणि वायसीएम रुग्णालयातील वैद्यकीय यंत्रणेच्या समन्वित प्रयत्नांमुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचविणे शक्य झाले. यामुळे पुन्हा एकदा वायसीएम रुग्णालयाची आपत्कालीन आरोग्य सेवा आणि तज्ज्ञ वैद्यकीय कर्मचाऱ्यांची क्षमता अधोरेखित झाली आहे.

रुग्णांच्या तब्येतीत सुधारणा आणण्यासाठी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, अति. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. उज्ज्वला अंदूरकर, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार, मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. प्रवीण सोनी तसेच डॉ. राहुल गायकवाड, डॉ. राम मुंढे आणि डॉ. नम्रता करकनाळे यांनी विशेष परिश्रम घेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली व रुग्णांच्या उपचारादरम्यान कोणतीही कमतरता राहू नये याची काळजी घेतली.

 

💬विषारी दारू प्रकरणातील बाधित रुग्णांना तातडीने आणि सर्वोत्तम उपचार मिळावेत यासाठी महापालिकेने आवश्यक त्या सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या. सर्व रुग्णांची प्रकृती सुधारून त्यांना घरी जाता येत आहे, ही समाधानाची बाब आहे. वायसीएम रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे.

– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

 

💬विषारी दारू प्रकरणातील रुग्णांची स्थिती लक्षात घेऊन त्यांच्यावर तातडीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने उपचार करण्यात आले. विविध विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी समन्वयाने काम करत रुग्णांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवले. वैद्यकीय विभागाच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर केलेल्या उपचारांमुळे सर्व रुग्णांची प्रकृती पूर्णपणे सुधारणे शक्य झाले.

– डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

…….

💬आपत्कालीन परिस्थिती तज्ज्ञ डॉक्टरांनी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी रुग्णांवर अत्यंत दक्षतेने उपचार केले. रुग्णांची प्रकृती सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व तपासण्या, औषधोपचार आणि सुविधा वायसीएम रुग्णालयामार्फत वेळेत व मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या.

– डॉ. अभयचंद्र दादेवार, अति. आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleस्थायी समिती सभेत विविध विकासकामे, आरोग्य, शिक्षण व मूलभूत सुविधांसंबंधित महत्त्वाचे विषय मंजूर
Next Article राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त महापौर रवि लांडगे यांच्यासह पदाधिका-यांची नियोजन बैठक
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 27, 20260
Spread the love

मराठी पत्रकार संघ नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार समारंभात आमदार जगताप यांचे आश्वासन हिंदवी न्यूज | पिंपरी …

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?