Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»बचत गटातील महिलांकडून घरोघरी ५ लाखांहून अधिक मालमत्ता कर बिलांचे वितरण
पिंपरी चिंचवड

बचत गटातील महिलांकडून घरोघरी ५ लाखांहून अधिक मालमत्ता कर बिलांचे वितरण

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comMay 16, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

लवकरात लवकर कर भरून सवलतींचा लाभ घ्या, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आवाहन

पिंपरी, (हिंदवी न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या करआकारणी व कर संकलन विभागाकडून आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी मालमत्ता कर संकलन मोहीम सुरू असून, शहरातील मालमत्ताधारकांना महिला बचत गटांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन मालमत्ता कर बिलांचे वितरण करण्यात येत आहे.

निवासी, बिगर निवासी, औद्योगिक तसेच इतर मालमत्ताधारकांना प्रत्यक्ष भेट देत बचत गटातील महिलांकडून आतापर्यंत ५ लाख ९ हजार ७४७ इतक्या मालमत्ता कर बिलांचे वितरण करण्यात आले आहे. महापालिकेच्या वतीने नागरिकांना वेळेत मालमत्ता कर भरून विविध सवलतींचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विशेषतः ऑनलाइन पद्धतीने मालमत्ता कर भरल्यास १० टक्क्यांपर्यंत सवलत मिळत असल्याने नागरिकांनी या सुविधेचा त्वरित लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

१ एप्रिल २०२६ ते १२ मे २०२६ या कालावधीत महिला बचत गटांकडून एकूण ५ लाख ९ हजार ७४७ मालमत्ता कर बिलांचे वितरण करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहरात सध्या ७ लाख ६६ हजार ३८५ मालमत्तांची नोंद असून, त्यापैकी आतापर्यंत १ लाख ५३ हजार ९०२ मालमत्ताधारकांनी कर भरला आहे. यामधून महापालिकेला १४८ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला असून, ऑनलाइन कर भरण्यास नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

 

मालमत्ता कराची बिले ऑनलाइन भरा

सध्या उन्हाळ्याचे तीव्र तापमान व उष्माघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता घराबाहेर पडण्याचा त्रास टाळण्यासाठी नागरिकांनी मालमत्ता कर भरण्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करावा. ऑनलाइन कर भरणे सुरक्षित, जलद व सुलभ असून घरबसल्या काही मिनिटांत कर भरता येतो. यामुळे रांगेत उभे राहण्याचा त्रास टाळता येतो तसेच वेळेची बचत होते. विशेष म्हणजे ऑनलाइन पद्धतीने कर भरल्यास सवलतींचाही लाभ मिळतो. त्यामुळे नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त वापर करून वेळेत मालमत्ता कर भरावा.ज्या मालमत्ताधारकांना अद्याप ऑनलाइन अथवा घरपोच स्वरूपात बिल प्राप्त झाले नसेल, त्यांनी संबंधित कर संकलन विभाग कार्यालयाशी संपर्क साधून बिल प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन उपायुक्त सचिन पवार यांनी केले आहे.

थकबाकीदारांना बिलासोबत जप्तीपूर्व नोटीस

मालमत्ता कर थकबाकीदारांना वितरित करण्यात येणाऱ्या प्रत्येक बिलासोबत जप्तीपूर्व नोटीसही देण्यात येत आहे. आतापर्यंत २४ हजार ६२६ थकबाकीदार मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात आली असून, संबंधितांनी तात्काळ थकबाकीसह चालू आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर भरावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

 

पिंपरी चिंचवड शहराच्या विकासासाठी मालमत्ता कर हा महत्त्वाचा महसुलाचा स्रोत आहे. नागरिकांनी वेळेत मालमत्ता कर भरून महापालिकेला सहकार्य करावे. महिला बचत गटांच्या माध्यमातून घरोघरी बिल वाटप केल्यामुळे नागरिकांना मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. ऑनलाइन कर भरणाऱ्यांना दिली जाणारी सवलत नागरिकांसाठी लाभदायी असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.

— रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

 

महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून शहरातील सर्व मालमत्ताधारकांपर्यंत महिला बचत गटांच्या माध्यमातून मालमत्ता कर बिल पोहोचविण्याचे काम सुरू आहे. ज्या नागरिकांना अद्याप बिल प्राप्त झाले नाही, त्यांनी विभागीय कार्यालयाशी त्वरित संपर्क साधावा. थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू असून नागरिकांनी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी तात्काळ थकबाकीसह चालू आर्थिक वर्षाचा कर भरावा.

— सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत महापौर रवि लांडगे यांचा सायकलने प्रवास
Next Article छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्य रक्षणासाठी दिलेले बलिदान आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी – महापौर रवि लांडगे
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 27, 20260
Spread the love

मराठी पत्रकार संघ नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार समारंभात आमदार जगताप यांचे आश्वासन हिंदवी न्यूज | पिंपरी …

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?