Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»मालमत्ता कर संकलनाचा पहिल्या तिमाहीतच ‘माईलस्टोन’ !
पिंपरी चिंचवड

मालमत्ता कर संकलनाचा पहिल्या तिमाहीतच ‘माईलस्टोन’ !

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJuly 1, 2026No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

५२६ कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा, ४ लाख ४५ हजार ६२० मालमत्ताधारकांनी घेतला कर सवलतींचा लाभ

महापौर रवि लांडगे, आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी करदात्यांचे मानले आभार

पिंपरी, (हिंदवी न्यूज)- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये कर वसुलीचा उच्चांकी ‘माईलस्टोन’ गाठला आहे. अवघ्या तीन महिन्यांत ५२६ कोटी १४ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात विभागाला यश आले आहे. ७ लाख ४४ हजार ६३० नोंदणीकृत मालमत्ता धारकांपैकी पहिल्या तिमाहीमध्येच ५९.८४ टक्के मालमत्ता धारकांनी कराचा भरून विविध सवलतींचा लाभ घेतला आहे. याबद्दल सर्व करदात्यांचे महापौर रवि लांडगे, आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी आभार मानले आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात सध्या निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक व इतर मिळून सुमारे ७ लाख ४४ हजार ६३० मालमत्तांची नोंद असून त्यापैकी ४ लाख ४५ हजार ६२० मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला आहे. पहिल्या तिमाहित कर भरणा-या नागरिकांची संख्या दरवर्षी वाढत आहे. नागरिकांनी मालमत्ताकर भरण्यासाठी करसंकलन विभागाने विविध उपाययोजना राबविल्या. त्याच्या माध्यमातून करदात्यांपर्यंत मालमत्ताकरावरील सवलतीबाबत विविध प्रकारे जनजागृती करण्यात आली. यामुळे नागरिकांना सवलतीबाबत माहिती होऊन नागरिकांनी पहिल्या तिमाहीमध्येच आपला मालमत्ताकर भरण्यासाठी प्राधान्य दिले आहे. सवलतीबाबत जनजागृती झाल्याने परिणामी, सन २०२६-२७ या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये एकूण मालमत्ताधारकांपैकी ४ लाख ४५ हजार ६२० मालमत्ताधारकांनी कर भरला असून त्यापैकी ३ लाख ४७ हजार ५६४ मालमत्ता धारकांनी ऑनलाइन स्वरूपात कर भरून सवलतींचा लाभ घेतला आहे. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही पालिकेने राबविलेल्या महिला बचत गटामार्फत मालमत्ताधारकांना घरपाेच बिलाचे वाटप केले, त्यामुळे नागरिकांनी ३० जूनपर्यंत महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वाधिक कराचा भरणा केल्याची माहिती उपायुक्त सचिन पवार यांनी दिली.

…..

*असा आला मालमत्ता कर*

ऑनलाइन – ४०७ कोटी ८९ लाख

रोख – २१ कोटी ४७ लाख

धनादेशाद्वारे – १६ काेटी २४ लाख

डीडी – १५ काेटी ७५ लाख

विविध अँप- १० काेटी ४५ लाख

…..

*कर भरणाऱ्या मालमत्तांची आकडेवारी*

निवासी- ३ लाख ८२ हजार ५२२

बिगरनिवासी – ३३ हजार ७९३

मिश्र- ८ हजार ६२३

औद्योगिक – ३ हजार ७५

मोकळ्या जमीन – २ हजार ५९१

इतर – १३
…..

*वाकड झोनमधून उच्चांकी कर वसूल*

शहरात कर संकलनासाठी महापालिकेचे १८ झोन आहेत. यामध्ये वाकड विभागीय कार्यालयांतर्गत सर्वात जास्त वसुली झाली आहे. वाकडमध्ये ७२ कोटी ८७ लाख, थेरगाव ४६ कोटी ७१ लाख, कस्पटे वस्ती ३९ कोटी ३३ लाख, चिखली कार्यालयाने ३७ कोटी ९५ लाख, किवळे ३८ कोटी ३७ लाख, चिंचवड ३४ कोटी ४७ लाख, भोसरी ३४ कोटी ७३ लाख, मोशी ३१ कोटी २२ लाख, पिंपरी वाघेरे ३२ कोटी ५३ लाख, सांगवी २६ कोटी, मनपा भवन २८ कोटी ७५ लाख, आकुर्डी २३ कोटी ९० लाख, च-होली १७ कोटी ८२ लाख, फुगेवाडी २० कोटी ९७ लाख, दिघी-बोपखेल ११ कोटी ८८ लाख, तळवडे ११ कोटी २३ लाख, निगडी प्राधिकरण १३ कोटी २५ लाख, पिंपरीनगर ३ कोटी ९९ लाख असा कर वसुल झाला आहे.
……..

*पहिल्या तिमाहीत कर वसुलीचा वाढता आलेख*

वर्ष व वसुल झालेल्या कराची रक्कम

२०२१-२२ : १७१ कोटी

२०२२-२३ : २५५ कोटी

२०२३ – २४ : ४५४काेटी

२०२४-२५ : ४४० कोटी

२०२५- २६ ः ५२४ काेटी

२०२६-२७ ः ५२६ काेटी
……..

करसंकलन विभागाने करवसुलीसाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले. यामुळे नागरिकांमध्ये कर भरण्यामध्ये उत्साह निर्माण झाला. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वाधिक नागरिकांनी पहिल्या तिमाहीमध्येच कर भरून विविध सवलतीचा लाभ घेतला आहे. सर्व करदात्या नागरिकांचे मनःपूर्वक आभार.
– रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महापालिका
……….

करसंकलन विभागाद्वारे नागरिकांना मालमत्ताकरावरील सवलतींचा लाभ घेण्यासाठी सोशल मिडियासह विविध प्रकारे जनजागृती, एसएमएसद्वारे आवाहन करण्यात आले. नागरिकांनी आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत पहिल्या तिमाहीमध्येच कर भरण्यास प्राधान्य देऊन शहर विकासात माेठा हातभार लावला आहे.

-डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
……..

मालमत्ताकरावरील सवलतींची माहिती व मालमत्ताकराचे बिले वेळेवर पोहोचल्याने नागरिकांनी यावर्षीही पहिल्या तिमाहीमध्ये मोठ्या प्रमाणात कराचा भरणा केला आहे. नावीन्यपूर्ण कल्पना व उपक्रमांच्या सांघिक कामगिरीमुळे करसंकलनामध्ये आम्ही सातत्य राखून नागरिकांना पहिल्या तिमाहीमध्ये कर भरण्यासाठी प्रवृत्त करू शकलो आहोत. त्यामुळेच ५२६ कोटींचा टप्पा गाठण्यात आम्ही यशस्वी झालाे.

– तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
……..

पहिल्या तिमाहीतच जास्तीत जास्त कर वसुल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यानुसार सुक्ष्म नियोजन केले, वेळोवेळी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आढावा घेतला. त्यामुळेच ५२६ कोटींचा कर वसुल करण्यात यश आले. विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सांघिक कामगिरीमुळे हे शक्य झाले. मोठ्या थकबाकीदारांना यापूर्वीच जप्तीच्या नोटिसा बजावल्या आहेत. अशा मोठ्या आणि व्यावसायिक थकबाकीदारांकडे यापुढील काळात लक्ष केंद्रित करण्यात येणार असून जप्ती माेहित सुरू केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली मालमत्ता जप्त हाेऊ नये, यासाठी तात्काळ कराचा भरणा करावा.
– सचिन पवार, उपायुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleशहराच्या विकासाचे शिल्पकार कै. अण्णासाहेब मगर यांच्या नावाने दापोडी–निगडी हमरस्ता ओळखला जाणार
Next Article प्राचार्य गौतम मगरे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 27, 20260
Spread the love

मराठी पत्रकार संघ नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार समारंभात आमदार जगताप यांचे आश्वासन हिंदवी न्यूज | पिंपरी …

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?