Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

October 11, 2026

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»महापालिकेच्या वतीने जागतिक मल्टिपल स्क्लेरोसिस जनजागृती दिन साजरा
पिंपरी चिंचवड

महापालिकेच्या वतीने जागतिक मल्टिपल स्क्लेरोसिस जनजागृती दिन साजरा

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJune 8, 2026Updated:June 8, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी, (हिंदवी न्यूज )– जागतिक मल्टिपल स्क्लेरोसिस जनजागृती दिन” निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवन फाऊंडेशन आणि मल्टिपल स्क्लेरोसिस सोसायटी ऑफ इंडिया (एमएसएसआय), पुणे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग भवन फाऊंडेशन येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उप आयुक्त ममता शिंदे व दिव्यांग भवनच्या सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाद्वारे मल्टिपल स्क्लेरोसिस (एमएस) या आजाराबाबत जनजागृती निर्माण करण्याबरोबरच रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक मार्गदर्शन व आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर जागतिक मल्टिपल स्क्लेरोसिस दिनाचे महत्त्व आणि या आजाराविषयी समाजात जनजागृती निर्माण करण्याची गरज याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली.

दिव्यांग भवन फाऊंडेशनमध्ये उपलब्ध असलेल्या विविध सुविधा व सेवांविषयी पूजा भापकर यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच मोहना परांजपे, ज्योती रोंघे आणि व्ही. व्ही. रमणी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते न्युरोलॉजिस्ट डॉ. परेश बाबेल यांनी मल्टिपल स्क्लेरोसिस या आजाराविषयी सखोल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मल्टिपल स्क्लेरोसिस हा मेंदू आणि मज्जारज्जूवर परिणाम करणारा दीर्घकालीन न्यूरोलॉजिकल आजार असून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मज्जातंतूंवरील मायेलिन या संरक्षक आवरणावर हल्ला करते. त्यामुळे मेंदू आणि शरीरातील संदेशवहनात अडथळे निर्माण होतात. दृष्टीदोष, हात-पायात मुंग्या येणे, अशक्तपणा, तोल जाणे, थकवा आणि स्नायूंमध्ये ताठरपणा ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. योग्य वेळी निदान आणि उपचार केल्यास रुग्णांचे जीवनमान सुधारण्यास मोठी मदत होते, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा दिव्यांग भवन फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण, जनजागृती आणि समाजातील सर्व घटकांचा सहभाग यांचे महत्त्व अधोरेखित केले. दिव्यांगत्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

सामान्य नागरिकांना मल्टिपल स्क्लेरोसिस असलेल्या व्यक्तींना दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी एमएसएसआय, पुणे विभागाशी संलग्नित रोषे कंपनीच्या सहकार्याने विशेष ‘अनुभव क्षेत्र’ उभारण्यात आले होते. या उपक्रमात उपस्थितांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

यावेळी एगलन्स मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेडचे निशाद बागवडे यांनी सामाजिक बांधिलकी जपत सचिन तुरुकमारे यांना इलेक्ट्रिक बाईक भेट दिली. तसेच मल्टिपल स्क्लेरोसिस आजाराने ग्रस्त असलेल्या दिव्यांग व्यक्तींनी आपले अनुभव कथन करत सकारात्मक दृष्टिकोनातून या आजारावर मात करून जीवन अधिक सुकर कसे केले, याबाबत उपस्थितांना  मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम समन्वयक नंदकुमार फुले यांनी केले. उपस्थित मान्यवरांचा परिचय समुपदेशक तथा कार्यक्रम व्यवस्थापक दर्शना फडतरे यांनी करून दिला. कार्यक्रमाच्या शेवटी दिव्यांग समन्वयक तुकाराम शेवाळे यांनी आभार मानले,  कार्यक्रमाचे इतिवृत्त समुपदेशक तथा कार्यक्रम व्यवस्थापक सुनीता गावित यांनी सादर केले.

या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर, दिव्यांग व्यक्ती, त्यांचे पालक, स्वयंसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसंजयनगर, फुगेवाडी येथील झोपडपट्टीतील विनापरवाना झोपडीवर कारवाई
Next Article जुनी सांगवीत प्रभाग क्र. ३२ मध्ये अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

October 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

महिलांनो, कष्ट करा; स्वावलंबी बना! — सौ. मनीषा योगेश चिंचवडे

By Hindavinewsnetwork@gmail.comOctober 11, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज प्रस्तुत ‘नवदुर्गा’ मालिका हिंदवी न्यूज | पिंपरी : हिंदवी न्यूजच्या ‘नवदुर्गा’ या विशेष…

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?