Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
    • मावळ
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • व्हिडिओ
  • en English
    • en English
    • hi Hindi
    • mr Marathi

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

आंतरराष्ट्रीय झिरो वेस्ट दिनानिमित्त विविध उपक्रम

April 2, 2026

छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर

April 2, 2026

छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

April 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
    • मावळ
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • व्हिडिओ
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कृषी
  • उद्योग – व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • व्हिडिओ
Home»कला»मीना शिंदे काव्यदीप पुरस्काराने सन्मानित
कला

मीना शिंदे काव्यदीप पुरस्काराने सन्मानित

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comMarch 28, 2026Updated:March 28, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

चिंचवड (हिंदवी न्यूज)

 पिंपरी – चिंचवड येथील ज्येष्ठ कवयित्री आणि गझलकारा मीना शिंदे यांना गुरुवारी, (दि. २६)  ‘काव्यदीप पुरस्कार २०२६’ने सन्मानित करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र, कर्वे रोड, डेक्कन कॉर्नर, पुणे येथे साहित्यदीप प्रतिष्ठान, पुणे आयोजित या पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे कार्यवाह आणि सुप्रसिद्ध कवयित्री अंजली कुलकर्णी होत्या. साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ज्योत्स्ना चांदगुडे आणि कार्याध्यक्ष धनंजय तडवळकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

ज्योत्स्ना चांदगुडे यांनी प्रास्ताविक केले.  ‘मीना शिंदे सुमारे पस्तीस वर्षांपासून आशयघन कविता आणि गझल लिहीत आहेत. त्या कवितांच्या सन्मानार्थ ‘काव्यदीप पुरस्कार २०२६’ प्रदान करून त्यांना सन्मानित करताना आम्हाला खूप आनंद होत आहे’ अशा भावना  त्यांनी या वेळी व्यक्त केल्या.  मीना शिंदे यांनी आपल्या मनोगतातून, ‘पुण्यातील अतिशय नावाजलेल्या आणि प्रतिष्ठित अशा साहित्यदीप प्रतिष्ठानकडून आणि माझ्या आवडत्या कवयित्री अंजली कुलकर्णी यांच्या शुभहस्ते काव्यदीप पुरस्काराने मला गौरविण्यात आले याचा मनस्वी आनंद वाटतो. कवितेचे विविध प्रकार हाताळत असताना मी गझलेतही विविध प्रयोग केले. या प्रयत्नांची वेळोवेळी दखल घेतली गेली याविषयी समाधान वाटत असलेतरी काव्यक्षेत्रात मला अजून बरेच मैलांचे दगड मला पार करायचे आहेत!’ अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली. अंजली कुलकर्णी यांनी अध्यक्षीय मनोगतातून,  ‘गझलकारा मीना शिंदे यांना मिळालेला साहित्यदीपचा काव्यदीप पुरस्कार हा अतिशय प्रतिष्ठेचा पुरस्कार असून त्यासाठी त्या अभिनंदनास पात्र आहेत. उत्तम शब्दकळा, सकारात्मक विचार, समृद्ध आशय आणि तंत्रशुद्ध कलाकुसर यांचा सुंदर समन्वय त्यांच्या रचनांमध्ये आढळतो!’ असे गौरवोद्गार काढले.

पुरस्कार सोहळ्यानंतर दुसर्‍या सत्रात ‘स्पंदन’ या निमंत्रितांच्या महिला कविसंमेलनात ज्योत्स्ना चांदगुडे, प्रभा सोनवणे, मीरा शिंदे, मृणालिनी कानिटकर, प्राजक्ता वेदपाठक, चिन्मयी चिटणीस, ललिता सबनीस, मृदुला कुलकर्णी – खैरनार, सविता इंगळे, तरूजा भोसले, रेखा येळंबकर, शीला टाकळकर, राजश्री सोले आणि मीना शिंदे यांनी स्त्रीजाणिवांच्या स्वरचित कवितांचे अप्रतिम सादरीकरण केले. निरूपमा महाजन यांनी कविसंमेलनाचे सूत्रसंचालन केले.  ऋचा कर्वे यांनी पुरस्कार सोहळ्याचे निवेदन केले. प्रतिभा पवार यांनी आभार मानले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleचिंचवडगाव येथे श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव
Next Article क्रीडा,कला,साहित्य व सांस्कृतिक समितीच्या बैठकीत महापौरांच्या हस्ते कलाकार, खेळाडू व साहित्यिकांचा सन्मान करण्याचा ठराव मंजूर.
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

आंतरराष्ट्रीय झिरो वेस्ट दिनानिमित्त विविध उपक्रम

April 2, 2026

छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर

April 2, 2026

छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

April 2, 2026

महापालिकेच्या कार्यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान – सहआयुक्त मनोज लोणकर

April 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

आंतरराष्ट्रीय झिरो वेस्ट दिनानिमित्त विविध उपक्रम

By Hindavinewsnetwork@gmail.comApril 2, 20260
Spread the love

पिंपरी, (हिंदवी न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने दापोडी येथील आनंदवन झिरो…

छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर

April 2, 2026

छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

April 2, 2026

महापालिकेच्या कार्यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान – सहआयुक्त मनोज लोणकर

April 2, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

Our Picks
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • पिंपरी चिंचवड
    • पुणे
      • मावळ
    • महाराष्ट्र
    • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • समाजकारण
    • गुन्हेगारी
    • आरोग्य
    • कृषी
    • उद्योग – व्यापार
    • कला
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • शैक्षणिक
    • व्हिडिओ
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?