पिंपरी (हिंदवीन्यूज)- स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, निगडी प्राधिकरण येथे शुक्रवार, दिनांक ०१ मे २०२६ पासून तीन दिवसीय छत्रपती शिवाजीमहाराज व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. रोज सायंकाळी सात वाजता व्याख्यानाचा प्रारंभ होईल. यामध्ये शुक्रवार, दिनांक ०१ मे रोजी माजी खासदार प्रदीप रावत ‘भारतीय राज्यघटनेतील धर्मस्वातंत्र्य आणि इस्लाम’ या विषयावर प्रथम पुष्प गुंफतील. शनिवार, दिनांक ०२ मे रोजी इतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत ‘अजिंक्य योद्धा बाजीराव आणि पालखेडची लढाई’ या विषयावर द्वितीय पुष्पाची गुंफण करतील. रविवार, दिनांक ०३ मे रोजी मार्क्सवादाचे अभ्यासक प्रा. डॉ. प्रसन्न देशपांडे ‘सांस्कृतिक क्रांती की भ्रांती?’ या विषयावर अंतिम पुष्प गुंफतील. यंदा बेचाळिसाव्या वर्षात पदार्पण करीत असलेल्या या विनाशुल्क व्याख्यानमालेचा लाभ सर्व नागरिकांनी आवर्जून घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष विजयशंकर कर्ता, कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे, सचिव ॲड. हर्षदा पोरे आणि कोषाध्यक्ष विकास देशपांडे यांनी केले आहे.
![]()
