पालखीची हरिनाम गजरात नगरप्रदक्षिणा
हिंदवी न्यूज |
आळंदी : आळंदीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात भागवत एकादशी दिनी लक्षवेधी पुष्प सजावट भाविकांचे लक्ष वेधत होती. श्रींचे दर्शनास भाविकांनी गर्दी केली होती. श्रींचे पालखीची हरिनाम गजरात नगरप्रदक्षिणा झाली. इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरती सेवा समितीचे वतीने इंद्रायणी आरती उत्साहात झाली. यावेळी संयोजक अनिताताई झुजम, अर्जुन मेदनकर, गोविंद ठाकूर, बाबासाहेब भंडारे, बाबुराव मोरे, सरस्वती भागवत, नीलम कुरधोंडकर, अनिता शिंदे, शिला कुलकर्णी, उषा पाटील, कौसल्या देवरे, पुष्पा लेंडघर, तारामती गोरे, काशीबाई अडकने, जयश्री भागवत, उषाताई काकडे, चेतनाताई ढमढेरे आदी मान्यवर उपस्थित होते.









