पिंपरी ( हिंदवी न्यूज )
गेल्या काही दिवसांपासून काळेवाडीतील एका अनधिकृत चर्चमध्ये भोंदू पास्टरकडून गरीब नागरीकांना पैशाचे आमिष दाखवून अंधश्रध्दा पसरवण्याचे काम सर्रास सुरु आहे. शहरातील गरीब आणि अशिक्षित बांधवांना धर्मांतराच्या जाळ्यात ओढले जात आहे. त्याविरोधात समस्त काळेवाडी ग्रामस्थांच्या वतीने रविवार दि. ३ मे रोजी सायंकाळी चार वाजता पंचनाथ चौक काळेवाडी ते आबाजी नाणेकर चौक काळेवाडी परीसरात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकांना गंभीर स्वरुपाचे आजार चमत्काराने व प्रार्थना केल्याने बरे होत असल्याचे सांगून त्यांचे धर्मांतर केले जात आहे. असे परीसरातील नागरीकांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे अनधिकृत चर्च कायमस्वरुपी बंद व्हावे , तसेच अंधश्रध्दा व धर्मांतरासारखे प्रकार रोखण्यासाठी हा जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. परीसरातील नागरीकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन काळेवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
![]()
