पिंपरी (हिंदवी न्यूज)
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरातील कस्तुरी मार्केट परिसरातील ५० अनधिकृत दुकानांवर धडक कारवाई केली. महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी व अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या आदेशान्वये करण्यात हि कारवाई करण्यात आली. अतिक्रमण उपायुक्त तथा ‘फ’ क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. प्रशासन अधिकारी महादेव बोरे यांनी कारवाईचे नेतृत्व केले.
यावेळी मार्केटमधील दुकानांनी केलेले अनधिकृत साईड मार्जिन, फ्रंट मार्जिन यासह रस्त्यावर अनधिकृतपणे उभारलेली लोखंडी पत्राशेड हटविण्यात आली. या अतिक्रमणांमुळे परिसरातील वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे हि धडक कारवाई करण्यात आली. कारवाईसाठी ३ जेसीबी मशीन, ३ पिंजरा गाड्या, ४३ एमएसएफ जवान आणि ६ मनपा मजूरांचा ताफा तैनात करण्यात आला होता. कारवाईतील पारदर्शकतेसाठी संपूर्ण कारवाईचे चित्रीकरण देखील यावेळी करण्यात आले.
