Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

चिखली घरकुल परिसरातील पावसाळी पाण्याचा प्रश्न मार्गी लावा – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

November 26, 2026

संविधान सन्मान दौडनिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

November 26, 2026

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे राजकीय क्षेत्रातील अष्टपैलु व्यक्तिमत्त्व लाभलेले थोर मुत्सद्दी नेते- महापौर रवि लांडगे

November 26, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»शैक्षणिक»पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांचा दहावीचा निकाल ९०.२४ टक्के
शैक्षणिक

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांचा दहावीचा निकाल ९०.२४ टक्के

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comMay 10, 2026Updated:May 10, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी (हिंदवी न्यूज),

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांनी यंदाच्या दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले असून महापालिकेच्या १७ माध्यमिक मराठी शाळांचा एकूण निकाल ८८.५९ टक्के लागला आहे. तसेच उर्दू माध्यमाच्या ८ शाळांचा निकाल ९७.८७ टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी महापालिकेने राबविलेल्या विविध उपक्रमांना या निकालातून यश मिळाल्याचे दिसून आले आहे. महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, शिक्षण समिती सभापती रविना आंगोळकर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उपायुक्त ममता शिंदे तसेच प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे अभिनंदन केले आहे.

यंदा दहावीच्या परीक्षेसाठी महापालिकेच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या २५ माध्यमिक शाळांमधून एकूण २ हजार ९२५ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी प्रत्यक्ष परीक्षेला २ हजार ९०९ विद्यार्थी हजर होते. त्यापैकी २ हजार ६२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून १६ विद्यार्थी गैरहजर राहिले. तर २८४ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या निकालामध्ये ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणारे ९३ विद्यार्थी, ८५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविणारे ५८ विद्यार्थी असून, ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १७ इतकी आहे. तसेच २२ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आधुनिक व दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी स्मार्ट क्लासरूम, डिजिटल शिक्षण पद्धती, अनुभवी शिक्षकवर्ग, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, विशेष अतिरिक्त तास, सराव परीक्षा तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांनी केलेल्या कठोर परिश्रमासोबतच शिक्षक, मुख्याध्यापक आणि पालकांच्या सहकार्यामुळे हे यश मिळाल्याची भावना शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे महापालिका प्रशासनाकडून अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

 

विद्यार्थ्यांचा केला जाणार सन्मान

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार असून त्यांना पारितोषिक देण्यात येणार आहे. यामध्ये ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यांना प्रत्येकी १ लाख रुपये, ८५ ते ८९.९९ टक्के गुण प्राप्त विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये, ८० ते ८४.९९ टक्के गुण प्राप्त विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये तसेच दिव्यांग उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे.

 

“महापालिकेच्या शाळांनी यंदाही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांनी केलेले कठोर परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे हे यश शक्य झाले आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. भविष्यातही विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.

– रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

 

महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी यंदा मिळवलेले यश अभिमानास्पद आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी घेतलेली मेहनत आणि शिक्षण विभागाने राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे हे फलित आहे. आगामी काळातही शिक्षणाची गुणवत्ता अधिक वाढवून विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक वातावरणात सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील.

– ममता शिंदे, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

 

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleकस्तुरी मार्केट येथील ५० अनधिकृत दुकाने व पत्राशेडवर पालिकेची धडक कारवाई
Next Article क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीच्या बैठकीत ४ महत्त्वाचे ठराव मंजूर
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या निवडीने पिंपरी-चिंचवडचा साहित्यविश्वात गौरव- आमदार शंकर जगताप

November 24, 2026

विविध भारती म्युझिकल इव्हेंटचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात

November 22, 2026

आमदार महेश दादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते निलेश बोराटे यांची सामाजिक बांधिलकी !

November 22, 2026

वुई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने कष्टकरी, वंचित समाजासाठी लोकसहभागातून विविध उपक्रम

November 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड महापालिका

चिखली घरकुल परिसरातील पावसाळी पाण्याचा प्रश्न मार्गी लावा – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

By Hindavinewsnetwork@gmail.comNovember 26, 20260
Spread the love

पर्यायी पाण्याच्या निचऱ्याचे नियोजन तातडीने पूर्ण करण्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश हिंदवी न्यूज…

संविधान सन्मान दौडनिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

November 26, 2026

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे राजकीय क्षेत्रातील अष्टपैलु व्यक्तिमत्त्व लाभलेले थोर मुत्सद्दी नेते- महापौर रवि लांडगे

November 26, 2026

पुणे मेट्रो मार्गिका-३ वरील बालेवाडी हायस्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन स्थानके प्रवासी सेवेत दाखल!

November 26, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?