Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»ऊर्जा बचत धोरणाबाबत महापालिकेची महत्त्वपूर्ण बैठक
पिंपरी चिंचवड

ऊर्जा बचत धोरणाबाबत महापालिकेची महत्त्वपूर्ण बैठक

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comMay 15, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

ऊर्जा बचत प्रकल्पांसाठी निधी संरचना आणि अंमलबजावणीबाबत चर्चा

 

पिंपरी,(हिंदवी न्यूज) : महापालिकेच्या इमारतींमध्ये ऊर्जा बचतीसाठी राबविण्यात येणारे उपक्रम हे केवळ अभ्यास, अहवाल आणि सादरीकरणांपुरते मर्यादित राहता कामा नयेत. प्रत्यक्ष अंमलबजावणीतून वीज वापरात लक्षणीय बचत आणि कार्यक्षम ऊर्जा व्यवस्थापनाचे ठोस परिणाम दिसून येणे गरजेचे आहे. त्यासाठी वेळबद्ध कृती आराखडा तयार करून ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहे. पर्यावरण संवर्धन, आर्थिक बचत आणि शाश्वत विकास या तिन्ही उद्दिष्टांचा समतोल साधणारी कार्यपद्धती महापालिकेने स्वीकारणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इमारतींमध्ये ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानाचा अवलंब करून वीज बचत, खर्च नियंत्रण आणि पर्यावरण संवर्धन साध्य करण्याच्या उद्देशाने ऊर्जा बचत धोरणांतर्गत विविध उपाययोजनांबाबत महत्त्वपूर्ण बैठक पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात संपन्न झाली. या बैठकीत महापालिकेच्या विविध प्रशासकीय इमारतींमधील एसी यंत्रणा, वॉटर पंप तसेच अन्य विद्युत उपकरणांच्या ऊर्जा वापराचे व्यवस्थापन अधिक परिणामकारक करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी बोलत होते.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी, उप आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता संतोष दुर्गे तसेच एशियन डेव्हलपमेंट बँक (ए.डी.बी), अलांयन्स् फॉर एनर्जी इफिशिएंट इकॉनॉमी (ए.इ.इ.इ) आणि कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायरोमेंट अँड वॉटर (सी.इ.इ.डब्ल्यू) या संस्थांचे प्रतिनिधी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अलांयन्स् फॉर एनर्जी इफिशिएंट इकॉनॉमी (ए.इ.इ.इ) सोबत यापूर्वीच सामंजस्य करार केला असून त्या अंतर्गत अलांयन्स् फॉर एनर्जी इफिशिएंट इकॉनॉमी (ए.इ.इ.इ), एशियन डेव्हलपमेंट बँक (ए.डी.बी) आणि कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायरोमेंट अँड वॉटर (सी.इ.इ.डब्ल्यू) यांच्या संयुक्त विद्यमाने ऊर्जा कार्यक्षमतेसंदर्भातील अभ्यास आणि नियोजन प्रक्रिया सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत महापालिकेच्या ऊर्जा वापराचे विश्लेषण, ऊर्जा बचतीच्या संधींचा शोध, आर्थिक व्यवहार्यता तसेच आवश्यक निधी संरचना याबाबत विविध टप्प्यांमध्ये काम करण्यात येत आहे. बैठकीमध्ये इन्सेप्शन रिपोर्ट, महापालिकेच्या वित्तीय स्थिती व ऊर्जा खर्च विश्लेषण अहवाल, प्राथमिक आर्थिक मॉडेल व व्यवसाय आराखडा, निधी संरचना अहवाल, प्री-फिजिबिलिटी स्टडी तसेच अंतिम आर्थिक मॉडेल आणि अंतिम प्री-फिजिबिलिटी स्टडी अहवाल या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर संगणकीय सादरीकरण करण्यात आले आणि त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत ऊर्जा बचत उपाययोजनांसाठी आवश्यक असलेल्या गुंतवणुकीचे विविध पर्याय, निधी उभारणीची संरचना तसेच अंमलबजावणीची कार्यपद्धती याबाबत चर्चा करण्यात आली. ऊर्जा कार्यक्षम प्रकल्पांची अंमलबजावणी करताना दीर्घकालीन शाश्वतता, आर्थिक व्यवहार्यता आणि प्रत्यक्ष ऊर्जा बचतीचे मोजमाप यावर विशेष भर देण्याच्या सूचना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिल्या. तसेच केवळ अहवाल आणि अभ्यासापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर देऊन ऊर्जा बचतीची ठोस परिणामकारकता दिसून यावी, यासाठी वेळबद्ध नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

 

ऊर्जा बचत ही केवळ आर्थिक गरज नसून पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. महापालिकेच्या इमारतींमध्ये आधुनिक ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानाचा वापर करून वीज खर्चात बचत करणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि शाश्वत विकासाला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. विविध संस्थांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पातून महापालिकेची ऊर्जा व्यवस्थापन प्रणाली अधिक सक्षम, आधुनिक आणि परिणामकारक होईल, असा विश्वास आहे.

– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleशनिवारी चिंचवड मध्ये अंतर्नाद’ या संगीत नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग
Next Article स्थायी समिती सभेत पायाभूत सुविधा व विकासकामांसह विविध विषयांना मान्यता
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 27, 20260
Spread the love

मराठी पत्रकार संघ नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार समारंभात आमदार जगताप यांचे आश्वासन हिंदवी न्यूज | पिंपरी …

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?