Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

मराठी साहित्य विश्वात रममाण झाले इंद्रायणी साहित्य परिषदेचे सदस्य

May 17, 2026

ह क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत नवी सांगवी येथे ३ अनधिकृत आरसीसी. बांधकामांवर कारवाई

May 16, 2026

ज्येष्ठ तबलावादक धोंडीराम सायकर यांचा महापालिकेकडून मानपत्र देऊन सन्मान

May 16, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत महापौर रवि लांडगे यांचा सायकलने प्रवास
पिंपरी चिंचवड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत महापौर रवि लांडगे यांचा सायकलने प्रवास

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comMay 16, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

इंधन बचत व पर्यावरणपूरक जीवन शैलीचा दिला नागरिकांना संदेश

पिंपरी, (हिंदवी न्यूज)- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीबाबत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांनी आज आपल्या निवासस्थानापासून महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीपर्यंत सायकलने प्रवास केला. यावेळी महापौर रवि लांडगे यांनी नागरिकांनाही शक्य तिथे सायकलचा वापर, सार्वजनिक वाहतूक आणि इंधन बचतीच्या सवयी अंगीकारण्याचे आवाहन केले.

आज सकाळी महापौर रवि लांडगे हे आपल्या निवासस्थानातून सायकलवरून महापालिकेकडे रवाना झाले. शहरातील प्रमुख मार्गांवरून सायकलने प्रवास करत त्यांनी नागरिकांना इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला. यावेळी महापालिकेचे सह शहर अभियंता बापू गायकवाड, उप अभियंता अमित दीक्षित, महापौरांचे स्वीय सहाय्यक अभय चौगुले, संदीप पालांडे हे देखील त्यांच्यासमवेत होते.

महापौर रवि लांडगे म्हणाले,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या इंधन बचत आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीच्या संदेशातून प्रेरणा घेत आजचा हा सायकल प्रवास करण्यात आला आहे. येथून पुढे आठवड्यातून एक दिवस सायकलने प्रवास करण्याचे नियोजन आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनीही दैनंदिन जीवनात सायकलचा वापर, सार्वजनिक वाहतूक आणि इंधन बचतीच्या सवयी अंगीकारून पर्यावरण रक्षणासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

सायकलचा वापर हा केवळ इंधन बचतीसाठी नाही, तर निरोगी जीवनशैली, स्वच्छ हवा आणि पर्यावरण संवर्धनासाठीही महत्त्वाचा आहे. इंधन बचत हीच खरी राष्ट्रसेवा असून, पर्यावरणाचे संरक्षण आणि पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित भविष्य घडवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात छोटे-छोटे सकारात्मक बदल करणे आवश्यक आहे. पर्यावरणपूरक पिंपरी चिंचवड घडविण्यासाठी प्रत्येकाने छोट्या-छोट्या सवयींमधून योगदान देण्याची गरज आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका हरित उपक्रम, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी विविध मोहिमा राबवत असून, नागरिकांनीही या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन देखील यावेळी महापौर रवि लांडगे यांनी केले.

Loading

Post Views: 2
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग समित्यांची पुनर्रचना; १० क्षेत्रीय कार्यालयांची स्थापना
Next Article बचत गटातील महिलांकडून घरोघरी ५ लाखांहून अधिक मालमत्ता कर बिलांचे वितरण
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

मराठी साहित्य विश्वात रममाण झाले इंद्रायणी साहित्य परिषदेचे सदस्य

May 17, 2026

ह क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत नवी सांगवी येथे ३ अनधिकृत आरसीसी. बांधकामांवर कारवाई

May 16, 2026

ज्येष्ठ तबलावादक धोंडीराम सायकर यांचा महापालिकेकडून मानपत्र देऊन सन्मान

May 16, 2026

वायसीएम’मधील आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावणार; स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्याकडून रुग्णालयाची पाहणी

May 16, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

मराठी साहित्य विश्वात रममाण झाले इंद्रायणी साहित्य परिषदेचे सदस्य

By Hindavinewsnetwork@gmail.comMay 17, 20260
Spread the love

विश्वकोश निर्मिती मंडळ व पुस्तकांचे गाव भिलार येथे अभ्यास सहल पिंपरी, (हिंदवी न्यूज)-  इंद्रायणी…

Loading

ह क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत नवी सांगवी येथे ३ अनधिकृत आरसीसी. बांधकामांवर कारवाई

May 16, 2026

ज्येष्ठ तबलावादक धोंडीराम सायकर यांचा महापालिकेकडून मानपत्र देऊन सन्मान

May 16, 2026

वायसीएम’मधील आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावणार; स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्याकडून रुग्णालयाची पाहणी

May 16, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Loading

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Loading

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

Loading

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर

Loading

Loading

Loading

Loading

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?