Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»आरोग्य»फुगेवाडी विषारी दारू प्रकरण; वायसीएम रुग्णालयात दाखल रुग्णांच्या प्रकृतीची आयुक्तांकडून विचारपूस
आरोग्य

फुगेवाडी विषारी दारू प्रकरण; वायसीएम रुग्णालयात दाखल रुग्णांच्या प्रकृतीची आयुक्तांकडून विचारपूस

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comMay 30, 2026Updated:May 31, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

रुग्णांच्या नातेवाईकांशीही साधला संवाद; महापालिका रुग्णालयात दाखल रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार

पिंपरी, (हिंदवी न्यूज)- फुगेवाडी येथील विषारी दारू सेवन केलेल्या रुग्णांना महापालिकेच्या पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी वायसीएम रुग्णालयाला भेट दिली. दाखल रुग्णांवर आवश्यक सर्व वैद्यकीय उपचार मोफत उपलब्ध करून दिले जात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांना दिलासा देखील आयुक्तांनी दिला.

यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. उज्ज्वला अंदूरकर, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरख कुंभार, तसेच वायसीएम रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रुग्णालयातील उपचार व्यवस्थेचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. रुग्णांवर केल्या जाणाऱ्या उपचारामध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. परिस्थिती लक्षात घेता रुग्णालय प्रशासनाने सतर्क राहून या प्रकरणातील रुग्णांना दाखल करून घेऊन त्यांच्यावर तात्काळ आवश्यक सर्व उपचार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. दाखल रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधताना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या रुग्णांच्या प्रकृती विषयी माहिती दिली. महापालिकेच्या वतीने उत्तम वैद्यकीय उपचार रुग्णांवर केले जात आहेत. महापालिकेच्या वैद्यकीय पथकामार्फत सातत्याने या रुग्णांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात असून या रुग्णांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधार येण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा सातत्याने कार्यान्वित ठेवण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी नातेवाईकांना दिली. काळजी करू नका, महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असा धीर देखील रुग्णांच्या नातवाईकांना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला.

 

💬“विषारी दारू प्रकरणातील दाखल सर्व रुग्णांवर तातडीने वैद्यकीय उपचार करण्यासाठी वायसीएम रुग्णालय प्रशासनाला आवश्यक त्या सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याच्या तसेच परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.”

– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका 

 

💬“वायसीएम रुग्णालयात आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, तज्ञ डॉक्टर आणि पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे. या प्रकरणातील दाखल रुग्णांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. सध्या तीन रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असून त्यांच्या प्रकृतीवर रुग्णालय प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे. बाधित रुग्णांनी वेळेत वैद्यकीय उपचार करून घेणे अत्यंत आवश्यक असून या बाधितांनी तात्काळ रुग्णालयात दाखल होऊन उपचार घ्यावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.”

– डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिं. चिं. महापालिका.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleस्वागतम ई-प्रवेश प्रणालीला नागरिकांचा मिळतोय प्रतिसाद
Next Article महानगरपालिकेतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमत्त  ३१ मे रोजी विशेष कार्यक्रम
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

October 11, 2026

पीएमआरडीए’च्या ‘इनर रिंग रोड’ भूसंपादनाला गती; मावळ, मुळशी अन् हवेलीत ग्रामबैठकांचा धडाका!

October 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
मुळशी

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

By Hindavinewsnetwork@gmail.comOctober 11, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज | नवी सांगवी साई चौक येथील लोकनेते लक्ष्मण भाऊ भाजी मार्केट मध्ये आमदार…

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

October 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?