पिंपरी,(हिंदवी न्यूज )– अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उप वर्गीकरण, मातंग समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी बुधवारी(दि.१७) अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या वतीने पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. अण्णाभाऊ साठेंचे वंशज सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा निघणार आहे.
सकाळी संगमवाडी येथील आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारकापाशी समाधीला नतमस्तक होऊन या पदयात्रेची सुरुवात होणार आहे. त्यानंतर पुण्यातून मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानाकडे पायी आगेकूच करणार आहे. या पदयात्रेला शिवशाही व्यापारी संघ आणि हिंदू मातंग सेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी दिली आहे.
प्रसिद्धी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडताना दाखले म्हणाले की, अनुसूचित जातीच्या (SC) आरक्षणात ‘अ, ब, क, ड’ असे उप वर्गीकरण लोकसंख्येच्या प्रमाणात तात्काळ लागू करण्यात यावे. साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे. वाटेगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक तात्काळ उभारण्यात यावे, तसेच घाटकोपर येथील स्मारकाचा पूर्ण विकास करण्यात यावा. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या बजेटमध्ये भरीव वाढ करण्यात यावी. समाजासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या स्मशानभूमी व गायरान जमिनीचा प्रश्न शासनाने तात्काळ मार्गी लावावा यासाठी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे
ज्या अण्णाभाऊ साठेंनी आपली ‘फकिरा’ ही जगप्रसिद्ध कादंबरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अर्पित केली, त्यांच्याच महाराष्ट्रात आज मातंग समाज, बौद्ध-महार बांधव, चर्मकार बांधव व इतर ५८ ते ५९ जाती राज्य पातळीवर कुठेतरी नाराज आहेत. रशियासारख्या देशात अण्णाभाऊंचे पुतळे आणि स्मारकं उभारली जातात, मात्र दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्रात त्यांचे स्मारक अजूनही वंचित आहे. आंदोलनाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांना विनंती करण्यात आली आहे की, आगामी पावसाळी अधिवेशनामध्येच हे उपवर्गीकरण तात्काळ लागू करावे. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनीही बहुजन समाजाच्या आर्थिक व शैक्षणिक प्रगतीसाठी यात लक्ष घालावे, अशी कळकळीची विनंती करण्यात आली असल्याची भावना दाखले यांनी व्यक्त केली.
पिंपरी-चिंचवड शहरातील अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकासाठी आणि स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी योगदान देणारे शेणमजराव रिटे यांनीही या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. या पदयात्रेचे स्वागत रविंद्र खिलारे, राम पात्रे, झुंवरलाई भगवान शिंदे, प्रल्हाद सुधारे, नगरसेविका अनुराधा गोरखे, कमल घोलप, . आशा शहाणे, केशरलाई लांडगे, अण्णासाहेब कसबे, दत्तू चव्हाण, . सुनिल भिसे, शिवाजी खडसे, .कृष्णा साबळे, अर्चना शिंदे, अनिता वैरागळ. नितीन घोलप, विकास जगधने, सतीष भवार, नरेश जोगदंड, वसंत खलसे. .सुमन नेटके, उद्योजक नानासाहेब वाघचौरे, उद्योजक जयाभाऊ नेटके, उद्योजक अनिल गायकवाड,. नेताजी शिंदे, अनिल सॉदडे, राजू भावळे,. अविनाश शिंदे, सुरज अण्णा कांबळे,. चंद्रकांत लोंढे, सचिन दुनघव, समीरा राजगुरु, रामेश्वर बावणे हे करणार आहेत.
![]()
