मुंबई, (हिंदवी न्यूज)- मुंबईतील नागरिकांसाठी रविवार, दि. २१ जून रोजी सकाळी ६.३० वा. मरीन ड्राईव्ह चौपाटी येथे “योगा बाय द बे” अंतर्गत भव्य योगा प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय विविध क्षेत्रातील लोकप्रतिनिधी या उपक्रमात सहभागी होणार आहेत. सकाळी ६.३० वाजता कीलाचंद चौक, सुंदरमहल जंक्शन, मरीन ड्राईव्ह येथे होणाऱ्या या कार्यक्रमासाठी कोणत्याही पूर्व नोंदणीची आवश्यकता नाही. प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य आहे.
मुंबई माझी लाडकी, टाइम्स ऑफ इंडिया, कोस्ट गार्ड, द योगा इन्स्टिट्यूट, हार्टफुलनेस, तेरापंथ युवक परिषद दक्षिण मुंबई आणि डीआर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम तज्ज्ञांच्या मार्गदर्शना खाली पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या निमंत्रक शायना एन सी यांनी मुंबईकरांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
![]()
