Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

संतसाहित्यातून योग्य आहार विहाराचे मार्गदर्शन! – ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर

July 12, 2026

पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ

July 12, 2026

तुकोबारायांच्या पालखी सोहोळ्यात साहित्यिकांची दिंडी

July 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»मेट्रो विस्तार, जलनिस्सारण सुधारणा, अग्निसुरक्षा, आरोग्य सुविधा व विविध विकासकामांना स्थायी समितीची मंजुरी
पिंपरी चिंचवड

मेट्रो विस्तार, जलनिस्सारण सुधारणा, अग्निसुरक्षा, आरोग्य सुविधा व विविध विकासकामांना स्थायी समितीची मंजुरी

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJune 25, 2026Updated:June 25, 2026No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

धोरणात्मक निर्णयातून शहराच्या विकासाला प्राधान्य : सभापती अभिषेक बारणे

पिंपरी, (हिंदवी न्यूज)- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत शहराच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांना मंजुरी देण्यात आली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, जलनिस्सारण, अग्निसुरक्षा, आरोग्य सेवा, नागरी सुविधा, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम तसेच पायाभूत सुविधांच्या उन्नतीकरणासंदर्भातील प्रस्तावांना स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी मंजुरी दिली.

यावेळी स्थायी समिती सदस्यांसह अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, नगरसचिव मुकेश कोळप तसेच महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सभेमध्ये महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो) मार्फत राबविण्यात येत असलेल्या पुणे मेट्रो फेज-१ विस्तार प्रकल्पांतर्गत निगडी येथील अतिरिक्त चौथ्या मेट्रो स्थानकासाठी आवश्यक आर्थिक तरतुदीस मंजुरी देण्यात आली. पिंपरी ते निगडी विस्तारित मार्गिकेवरील या प्रकल्पासाठी महापालिकेच्या हिस्स्याचा निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे निगडी परिसरातील नागरिकांना मेट्रो सेवेचा अधिक व्यापक लाभ मिळण्यास मदत होणार आहे.

शहरातील जलनिस्सारण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी विविध कामांना मान्यता देण्यात आली. इ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत दिघी, बोपखेल व परिसरातील मलनिस्सारण नलिकांमध्ये सुधारणा करण्याचे काम तसेच दापोडी पंपिंग स्टेशन ते दापोडी एस.टी. स्टँड दरम्यानच्या रायझिंग मेन जलनिस्सारण वाहिनीचे उन्नतीकरण करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच मामुर्डी येथील साईनगर उंच जलकुंभाच्या जलक्षेत्रात नव्याने विकसित होत असलेल्या भागात नवीन जलवाहिनी टाकण्याच्या कामालाही मान्यता देण्यात आली. शहरातील वाढत्या नागरी विस्ताराच्या पार्श्वभूमीवर अग्निसुरक्षा यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी पुनावळे येथील अग्निशमन केंद्राच्या बांधकामासाठी आवश्यक सुधारित खर्चास मंजुरी देण्यात आली. याशिवाय जलशुद्धीकरण केंद्रे, पंपिंग स्टेशन, प्रशासकीय इमारती आणि इतर महत्त्वाच्या प्रकल्पांमधील अग्निशामक यंत्रणांच्या देखभाल, दुरुस्ती व कार्यक्षमतेसाठी आवश्यक कामांना मान्यता देण्यात आली.

नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सोनोग्राफी यंत्रणेच्या दुरुस्ती व देखभालीस मंजुरी देण्यात आली. तसेच यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील १४ पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडील वार्षिक मान्यताप्रक्रियेसाठी आवश्यक शुल्क अदा करण्यास मान्यता देण्यात आली. महापालिकेच्या विविध प्रभागांमधील विद्युत विषयक कामे सुरळीत सुरू राहण्यासाठी आवश्यक कुशल व अकुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यास तसेच कै. अण्णासाहेब मगर सदनिका संकुल व केशवनगर-चिंचवड परिसरातील विद्युत वाहिन्यांच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांना मंजुरी देण्यात आली. शहरातील शैक्षणिक व नागरी सुविधांच्या उन्नतीकरणासाठी प्रभाग क्रमांक १ मधील महापालिका शाळा क्रमांक ९० व २१ यांच्या दुरुस्तीच्या कामांना मान्यता देण्यात आली. तसेच प्रभाग क्रमांक ११ मधील कोयनानगर, मोरया हाऊसिंग सोसायटी परिसर आणि सीडीसी परिसरातील रस्त्यांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली.

मुख्य प्रशासकीय इमारतीतील स्ट्रक्चरल ऑडिटनुसार आवश्यक दुरुस्तीची कामे तसेच महापालिका सभागृहाचे नूतनीकरण करण्यासाठी प्राप्त निविदांना मान्यता देण्यात आली. याशिवाय अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार विकसित करण्यात आलेल्या रस्ते व सार्वजनिक सुविधांच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-आळंदी रस्त्यावरील पावसाळी वाहिन्या व गटारांची साफसफाई आणि दुरुस्तीची कामे हाती घेण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे पावसाळ्यातील पाणी साचण्याच्या समस्येवर नियंत्रण मिळविण्यास मदत होणार आहे.

शहरातील क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेच्या क्रीडा विभागामार्फत आयोजित विविध स्पर्धा व प्रशिक्षण उपक्रमांसाठी आवश्यक क्रीडा साहित्य खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘अभिव्यक्ती कलामहोत्सव’ आयोजित करण्यास आवश्यक खर्चास मान्यता देण्यात आली. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने डेंग्यू प्रतिबंधासाठी ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत औष्णिक धुरीकरणासाठी आवश्यक वाहनसेवा सुरू ठेवण्यास कार्योत्तर मान्यता देण्यात आली. तसेच भोसरी येथील शांतीनगर परिसरातील सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता, देखभाल व व्यवस्थापन अखंडित सुरू राहावे यासाठी रोहिणी महिला बचत गटास मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आली.

आपत्कालीन परिस्थितींमध्ये अधिक प्रभावी प्रतिसाद देता यावा यासाठी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन विभागासाठी गॅस डिटेक्टर उपकरणे खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली. यामुळे धोकादायक वायू गळतीसारख्या घटनांमध्ये तातडीने उपाययोजना करणे शक्य होणार आहे. सभेत मंजूर करण्यात आलेल्या विविध विकासकामांमुळे शहरातील नागरी सुविधा अधिक सक्षम होण्यास, पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यास तसेच नागरिकांना अधिक सुरक्षित, स्वच्छ व गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

 

 

🗣💬”पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी स्थायी समितीने आज विविध महत्त्वपूर्ण विषयांना मंजुरी दिली आहे. मेट्रो विस्तार, जलनिस्सारण व्यवस्था सक्षमीकरण, अग्निसुरक्षा, आरोग्य सुविधा, रस्ते विकास, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम यांसारख्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देणे आणि विकासकामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करणे यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. मंजूर करण्यात आलेले सर्व प्रकल्प आणि कामे नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणतील, असा विश्वास आहे.”*

–अभिषेक बारणे, सभापती, स्थायी समिती, पिंपरी चिंचवड महापालिका

Loading

Post Views: 6
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमालमत्ता करावरील ५ ते ५० टक्क्यांपर्यंतच्या सवलतींचा लाभ घेण्याची अखेरची संधी! विविध कर सवलतींचा लाभ ३० जूनपर्यंतच घेता येणार
Next Article सुरक्षा रखवालदार यांना सुरक्षा निरीक्षक पदावर पदोन्नती देण्याबाबत विधी समितीचा ठराव
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

संतसाहित्यातून योग्य आहार विहाराचे मार्गदर्शन! – ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर

July 12, 2026

पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ

July 12, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांनी रुग्णालयात घेतली भेट; महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध

July 11, 2026

भाजपा शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालय प्रभारी पदी मधुकर बच्चे यांची नियुक्ती

July 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

संतसाहित्यातून योग्य आहार विहाराचे मार्गदर्शन! – ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर

By Hindavinewsnetwork@gmail.comJuly 12, 20260
Spread the love

विश्व हिंदू परिषद आयोजित आषाढी आरोग्य वारी वैद्यकीय सेवाकार्याचा शुभारंभ हिंदवी न्यूज | पिंपरी ‘ज्ञानेश्वर…

Loading

पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ

July 12, 2026

तुकोबारायांच्या पालखी सोहोळ्यात साहित्यिकांची दिंडी

July 12, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांनी रुग्णालयात घेतली भेट; महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध

July 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Loading

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Loading

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

Loading

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर

Loading

Loading

Loading

Loading

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?