Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

संतसाहित्यातून योग्य आहार विहाराचे मार्गदर्शन! – ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर

July 12, 2026

पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ

July 12, 2026

तुकोबारायांच्या पालखी सोहोळ्यात साहित्यिकांची दिंडी

July 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»
पिंपरी चिंचवड

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJune 29, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

“समाज जीवनाच्या घुसळणीतून नवनीत म्हणून पुढे येते तेच असते साहित्य ” : योगेश सोमण.

पिंपरी, ( हिंदवीन्यूज)-  समरसता साहित्य परिषद , पिंपरी चिंचवड शाखा, संस्कार भारती पिंपरी चिंचवड यांच्या वतीने”साहित्यिक संवाद” हा साहित्यिक उपक्रम स्व. दत्तोपंत म्हसकर सभागृह ,निगडी – प्राधिकरण येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण हे होते.

समरसता साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेच्या अध्यक्ष मानसी चिटणीस यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तसेच समरसता गीत अन् सुभाष चव्हाण यांनी केलेल्या मधुर शंखनादाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आर्चिस केळकर, सुनिता कुलकर्णी, उज्वला केळकर यांनी अहिल्याबाई होळकर, स्वामी विवेकानंद, डॉ. हेडगेवार यांच्या चरित्रातील उताऱ्यांचे अभिवाचन केले.

याप्रसंगी डॉ. गिरीश आफळे, रविकांत कळमकर, प्रा. तुकाराम पाटील, शोभा जोशी, राजन लाखे, राज अहेरराव, राजेंद्र घावटे, सुरेश कंक, संदीप तापकीर, रमेश वाकनीस, विजय शेंडगे, पंजाबराव मोंढे, ह. भ. प.अशोकमहाराज गोरे, नंदकुमार मुरडे, सविता इंगळे, प्रदिप तळेकर, राजेंद्र देशपांडे, नीलिमा फाटक, राधाबाई वाघमारे, माधुरी विधाटे, कैलास भैरट, आनंदराव मुळुक, सुलभा सत्तुरवार,अश्विनी रानडे, वैशाली मोहिते, शरद काणेकर, रजनी अहेरराव, राजेश चौधरी, मीनाताई पोकरणा,इत्यादी मान्यवर, जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य व परिसरातील साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साहित्यिक संवाद साधताना योगेश सोमण यांनी – “खऱ्या अर्थाने समाज माणसाला साहित्य शिकवतो. दुसऱ्या माणसांवर टीका करण्यापेक्षा आपण आपले उत्तम काम सुरू ठेवावे. साहित्यिक समाज घडवीत नसतो तर समाजच साहित्य घडविते. लेखक हा स्वतःचा पहिला वाचक असतो. लेखकाने सहजतेने लिहित रहावे त्यातून उपदेश न देता परिणाम साधता आला पाहिजे. साहित्य लिहीत असताना कल्पनाविलास नसावा तर जीवनानुभव असावा. मनात साठलेले चांगले अनुभव कृतीत आणणे ही असते समरसता. साहित्यिक नव्याने काही शिकत असतात. साहित्यिकांनी एकाच चौकटीत लेखन करू नये. शाश्वत फक्त सकारात्मकता असते; त्या दृष्टीने साहित्यिकांची वाटचाल असली पाहिजे. तरुणाई पुस्तक वाचत नाही हा समज आहे तेही वाचतात. तरुणाई काय वाचते याचा साहित्यिकांनी विचार केला पाहिजे. साहित्य विकसित होण्यासाठी माणसांनी एकत्र आले पाहिजे.” असे मत सोमण यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी-चिंचवड शहर कार्यवाह नरेंद्र पेंडसे यांनी पर्यावरण संवर्धन, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, स्वबोध, नागरी कर्तव्य या पंच परिवर्तनावर विचार व्यक्त केले. आपण आपला देश नव्या पिढीला आवडेल , अभिमान वाटेल असा घडवू या! “हा बहुमोल संदेश दिला. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सदस्य वाढवणार कां? दूरदर्शनवर अनेक वाईट गोष्टींचा भडीमार होत आहे तो थांबवता येईल कां? विद्रोह टोकदार झाला आहे. नकारात्मकते कडे चालला आहे, लोहगड घटना. व्यक्त होऊन थांबायचं कां? मसाप शाखा वाढीचा विचार आहे का? असे प्रश्न नारायण देशपांडे, नितीन हिरवे, नीलिमा फाटक या साहित्यिकांनी विचारले. यावर योगेश सोमण यांनी समर्पक उत्तरे दिली.

प्रास्ताविक समरसता साहित्य परिषदेच्या अध्यक्ष मानसी चिटणीस यांनी केले. सूत्रसंचालन स्नेहा पाठक यांनी केले . आभार सुहास घुमरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिन राऊत, नारायण देशपांडे, हेमंत जोशी, जयश्री श्रीखंडे , निलेश शेंबेकर, सुप्रिया लिमये, सुरेश जोशी, श्रद्धा चटप, निलेश देशमुख यांनी परिश्रम घेतले. प्रज्ञा फुलपगार यांनी गायलेल्या वंदे मातरम ने कार्यक्रमाची सांगता झाली.

Loading

Post Views: 12
योगेश सोमण
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article‘कलाकार कट्टा – पुष्प ८’ मध्ये कलांचा बहारदार अविष्कार ; रसिकांकडून उत्स्फूर्त दाद
Next Article नगरसेविका पल्लवी जगताप यांच्या सेवा व संवाद कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

संतसाहित्यातून योग्य आहार विहाराचे मार्गदर्शन! – ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर

July 12, 2026

पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ

July 12, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांनी रुग्णालयात घेतली भेट; महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध

July 11, 2026

भाजपा शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालय प्रभारी पदी मधुकर बच्चे यांची नियुक्ती

July 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

संतसाहित्यातून योग्य आहार विहाराचे मार्गदर्शन! – ह. भ. प. संतोषमहाराज काळोखे – देहूकर

By Hindavinewsnetwork@gmail.comJuly 12, 20260
Spread the love

विश्व हिंदू परिषद आयोजित आषाढी आरोग्य वारी वैद्यकीय सेवाकार्याचा शुभारंभ हिंदवी न्यूज | पिंपरी ‘ज्ञानेश्वर…

Loading

पिंपरी – चिंचवड बार असोसिएशनच्या वतीने ॲड. साधना बोरकर यांचा निरोप समारंभ

July 12, 2026

तुकोबारायांच्या पालखी सोहोळ्यात साहित्यिकांची दिंडी

July 12, 2026

मोशी दुर्घटनेतील जखमींची महापौर रवि लांडगे यांनी रुग्णालयात घेतली भेट; महापालिका सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध

July 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Loading

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Loading

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

Loading

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर

Loading

Loading

Loading

Loading

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?