Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»मोशी कचरा डेपो दुर्घटना : बचावकार्यादरम्यान ९ नागरिकांना काढले सुखरुप बाहेर; एकाचा मृत्यू
पिंपरी चिंचवड

मोशी कचरा डेपो दुर्घटना : बचावकार्यादरम्यान ९ नागरिकांना काढले सुखरुप बाहेर; एकाचा मृत्यू

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJuly 9, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

हिंदवी न्यूज | पिंपरी 

काल ८ जुलै रोजी मोशी कचरा डेपो येथील प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा ढीग कोसळून झालेल्या दुर्घटनेत बचावकार्यादरम्यान रात्री उशिरापर्यंत ९ नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे..या बचावकार्यातील शोधमोहीमेमध्ये आज ९ जुलै रोजी सकाळी ९ च्या सुमारास एका नागरिकाला बाहेर काढण्यात आले असून या गंभीर अवस्थेतील नागरिकाला पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल केले आहे.

सकाळी रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव भावेश वाणी असे आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता तपासणीअंती ते मृत असल्याची माहिती वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी दिली आहे.

महानगरपालिकेच्या मोशी येथील कचरा डेपो येथे ८ जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास कचऱ्याचा ढीग इमारतीवर कोसळून दुर्घटना घडली. या इमारतीमध्ये अंदाजे २३ नागरिक अडकले होते. सुरुवातीस अशोक गुप्ता, मुनेंद्र कुमार, चंद्रशेखर सिंह, दिनेश सुतार, श्री बाला हे ५ नागरिक घटना घडल्यानंतर सुखरुप बाहेर पडले. मात्र इमारतीत १८ व्यक्ती अडकून पडले असल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी तातडीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एन डी आर एफ), भारतीय सेना दल, महापालिका अग्निशमन दल, पीएमआरडीए अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तरित्या बचावकार्य सुरू केले. रात्री ८ पर्यंत या पथकाने सोमनाथ शेळके, सचिन दवडगाव, दादासाहेब आरडे, सुजाता शिंदे, रामप्रताप चव्हाण, रणवीर सिंह या ६ नागरिकांना सुखरुप बाहेर काढले. या तातडीने उपचारासाठी नजिकच्या रुग्णालयात हलविण्यात आले. इमारतीत अडकून पडलेल्या उर्वरित नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचाव मोहीम राबविण्यात आली. रात्री दीड वाजेपर्यंत बचावकार्यादरम्यान ३ नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. यामध्ये विजय सपकाळ, भूषण पाटील, महेश राऊत यांचा समावेश असून त्यांना उपचारासाठी नजिकच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

अविरतपणे बचावकार्य सुरू असताना शोधमोहीम हाती घेण्यात आली. याकरिता राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून श्वान पथकाची देखील मदत घेण्यात आली. शोधमोहिमेदरम्यान इमारतीत अडकलेल्या इतर नागरिकांचा शोध घेण्यात आला त्यामध्ये सकाळी ९ च्या सुमारास भावेश वाणी यांना बाहेर काढण्यात आले. गंभीर अवस्थेत असलेल्या वाणी यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. त्यावेळी ते मृत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

दरम्यान, अद्यापही इमारतीत अडकलेल्या अंदाजे ८ नागरिकांचा शोध घेण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू असून युद्धपातळीवर शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे आणि वरिष्ठ अधिकारी हे घटनास्थळी उपस्थित राहून संपूर्ण बचावकार्यावर सातत्याने देखरेख ठेवत आहेत. यादरम्यान आज खासदार श्रीरंग बारणे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

कचरा डेपो दुर्घटना
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleजगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे उद्योगनगरीत भक्तिमय वातावरणात आगमन
Next Article आळंदीतून माऊलींचे पालखी सोहळ्याचे नामजयघोषात प्रस्थान हजारो वारक-यांची उपस्थिती ; श्रींचे चलपादुका पालखीची मंदिर प्रदक्षिणा
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 27, 20260
Spread the love

मराठी पत्रकार संघ नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार समारंभात आमदार जगताप यांचे आश्वासन हिंदवी न्यूज | पिंपरी …

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?