जिल्हा न्यायाधीशांसह मान्यवरांची उपस्थिती
हिंदवी न्यूज | पुणे
पुणे बार असोसिएशनच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरू संत तुकाराम महाराज या दोन्ही पालख्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष काळुराम बबन भुजबळ यांना दोन्ही रथांचा मान देण्यात आला. यावेळी पुणे बार असोसिएशनचे पदाधिकारी व वकील बंधू भगिनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित होते.
पुणे बार असोसिएशनतर्फे वारकर्यांसाठी कायदेशीर शिबिराचे मोफत आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हा न्यायाधीश अरविंद वानखेडे, न्यायाधीश लाडेकर, न्यायाधीश कंठाळे व इतर न्यायाधीश उपस्थित होते. पालखी सोहळ्यात जिल्हा न्यायाधीश, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष, पदाधिकारी व वकील बंधू भगिनीच्या हस्ते वारकऱ्यांना राजगिऱ्याच्या लाडूचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे सदस्य विकास ढगे पाटील तसेच पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष एन डी पाटील, पांडुरंग थोरवे, बिपिन पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान गेट क्रमांक १ मधून ॲड. पोकळे यांच्या दिंडीचे उस्फूर्त स्वागत करण्यात आले. तसेच सर्वांचा पाहुणचार करण्यात आला.
पुणे बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी यांनी कार्यक्रम उत्साहात पार पाडला. पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष व कार्यकारिणी च्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.
![]()

