Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

चिखली घरकुल परिसरातील पावसाळी पाण्याचा प्रश्न मार्गी लावा – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

November 26, 2026

संविधान सन्मान दौडनिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

November 26, 2026

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे राजकीय क्षेत्रातील अष्टपैलु व्यक्तिमत्त्व लाभलेले थोर मुत्सद्दी नेते- महापौर रवि लांडगे

November 26, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पुणे»पुणे मेट्रो लाईन ३ प्रवाशांच्या पसंतीस; दैनंदिन प्रवासी संख्या ५० हजारांच्या घरात
पुणे

पुणे मेट्रो लाईन ३ प्रवाशांच्या पसंतीस; दैनंदिन प्रवासी संख्या ५० हजारांच्या घरात

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comNovember 24, 2026Updated:November 24, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन जिल्हा न्यायालय व वाकड चौक स्थानकांवर अतिरिक्त तिकीट तपासणी गेट्स आणि कर्मचाऱ्यांची व्यवस्था

हिंदवी न्यूज | पुणे 

पुणे मेट्रोच्या लाईन ३ ला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, ११ नोव्हेंबरपासून या मार्गावर दररोज जवळपास ५० हजार प्रवासी प्रवास करत आहेत. जिल्हा न्यायालय, माण, आर. के. लक्ष्मण म्युझियम, श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक आणि वाकड चौक या स्थानकांवर प्रवाशांचा सर्वाधिक प्रतिसाद मिळत आहे.

प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडने (पीआयटीसीएमआरएल) जिल्हा न्यायालय आणि वाकड चौक या दोन्ही स्थानकांवर अतिरिक्त तिकीट गेट्स बसवले आहेत. तसेच प्रवाशांची गर्दी कमी व्हावी आणि त्यांना ये-जा करताना अडचण येऊ नये, यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांचीही नेमणूक केली आहे.

सध्या पुणे मेट्रो लाईन ३ वर २० गाड्या धावत असून, दररोज सुमारे ३०० फेऱ्या होत आहेत. गर्दीच्या वेळेत दर पाच मिनिटांनी, तर इतर वेळेत दर आठ मिनिटांनी मेट्रो धावत आहे. प्रवासी सेवा सुरू झाल्यापासून मेट्रोच्या गाड्या सुमारे ९९ टक्के वेळेवर धावत असल्याचे पीआयटीसीएमआरएल’तर्फे सांगण्यात आले आहे.

याबाबत पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सैनी म्हणाले, “प्रवासी सेवा सुरू झाल्यापासून नागरिकांकडून मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक प्रवाशांनी सेवेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. मेट्रोमुळे सुरक्षित, सोयीस्कर आणि जलद प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. हिंजवडी परिसरातील आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारीही मेट्रोला पसंती देत आहेत. त्यामुळे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) वापरणाऱ्यांची संख्याही वाढत आहे.”

ते पुढे म्हणाले, “बालेवाडी परिसरातील बालेवाडी हाय स्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन स्थानके लवकरच प्रवाशांसाठी सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवासी संख्येत आणखी वाढ होईल अशी अपेक्षा वर्तविली जात आहे. उर्वरित स्थानकांची कामे लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, कामाचा दर्जा आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाईल.”

पुणे मेट्रो लाईन ३ हा माण-हिंजवडी आयटी पार्क ते शिवाजीनगर यांना जोडणारा २३.३ किलोमीटर लांबीचा उन्नत मेट्रो मार्ग आहे. या मार्गावरील १७ स्थानके सध्या प्रवाशांसाठी सुरू आहेत. या मेट्रोमुळे हिंजवडी आयटी पार्कचा पुण्यातील निवासी, व्यावसायिक आणि शैक्षणिक भागांशी संपर्क अधिक सुलभ झाला असून, रस्ते वाहतुकीला पर्याय उपलब्ध झाला आहे.

पुणे मेट्रो लाइन 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleवाहनांच्या बॉडी निर्मिती क्षेत्रातील अजिल फायबर टेकच्या “लिगसी”स्लीपर कोचला एआरएआयचे प्रमाणपत्र
Next Article डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या निवडीने पिंपरी-चिंचवडचा साहित्यविश्वात गौरव- आमदार शंकर जगताप
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

पुणे मेट्रो मार्गिका-३ वरील बालेवाडी हायस्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन स्थानके प्रवासी सेवेत दाखल!

November 26, 2026

वाहनांच्या बॉडी निर्मिती क्षेत्रातील अजिल फायबर टेकच्या “लिगसी”स्लीपर कोचला एआरएआयचे प्रमाणपत्र

November 23, 2026

हिंजवडी, माण, मारुंजी परिसरातील विकासकामांना गती द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

November 19, 2026

चाकण- तळेगाव परिसरातील पायाभूत सुविधा, वाहतूक आणि अतिक्रमणांवर व्यापक उपाययोजना करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

November 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड महापालिका

चिखली घरकुल परिसरातील पावसाळी पाण्याचा प्रश्न मार्गी लावा – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

By Hindavinewsnetwork@gmail.comNovember 26, 20260
Spread the love

पर्यायी पाण्याच्या निचऱ्याचे नियोजन तातडीने पूर्ण करण्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश हिंदवी न्यूज…

संविधान सन्मान दौडनिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

November 26, 2026

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे राजकीय क्षेत्रातील अष्टपैलु व्यक्तिमत्त्व लाभलेले थोर मुत्सद्दी नेते- महापौर रवि लांडगे

November 26, 2026

पुणे मेट्रो मार्गिका-३ वरील बालेवाडी हायस्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन स्थानके प्रवासी सेवेत दाखल!

November 26, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?