Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्त ‘प्लास्टिक बॉटल कलेक्शन बँक’ उपक्रमाचा शुभारंभ
पिंपरी चिंचवड

अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्त ‘प्लास्टिक बॉटल कलेक्शन बँक’ उपक्रमाचा शुभारंभ

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJuly 24, 2026Updated:July 24, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

हिंदवी न्यूज | पिंपरी 

पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने पृथ्वी सोशल फाउंडेशनच्या वतीने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंती निमित्त “प्लास्टिक बॉटल कलेक्शन बँक” हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे,  याचे सर्व नागरिकांनी अनुकरण करून शहर स्वच्छतेमध्ये योगदान द्यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष ज्येष्ठ नेते योगेश बहल यांनी केले.

आपले शहर प्लास्टिकमुक्त, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक असावे यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे योगेश बहल यांनी सांगितले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्त ‘प्लास्टिक बॉटल कलेक्शन बँक’ उपक्रमाचे उद्घाटन बुधवारी पिंपरी येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पक्ष प्रवक्ते अजित गव्हाणे, मा. विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, ज्येष्ठ नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर, वैशाली काळभोर, जितेंद्र ननावरे, संगीता ताम्हाणे, वर्षा जगताप, सारिका मासुळकर, राजू बनसोडे, विराज लांडे, पंकज भालेकर, उज्वलाताई ढोरे, निकिता कदम, माजी नगरसेवक पंडित गवळी, सीमाताई सावळे, फजल शेख, आशा शेडगे, राजेंद्र जगताप, प्रकाश सोमवंशी, शेखर काटे, सारंग कामतेकर, दीपक साकोरे, च्रंद्राम हलगी, जव्हार इटकल, संपद पांचुदकर, शक्रुल्ला पठाण, रमजान सय्यद, मनीषा गटकळ,डॅनियल दळवी, कविता खराडे, प्रविण पिंजन, बाबा चौधरी तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आयोजक व पृथ्वी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष रशीद सय्यद यांनी सांगितले की, प्लास्टिक प्रदूषणामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत प्रत्येक नागरिकाने जागरूक राहिले पाहिजे. आपण वापरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या रस्त्यावर, नाल्यात किंवा सार्वजनिक ठिकाणी न टाकता “प्लास्टिक बॉटल कलेक्शन बँक” मध्ये जमा केल्या पाहिजेत. यामुळे प्लास्टिक कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन, पुनर्वापर करता येईल आणि पर्यावरण संवर्धनाला निश्चितच चालना मिळेल.

यावेळी पृथ्वी सोशल फाउंडेशनचे सचिव व कार्यक्रमाचे समन्वयक रविंद्र ओव्हाळ यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड शहराच्या आधुनिक विकासाचा पाया दिवंगत उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी रचला आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि धाडसी निर्णयामुळे महामार्गांचे रुंदीकरण झाले. स्मार्ट सिटी, मेट्रो सिटी हा नावलौकिक अजितदादा पवार यांच्या मुळे प्राप्त झाला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने देशात स्वच्छतेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले होते. स्वच्छता आणि पर्यावरण रक्षण यामध्ये आपले शहर कायम प्रथम राहवे यासाठी आणि अजितदादा पवार यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आगामी काळात शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, व्यावसायिक संकुले आणि सार्वजनिक ठिकाणी अधिकाधिक ‘प्लास्टिक बॉटल कलेक्शन बँक’ उभारून नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे असे रवींद्र ओव्हाळ यांनी सांगितले.

स्वागत रवींद्र ओव्हाळ, सूत्रसंचालन अविनाश शिंदे आणि आभार विनोद वरखडे यांनी मानले.

 

बॉटल
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleकाळेवाडी कचरा संकलन केंद्राची स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्याकडून पाहणी
Next Article स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त चिखली पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी व डॉक्टरांचा सन्मान
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026

महापालिका सभेत मनोज सेठिया यांचा सत्कार

August 23, 2026

हाऊसफुल्ल’ तुकाराम मुंढे… ‘भेसळमुक्त महाराष्ट्राचा निर्धार’

August 23, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 27, 20260
Spread the love

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि सिद्धिविनायक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गायक, संगीतकार यांना दरवर्षी प्रदान करण्यात येतो.

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026

महापालिका सभेत मनोज सेठिया यांचा सत्कार

August 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?