हिंदवी न्यूज | पिंपरी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्बन महिला सेल, पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) यांच्या वतीने स्वर्गीय नेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त चिखली पोलीस ठाण्यात महिला सुरक्षा, कायदा-सुव्यवस्था आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी व डॉक्टरांचा शाल, श्रीफळ, ट्रॉफी आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्बन महिला सेलच्यावतीने स्व.अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त चिखली पोलीस ठाण्यात अभिवादन करण्यात आले. चिखली पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजितजी जाधव सर, यांचा तसेच महिला सुरक्षेसाठी उल्लेखनीय कार्य करणऱ्या पोलीस अधिकारी दीपमाला लोहकरे यांचा शाल, श्रीफळ, ट्रॉफी आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. दादांच्या विचारांनी प्रेरणा घेऊन आरोग्य विषयक जनजागृती आणि समाजसेवेत योगदान देणाऱ्या हॉस्पिटलचे संस्थापक राहुल तीलवानी यांच्या सहकार्याने डॉ रामश्याम अगरवाल, डॉ प्रविण भोसले, डॉ शुभम पवार, डॉ स्नेहल रोमन गटकळ यांना यावेळी राष्ट्रवादी अर्बन सेलच्या वतीने शाल, श्रीफळ, ट्रॉफी आणि पुष्पगुच्छ देऊन यथोच सन्मानित करण्यात आले.
यावेळी अर्बन सेल महिला शहराध्यक्षा मनीषा गटकळ, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष शकरूला पठाणभाई सय्यद भाई तसेच पिंपरी विधानसभा अध्यक्षा विजया काटे, भोसरी विधानसभा अध्यक्षा मनीषा जढर, निरीक्षक मिरा कुदळे,निरीक्षक लता ओव्हाळ, समन्वयक शोभा आवटी यांच्या वतीने स्वर्गीय अजितदादा पवार यांना अभिवादन करण्यात आले.


