Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पिंपरी चिंचवड»डॉ. पी. डी. पाटील यांना शिक्षण महर्षी पुरस्कार प्रदान.
पिंपरी चिंचवड

डॉ. पी. डी. पाटील यांना शिक्षण महर्षी पुरस्कार प्रदान.

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comJuly 25, 2026Updated:July 25, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

हिंदवी न्यूज | पिंपरी 

आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने आचार्य अत्रे रंगमंदिर पिंपरी येथे ( दि.२५) आयोजित दिंडी व कामगार वारकरी मेळाव्यात डी. वाय. पाटील समूहाचे प्रमुख कुलपती डॉ पी. डी. पाटील यांचा “शिक्षणमहर्षी”  पुरस्काराने गौरव करण्यात आला.

या सोहळ्यास आमदार शंकरराव जगताप, माजी राज्यसभा खासदार अमर साबळे, विधान परिषद सदस्या उमा खापरे, भाजपचे शहर प्रभारी भरत नाना पाटील, प्राधिकरणचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्यासह अनेक मान्यवर, वारकरी व श्रमिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशवंत भोसले यांनी  डॉ.  पी. डी. पाटील यांच्या चार दशकांहून अधिक काळातील शैक्षणिक योगदानाचा गौरव करत, “हा पुरस्कार कोणत्याही शासनाचा नाही, तर समाजाचा आहे. त्यामुळे आजपासून पी. डी. पाटील हे खऱ्या अर्थाने ‘शिक्षणमहर्षी’ आहेत,” अशी घोषणा केली. डी. वाय. पाटील संस्थेमुळे हजारो सर्वसामान्य, कामगार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थी डॉक्टर, अभियंते, आयटी तज्ज्ञ होऊन देश-विदेशात यशस्वी झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.   भोसले यांनी सोशल मीडियातील पत्रकारांसाठी डी. वाय. पाटील संस्थेत प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याची तसेच पत्रकारांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंतीही यावेळी केली.

सत्काराला उत्तर देताना डॉ पी. डी. पाटील यांनी हा सन्मान आपल्यासाठी अत्यंत भावनिक असल्याचे सांगितले. “मी गेली ४५ वर्षे पिंपरी-चिंचवडमध्ये शिक्षण क्षेत्रात काम करत आहे. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या मार्गदर्शनातून या संस्थेचा विस्तार करण्याची संधी मिळाली. आज जागतिक स्तरावर मान्यता मिळालेल्या संस्थेचा भाग असल्याचा अभिमान वाटतो. हा सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी असून याचे श्रेय माझ्या सहकाऱ्यांना आणि समाजाला आहे. शिक्षण महर्षी पुरस्कार दिल्याबद्दल कामगार नेते यशवंत भोसले तसेच राष्ट्रीय श्रमिक आघाडीचा आभारी आहे, असे ते म्हणाले.

आमदार शंकर जगताप यांनी पी. डी. पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “पिंपरी-चिंचवडची ओळख जगभर पोहोचविण्यात डी. वाय. पाटील संस्थेचे मोलाचे योगदान आहे. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत त्यांनी अनेकांचे जीवन घडविले आहे. माझ्या कुटुंबातील सदस्यालाही त्यांच्या माध्यमातून शिक्षणाची संधी मिळाली आणि आज तो यशस्वी उद्योजग आहे.”राष्ट्रीय श्रमिक आघाडीने सुरू केलेल्या दिंडी उपक्रमाचे कौतुक करत, “श्रमिक आणि वारकरी यांचा सुंदर संगम घडवून आणण्याचे कार्य यशवंत भोसले करत आहेत. हा उपक्रम पुढील अनेक वर्षे सुरू राहावा,” अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

माजी राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे” या विचाराचा उल्लेख करत, “पी. डी. पाटील यांनी शिक्षणाची पंढरी उभी करून हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविले आहे. त्यांनी अनेक पिढ्या घडवल्या असून हीच खरी राष्ट्रसेवा आहे. यशवंतभाऊ भोसले यांनी”श्रमिकांच्या सेवेसाठी आयुष्य वाहिले आहे. निष्काम कर्मयोगाच्या भावनेतून ते सातत्याने समाजकार्य करत असून अशा व्यक्तींच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडत आहे.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामगारनेते यशवंत भोसले यांनी केले.  सूत्रसंचालन नंदू कदम यांनी केले.  दिनेश पाटील, दिपक पाटील, जयदेव अक्कलकोटे, अमोल घोरपडे, सोमनाथ वीरकर, भरत राणे, दत्तात्रय गायकवाड, राहुल शितोळे, शिरीष सासवडे, ओंकार देशपांडे आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

 

 

डॉ. पी. डी. पाटील यांना ‘शिक्षणमहर्षी’ पुरस्कार जाहीर
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहापौर रवि लांडगे यांनी घरकुल परिसरात केली पाहणी.
Next Article सार्वजनिक स्वच्छतागृह अधिक सुलभ करण्यासाठी महापालिकेचा पुढाकार
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

August 27, 2026

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

जोपर्यंत पत्रकार भवन तयार होत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही-आमदार शंकर जगताप

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 27, 20260
Spread the love

मराठी पत्रकार संघ नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार समारंभात आमदार जगताप यांचे आश्वासन हिंदवी न्यूज | पिंपरी …

मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देणार : भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?