हिंदवी न्यूज | पिंपरी
शिवसेना (शिंदे गट) युवासेनेच्या संघटनात्मक बांधणीला बळ देण्यासाठी कुणाल जगनाडे यांची पश्चिम महाराष्ट्र उपशहर प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. युवासेना सचिव (पश्चिम महाराष्ट्र) तथा नगरसेवक विश्वजित बारणे यांच्या उपस्थितीत खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते कुणाल जगनाडे यांना हे नियुक्तीपत्र देण्यात आले.
ही नियुक्ती एक वर्षाच्या कालावधीसाठी करण्यात आली असून, संसदरत्न खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण यांचा आपण प्रचार कराल, तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल व शिवसेना पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न कराल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
नियुक्तीनंतर कुणाल जगनाडे यांनी शिवसेना आणि युवासेनेची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच पक्षवाढीसाठी सक्रियपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. या नियुक्तीबद्दल शिवसैनिक आणि युवासेना पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


