हिंदवी न्यूज | पिंपरी
पुणे येथे पार पडलेल्या ४५ व्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत उत्कृष्ट खेळ सादर करत चिंचवड येथील कु. नारायणी किरण योगेश माळी हिने ८ ते १० या सब-ज्युनिअर गटात सुवर्णपदकासह राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. या कामगिरीच्या जोरावर जयपूर,राजस्थान येथे आयोजित केलेल्या ५१ व्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात तिची निवड करण्यात आली आहे.
या यशाबद्दल नारायणीचे सर्वत्र कौतुक होत असून तिचे पालक योगेश माळी व किरण माळी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. नारायणी हिने मेहनत आणि सातत्य पूर्ण सरावाच्या जोरावर यश संपादन केल्याची भावना आई किरण माळी यांनी व्यक्त केल्या .


