Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • en English
    • en English
    • hi हिन्दी
    • mr मराठी
What's Hot

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026
| महाराष्ट्र | पुणे | पिंपरी चिंचवड | राजकारण | गुन्हेगारी | क्रीडा | मनोरंजन
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»आळंदी»माऊलींच्या पालखी सोहळ्याचे हरिनाम गजरात आळंदीत जोरदार स्वागत
आळंदी

माऊलींच्या पालखी सोहळ्याचे हरिनाम गजरात आळंदीत जोरदार स्वागत

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comAugust 9, 2026No Comments6 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

हिंदवी न्यूज | आळंदी 

आषाढी पायी वारी सोहळ्या अंतर्गत श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या वैभवी पादुका पालखी सोहळ्याचे परंपरेने माऊली मंदिरात हरिनाम गजरात आगमन झाले.  हजारो वारकरी भाविकांच्या उपस्थितीत हरिनाम गजरात सोहळा आळंदीत परतला. यावर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत राज्यात पायी वारी सोहळा साजरा करण्यात आला. पंढरीत श्रीविठ्ठल देव भेट, गोपाळपुर काला उरकून श्रींच्या वैभवी पादुका पालखी सोहळ्याचे हजारो भाविक भाविकांच्या उपस्थितीत हरीनाम जयघोषात सोहळा शनिवारी ( दि. 8 ) अलंकापुरीत पोहचला. परंपरेने आज (रविवार दि. 9 ) आळंदीत कामिका एकादशी सोहळा हरिनाम गजरात साजरा होत आहे.

ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे परंपरेने आळंदी मंदिरात पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर, ऋषिकेश आरफळकर यांचे प्रमुख उपस्थितीत श्रींचे पादुका आळंदी देवस्थानकडे वारीहून आल्यानंतर परंपरेने सुपूर्द करण्यात आल्या. श्रींचे पादुका पालखी मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर विना मंडपातून माऊलींचे मंदिरात सोहळा आरतीने विसावला. तत्पूर्वी माऊली मंदिरातून श्रींचे स्वागत प्रथा परंपरेने दिंडी हरिनाम गजरात पालखी सोहळ्यास सामोरी जात महानैवेद्य झाला. अभंग गात हरिनाम गजरात सोहळ्याचे स्वागत व आगमन झाले.
आळंदीत प्रवेश प्रसंगी पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर, ऋषिकेश आरफळकर, आळंदी देवस्थानचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख राजेंद्र उमाप, प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त योगी निरंजन नाथ, चैतन्य महाराज लोंढे कबीरबुवा, पुरुषोत्तम महाराज पाटील, वेदमूर्तीअवधूत महाराज चक्रांकित, हंसराज चक्रांकित, व्यवस्थापक माऊली वीर, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, उपाध्यक्ष सुजाता तापकीर, माजी नगरसेवक डी.डी.भोसले पाटील, मानकरी माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, योगीराज कु-हाडे, योगेश आरु, ज्ञानेश्वर दिघे, विठ्ठल घुंडरे, श्रींचे सेवक चोपदार बाळासाहेब रणदिवे, राजाभाऊ रंधवे चोपदार, उद्धव रणदिवे चोपदार, ज्ञानेश्वर गुळुंजकर,संजय रणदिवे, तुकाराम माने, भीमराव घुंडरे,ज्ञानेश्वर घुंडरे, नगारखाना सेवक मानकरी बाळासाहेब भोसले, सचिन घुंडरे, विवेक घुंडरे, विनायक घुंडरे, सचिन कुऱ्हाडे, महादेव रत्नपारखी, अप्पाबुवा महाराज पाटील यांचे सह मानकरी, दिंडीकरी, वारकरी भाविक उपस्थित होते.

आळंदी मंदिरात ज्ञानेश्वर महाराज यांचे वैभवी पादुका आल्यानंतर श्रींचे संजीवन समाधी मंदिरात आरती झाली. आळंदीत पालखी सोहळ्याचे स्वागतास भाविकांनी रस्त्याचे कडेला दुतर्फा उभे राहून हरिनाम जयघोषात स्वागत केले.यावर्षी पालखी सोहळ्यावर कोणतेही निर्बंध नसल्याने आनंदी उत्साही मंगलमय वातावरणात सोहळा साजरा करण्यात आला.
आळंदीत श्रींचे जोरदार स्वागत करण्यात आले. स्वागतासाठी रांगोळ्यांच्या पायघड्या, पुष्पसजावट करण्यात आली. ठिकठिकाणी माऊली भक्त मंडळांनी श्रींचे पालखीवर पुष्प वर्षाव करीत स्वागत केले. भाविकांना विविध ठिकाणी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. आळंदीतील प्रथा परंपरांचे पालन करीत श्री नरसिव्ह सरस्वती स्वामी महाराज यांचे मूळपीठ येथे ह.भ.प. अवधूत महाराज चक्रांकित आणि परिवाराचे वतीने पिठलं भाकरीचा महाप्रसाद परंपरेने वाटप करण्यात आला. येथे भव्य स्वागत, पुष्पवृष्टी, महाप्रसाद वाटप, विद्युत रोषणाई लक्षवेधी करण्यात आली. भाविकांनी परंपरा जोपासत महाप्रसादाचा लाभघेतला. अनेक दिवसांचे विरहानंतर श्रींचे पालखी सोहळा आळंदीत येताच येथे नवचैतन्य अवतरले. आळंदी देवस्थान व ग्रामस्थांचे वतीने सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. व्यवस्थापक माऊली वीर, आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे विश्वस्त प्रकाश काळे, अध्यक्ष सुरेश वडगावकर, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे, आजी, माजी पदाधिकारी, विविध सेवाभावी संस्था, संघटना यांचे वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले.

यावेळी वारकरी शिक्षण संस्थेच्या शालेय मुलांनी रस्त्याचे दुतर्फा उभे राहून सोहळ्यात धाकट्या पादुका ते आळंदी असा प्रवास करीत सोहळ्याचे हरिनाम गजरात स्वागत केले. या पालखी सोहळ्यात सर्व प्रकारच्या सेवा सुव्यवस्थित आणि सुसज्ज व्यवस्था, भोजनव्यवस्था, पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात देत सोहळ्याचे चोख नियोजन झाल्याने कोणीही आजारी पडले नाही. उत्साही आनंदात पायी वारी करीत सोहळा आळंदीत आल्याचे उपव्यवस्थापक तुकाराम माने यांनी सांगितले.

थोरल्या पादुका मंदिरात पालखी सोहळ्याचे स्वागत आरती आषाढी पायी वारी सोहळ्या अंतर्गत श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या वैभवी पादुका पालखी सोहळ्याचे परंपरेने श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्ट च्या वतीने मंदिरात हरिनाम गजरात स्वागत करण्यात आले. हजारो वारकरी भाविकांचे उपस्थितीत सोहळाचे स्वागत ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष विष्णू तापकीर यांनी केले.

यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे पदाधिकारी उपस्थित होते. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान प्रमुख विश्वस्त डॉ भावार्थ देखणे, पालखी सोहळ्याचे मालक राजेंद्र आरफळकर, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार , राजाभाऊ चौधरी यांचा संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अँड विष्णू तापकीर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, उपरणे देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी ट्रस्टचे खजिनदार दत्तात्रय गायकवाड, ह भ प रमेश महाराज घोंगडे आदी मान्यवर उपस्थित होते. आळंदी व दिघी पोलीस स्टेशनचे वतीने प्रभावी बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परिसरातील भाविक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी करून दर्शन घेतले. मंदिर समितीचे वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत सुशोभित रांगोळीच्या पायघड्या टाकीत लक्ष वेधले. मंदिरात लक्षवेधी रंगावली व पुष्प सजावट करण्यात आली होती.

आळंदी पंढरपूर आनंद वारीत स्वच्छतेचीही वारी करण्यात आली. पंढरपूर वारीमध्ये स्वच्छता अभियानाचा उपक्रम राबविण्यात आला. एक तरी ओवी अनुभवावी याप्रमाणे आयुष्यात एक तरी वारी अनुभवावी. वारीच्या अप्रतिम अनुभूतीची संधी यावर्षी प्रत्यक्षात अनुभवली. त्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जाणवतच होता. एवढ्या मोठ्या विशाल वारीमध्ये आपलं काहीतरी योगदान लाभलं या समाधानाने सर्व सेवक तृप्त झाले होते. स्वच्छता वारीत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या सर्व सेवक पदाधिकाऱ्यांचे दिलीप महाराज ठाकरे यांनी आभार व्यक्त केले. या पुढील स्वच्छता मोहीम अधिक मोठ्या प्रमाणात पदाधिकारी साधक, सेवक यांचे उपस्थितीत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आळंदी नगरपरिषद, आळंदी देवस्थान, आवेकर भावे रामचंद्र संस्थान ( श्री राम मंदिर ), लक्ष्मी नारायण श्री विष्णू मंदिर, श्री हरिहरेंद्र महाराज, सद्गुरू श्री साखरे महाराज मठ श्री दत्त मंदिर आदींसह आळंदीतील विविध सेवाभावी संस्था, मंडळे यांचे वतीने श्रींचे वैभवी पालखी सोहळ्याचे वारकरी संप्रदायातील प्रथा परंपरेने स्वागत करण्यात आले. या वेळी मानकरी यांना नारळ प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला.

श्रींचे सोहळ्याचे अलंकापुरीत आगमन होताच येथील माऊली अन्न छत्र मंडळ, आळंदी यांचे तर्फे वारकरी, भाविक, माऊली भक्त यांना माऊलींची पालखी आळंदीत आल्याने महाप्रसाद वाटप करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील अन्नप्रसाद वाटप करण्यात आले. या महाप्रसादात भिठलं, भाकरी, शिरा, मसाला भात वाटप करून सेवाभाव आणि परंपरेचे संवर्धन करीत माऊलीचा प्रसाद हरिनाम गजरात वाटप करण्यात आहे.

श्रींचा सोहळा आळंदीत विसावल्या नंतर लहान, थोर भाविक भक्त, वारकरी, नागरिकांना परंपरेने पिठलं भाकरी महाप्रसाद अवधूत चक्रांकित महाराज यांचे सह माउली अन्न छत्र मंडळ आळंदी यांचे तर्फे या ही वर्षी सेवा माऊलींचे चरणी रुजू करण्यात आली. सेवेचे हे ३५ वे वर्ष पूर्ण झाले आहे. सेवाभाव जपत सर्व मंडळाचे सदस्य, पदाधिकारी यांनी सन १९९१ पासून आज पर्यंत सेवा रुजू केली. असे माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार कुऱ्हाडे पाटील यांनी सांगितले. तसेच महाद्वार प्रांगणात व्यापारी तरुण मंडळातर्फे देखील महाप्रसाद वाटप करण्यात आला. आळंदी नगर परिषदतर्फे श्रींचे पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. या वर्षी नगरपरिषदेने दगडी पुलाचे सुरुवातीस नादब्रम्ह शिल्प विकसित केले आहे. या शिल्पाचे समस्त वारकरी संप्रदायाचे उपस्थितीत उदघाटन हरिनाम गजरात करण्यात आले. या प्रसंगी मुख्याधिकारी माधव खांडेकर, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, उपाध्यक्षा सुजाता तापकीर, गटनेते सचिन गिलबिले यांचे सह पदाधिकारी, ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.

येथील आवेकर भावे रामचंद्र संस्थान श्री राम मंदिरात माऊलींचे पालखीचे स्वागत करण्यात आले. या वेळी परंपरेने श्रींची आरती झाली. मानकरी यांना नारळ प्रसाद देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी श्रींचे चोपदार राजाभाऊ रंधवे, बाळासाहेब रणदिवे, योगेश सुरू, बाळासाहेब कुऱ्हाडे, मालक ऋषिकेश आरफळकर, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील आदींचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी आवेकर भावे रामचंद्र संस्थानचे विश्वस्त चिन्मय चौभे, लक्ष्मीकांत दंडनाईक, अर्जुन मेदनकर, अविनाश गुळुंजकर, माजी विश्वस्त बिपीन चौभे, नरहरी महाराज चौधरी, लक्ष्मण मेदनकर, अप्पाबुवा पाटील महाराज, महेश अयाचित गुरुजी मारुती वाघमारे, संकेत वाघमारे आदी उपस्थित होते

Alandi shri palkhi swagat sohla
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleचातुर्मासनिमित्त भाविकांना धार्मिक पर्वणी
Next Article विकासकामांचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर! सोशल मीडियाच्या वापराचा पंतप्रधानांचा खासदार श्रीरंग बारणे यांना सल्ला
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

आळंदीत दिव्यांगांना मिळणार मॉड्युलर पाय मोफत

October 9, 2026

आळंदीत इंदिरा एकादशी दिनी भाविकांची दर्शनास गर्दी ; श्रींचे गाभाऱ्यात लक्षवेधी पुष्प सजावट

October 7, 2026

सोसाट्याच्या वाऱ्यासह आळंदीत पावसाची जोरदार हजेरी, उकड्यापासून नागरिकांना दिलासा

October 6, 2026

अर्जुन मेदनकर यांची पुणे जिल्हा अध्यक्ष – धार्मिक प्रकोष्ठपदी नियुक्ती

October 3, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
मुळशी

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

By Hindavinewsnetwork@gmail.comOctober 11, 20260
Spread the love

हिंदवी न्यूज | नवी सांगवी साई चौक येथील लोकनेते लक्ष्मण भाऊ भाजी मार्केट मध्ये आमदार…

इनर रिंग रोड’साठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा; मुळशी, मावळ, हवेली तालुक्यांत ग्रामबैठकांना सकारात्मक प्रतिसाद!

October 11, 2026

राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

October 11, 2026

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान

October 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?