Close Menu
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
What's Hot

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

August 27, 2026

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
hindavinews.com
Subscribe Login
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
hindavinews.com
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
Home»पुणे»‘सूर्यदत्त’तर्फे स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्धापनदिनानिमित्त १४ ते २१ ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन. १० वीरपत्नींना ‘वीर नारी सन्मान’!!
पुणे

‘सूर्यदत्त’तर्फे स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्धापनदिनानिमित्त १४ ते २१ ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन. १० वीरपत्नींना ‘वीर नारी सन्मान’!!

Hindavinewsnetwork@gmail.comBy Hindavinewsnetwork@gmail.comAugust 14, 2026Updated:August 14, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रम

हिंदवी न्यूज | पुणे

भारताच्या स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने १४ ते २१ ऑगस्ट या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहा दरम्यान ‘एकता, समरसता आणि राष्ट्राभिमान’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित देशभक्तिपर, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत. भारताला समृद्ध, सशक्त आणि जागतिक पटलावर अग्रगण्य बनविण्याच्या ‘विकसित भारत’ या राष्ट्रव्यापी प्रवासात सूर्यदत्त शिक्षण संस्था गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने अग्रभागी राहिला आहे.

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली व उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया यांच्या नेतृत्वाखाली या सर्व उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे. विद्यार्थी घडला तरच समाज घडतो. सशक्त समाजातूनच समृद्ध राष्ट्राची निर्मिती होते,या विचारावर डॉ. चोरडिया यांची अढळ श्रद्धा आहे. म्हणूनच सूर्यदत्तच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणासोबतच संस्कार, आरोग्य व राष्ट्रनिर्मितीची एक अखंड चळवळ उभारली आहे.

या महोत्सवात देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांच्या १० वीरपत्नींचा विशेष ‘वीर नारी सन्मान’ देऊन गौरव करण्यात येणार आहे. १५ ऑगस्ट रोजी मुख्य स्वातंत्र्य दिन सोहळ्यात कर्नल पाल यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण पार पडेल, तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा ‘सूर्य चक्र पुरस्कार’ देऊन गौरव केला जाईल. याशिवाय, भारताची समृद्ध परंपरा आणि शूरवीरांचा इतिहास जिवंत करणारा भव्य देशभक्तीपर फॅशन शो व विशेष नाट्य सादर होईल.

या निमित्ताने ‘व्होकल फॉर लोकल’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या अभियानाला बळ देण्यासाठी भारतातील पारंपरिक हस्तकला, विविध स्वदेशी हस्तनिर्मित उत्पादनांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. ‘फिट इंडिया’ उपक्रमांतर्गत क्रीडा, योग व फिटनेस सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच, ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ संकल्पनेवर आधारित विविध राज्यांचे लोकनृत्य, समूह गायन, देशभक्तीपर संगीत ऑर्केस्ट्रा आणि भारतीय खाद्यसंस्कृतीचे स्टॉल्स असणार आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी निबंध व पोस्टर स्पर्धा, पथनाट्ये, पुस्तक प्रदर्शन, परिसंवादाचेही आयोजन करण्यात आले आहे. व्यसनमुक्तीविषयी व्याख्यान, विविध संकल्प करणे, गोशाळा आणि अनाथालयाला भेट देणे अशाही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “स्वातंत्र्यदिन हा ध्वजारोहण आणि राष्ट्रगीतापुरता मर्यादित राहता कामा नये. या निमित्ताने ‘विकसित भारत’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पना प्रत्येक विद्यार्थ्याच्या विचारात आणि कृतीत रुजवणे गरजेचे आहे. ‘सूर्यदत्त’ प्रत्येक विद्यार्थ्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देतानाच त्याला एक जबाबदार, सुजाण आणि देशभक्त नागरिक बनवण्यासाठी कटिबद्ध आहे.”

सुषमा चोरडिया म्हणाल्या “स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्षात विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि देशसेवेची भावना रुजवणे ही काळाची गरज आहे. वीर नारींचा सन्मान आणि विविध उपक्रमांतून स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाची प्रेरणा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा सूर्यदत्तचा प्रयत्न आहे. सक्षम, संस्कारी आणि जबाबदार युवा पिढीच विकसित भारताची खरी ताकद ठरेल.”

“स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाची प्रेरणा, भारतीय संस्कृतीचा अभिमान, देशसेवेची भावना आणि भविष्य घडविण्याची जिद्द विद्यार्थ्यांच्या मनात रुजवत ‘माझा देश, माझी जबाबदारी’ हा विचार प्रत्येक युवा मनापर्यंत पोहोचविण्याचा सूर्यदत्तचा हा प्रयत्न आहे. आजच्या विद्यार्थ्यांच्या मनात पेटलेली राष्ट्रप्रेमाची ज्योतच उद्याच्या विकसित भारताचा प्रकाश बनेल, असा आम्हाला विश्वास आहे. ‘विकसित भारता’च्या उभारणीत सूर्यदत्त शिक्षण समूह सदैव अग्रभागी राहील,” असेही त्यांनी नमूद केले

 

Veer nari samman
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleकिवळेतील सेवा रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासा
Next Article पुणे इनर रिंगरोडच्या पहिल्या टप्प्यासाठी ४४ कोटींचा निधी वर्ग; भूसंपादनाच्या कामाला वेग!
Hindavinewsnetwork@gmail.com
  • Website

Related Posts

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

विद्यार्थ्यांनी केवळ पदवी नव्हे, तर एव्हिएशन क्षेत्रातील जागतिक दर्जाचे व्यावसायिक कौशल्य आत्मसात करावे :- अभिषेक बारणे

August 22, 2026

चाकण परिसरातील कचरा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा ; ३६.५ एकरांवर होणार ‘पीएमआरडीए’चा घनकचरा प्रकल्प

August 21, 2026

कदमवाकवस्तीतील ९,५०० चौरस फुटांच्या अनधिकृत बांधकामावर ‘पीएमआरडीए’चा हातोडा!

August 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

By Hindavinewsnetwork@gmail.comAugust 27, 20260
Spread the love

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि सिद्धिविनायक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गायक, संगीतकार यांना दरवर्षी प्रदान करण्यात येतो.

विश्वबंधुत्व दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज् रहाटणी केंद्रात ‘महारक्तदान शिबिर’ उत्साहात

August 25, 2026

संस्कृती और परंपरेचे जतन हीच आपली खरी संपत्ती ! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

August 24, 2026

महापालिका सभेत मनोज सेठिया यांचा सत्कार

August 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

Our Picks
About Us
About Us

Hindavi News हे एक विश्वासार्ह आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.
आम्ही सत्य, अचूक आणि निष्पक्ष बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देतो.
स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे सखोल कव्हरेज आम्ही देतो.
प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती प्रकाशित केली जाते.
समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे.
Hindavi News – तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी.

Contact Us

Editorial Team:
मुख्य संपादक – पूनम पाटील
सह संपादक – अभिजीत पाटील

Contact:
मोबाईल – 8855968964
ईमेल – Hindavinewsnetwork@gmail.com

 

New Comments
  • Hindavinewsnetwork@gmail.com on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
  • Vinayak Dhobale on छत्रपती प्रतिष्ठान व युवा मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबीर
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मावळ
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • व्हिडिओ
  • आरोग्य
  • उद्योग – व्यापार
  • क्रीडा
  • कला
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
© Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?